Site icon InMarathi

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केले स्वतःचे ड्रॅगनमध्ये रुपांतर, काय आहे हा अजब प्रकार? वाचा

dragon-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पृथ्वीवरील सर्व मनुष्यांची एकसारखे अवयव आणि शारीरिक स्थिती आहे. पण काहींना हे आपल्या इच्छेप्रमाणे असायला हवे होते असे वाटत असते. म्हणजे काहींना त्याचं नाक आवडत नाही तर काहींना ओठ, मग हे सर्व आपल्या हिशोबाने आपल्याला हवे तसे बनवून घेतात. प्लास्टिक सर्जरी च्या मदतीने.

जेव्हा पासून ह्या प्लास्टिक सर्जरीचा शोध लागला आहे तेव्हापासून लोकांना स्वतःमधल्या कमतरता प्रकर्षाने जाणवायला लागल्या आहेत. आणि मग त्या कमतरता मिटविण्यासाठी सर्जरी करायची. काही लोक तर केवळ स्वतःला आणखी सुंदर करण्यासाठी करतात.

 

पण आज आम्ही जिच्याबद्दल सांगणार आहोत त्या महिलेने तर स्वतःला बदलण्याच्या सर्व परिसीमा ओलांडल्या आहेत. अमेरिकेच्या Bruni, Texas येथे राहणाऱ्या Eva Tiamat Medusa ने आपला चेहरा बदलून चक्क ड्रॅगनचा चेहरा बनवला आहे.

 

Eva Tiamat Medusa ह्या सांगतात की, त्या पाच वर्षांच्या असताना त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी घराच्या बाहेर काढून टाकलं. त्यानंतर त्या सापांसोबत आपलं आयुष्य घालवायला लागल्या. त्यांच्या मते त्यांच्या दोन आई आहे एक ती जिने त्यांना जन्म दिला आणि दुसरी ती ज्या सापासोबत मोठी झाली.

 

Eva सांगतात की, स्वतःला ड्रॅगन सारख बनवून त्यांना संपूर्ण सरपटणाऱ्या प्रजातींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आजवर Eva ह्यांनी एका ड्रॅगन सारखं दिसण्यासाठी ४०००० पौंड म्हणजेच जवळपास ३६,६०, ८४० रुपये खर्च केले.

ह्यासाठी त्यांनी त्यांचे कान कापले, नाक चपटं केलं, डोक्यावर आठ सिंह बनवले, जीभ मधून कापून घेतली. तसेच त्यांनी चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू गोंदवून घेतले. एवढचं काय तर तिने आपल्या डोक्याचा पांढरा भाग हा हिरवा करून घेतला आहे.

 

Eva ह्या एका बँकेच्या उपाध्यक्षा होत्या पण आपल्या ह्या वेडेपणाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि आपला संपूर्ण पैसा आणि वेळ हा ड्रॅगन बनण्यासाठी घालवला. Eva मानतात की, त्या जगातील एकमेव अश्या ट्रांसजेंडर आहेत ज्यांनी आपल्या शरीरात एवढे बदल करवून घेतले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version