Site icon InMarathi

मार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली..!

Kalaripayattu-Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अॅक्शन चित्रपट बहुतेकांना आवडत असतीलच. या चित्रपटांमधील फाईट्स संपूर्ण चित्रपटाचा रोमांच वाढवत असतात. पण जे चित्रपटामध्ये दाखवले जाते, ते कधी खऱ्या आयुष्यामध्ये घडत नसते.

खऱ्या आयुष्यामध्ये देखील सेल्फ डिफेन्ससाठी म्हणजे स्वत:चे आपल्या शत्रूपासून रक्षण करण्यासाठी मार्शल आर्ट्स, कराटे असे क्लास देखील घेतील जातात.

बाघी-२ या चित्रपटामध्ये देखील आपल्याला टायगर श्रॉफच्यामार्फत मार्शल आर्ट्स कला पाहण्यास मिळते.

 

 

मार्शल आर्ट्स ही कला बहुधा दक्षिण पूर्व आशिआई देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसे चीन, जपान आणि कोरिया या देशांमध्ये याचे वर्चस्व आपण पाहतो.

चीनमध्ये देखील कुंफू हा यातलाच एक प्रकार शिकवला जातो. तथापि, काहीच लोकांना हे माहित आहे की, मार्शल आर्ट्सची सुरुवात आपल्या भारतामधीलच एका प्रदेशामधून झालेली आहे. आज आपण त्याचबद्दल काही माहिती जाणून घेणारा आहोत.

कलरीपयट्टू

कलरीपयट्टू दक्षिण भारतातील एक प्राचीन मार्शल कला आहे. योगाच्या बेसवर हा प्रकार एक व्यायाम आणि वैद्यकीय उपचार म्हणून आयुर्वेदाच्या विज्ञानावर आधारित आहे.

हा प्रकार केरळ आणि तामिळनाडू आणि कर्नाटकच्या जवळच्या भागामध्ये, तसेच श्रीलंकेच्या उत्तरपूर्व भागामध्ये आणि मलेशियाच्या मल्लाळी समुदायात शिकवला जातो आणि त्याचा सराव केला जातो.

 

 

हा प्रकार सर्वात जुना मार्शल आर्ट्सचा प्रकार मानला जातो. कलरीपयट्टू हा एक शस्त्रासह ऊंच कलाबाजी करणारा खेळ म्हणून ओळखला जातो. यामध्ये शत्रूवर एकदम बारीक नजर ठेवत, हालचाली करायच्या असतात.

कलरीपयट्टू हा शब्द कलरी म्हणजेच शालेय किंवा व्यायामशाळा आणि पयट्टू हा शब्द पयातुक्का यापासून आला आहे. पयातुक्काचा लढा / व्यायाम किंवा कठोर परिश्रम करणे असा अर्थ होतो.

मूळ आणि प्रगती

कलरीपयट्टूची प्रथा ही एक प्राचीन भारतीय ग्रंथ धनुरवेदापासून उद्भवलेली आहे असे म्हटले जाते. धनुर्वेद म्हणजे धनुर्विद्येचे विज्ञान असा त्याचा अर्थ होतो.

पण सर्व पारंपारिक लढाऊ कला या धनुर्वेद ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की, हे युद्धक्षेत्राची रणनीती नसून मार्शल आर्ट्सच एक तंत्र आहे.

 

 

हा मार्शल आर्ट्सचा प्रकार भारताच्या दक्षिणेमध्ये असलेल्या केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. केरळच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी बेचाळीस कलरी म्हणजेच शाळा आणि त्यामध्ये ही कला शिकवण्यासाठी बावीस मास्टर्स ठेवले होते.

कलारीज ही एक अशी शाळा होती, जिथे या मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग गुरूंकडून आणि मास्टर्सकडून दिले जात होते.

हजारो वर्षापासून भारतीय उपखंडामध्ये मार्शल आर्ट्स अस्तित्वामध्ये आहे. प्राण्यांच्या लढाऊ शैलीची माणसाने अनुकरण करत आपले जीवन जगण्यासाठी त्याचा वापर केला होता. पहिल्यांदा यामध्ये दांडीचा शस्त्र म्हणून वापर करण्यात येत असे.

त्यानंतर जेव्हा शस्त्रांचा शोध लागला, तेव्हा त्यांचा वापर करण्यात आला. वेदांमध्ये देखील मार्शल आर्ट्सचा उल्लेख केला गेला आहे.

 

 

प्रशिक्षण आणि शस्त्रे

लढण्यासाठी प्रशिक्षण कलारी येथे दिले जात होते, म्हणजेच हे एकप्रकारचे प्रशिक्षण विद्यालय होते. कलारीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी तिथे काही तत्त्वे नमूद केलेली होती. या मार्शल आर्ट्स प्रकारामध्ये शरीराची तेल मालिश शरीर चपळ आणि लवचिक होईपर्यंत करावी लागते.

यामध्ये चॅटॉम (जम्पिंग), ओटॅम (धावणे), मारिचिल (सॉमरवॉल) इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. त्यानंतर खंजीर, तलवार, भाले, धनुष्य आणि बाण व इतर काही शस्त्रांच्या वापरण्याचे धडे दिले जातात.

या मार्शल आर्ट्समध्ये शस्त्रे घेऊन किंवा शस्त्रे न घेता किक मारणे, जुगारणे, शत्रूला ढकलणे हे करावे लागते.

ही कला मनुष्याला आपले रक्षण करण्यासाठी शिकवली जाते, यामध्ये कधीही दुसऱ्याचे नुकसान करायचे नसते. भगवान इंद्र यांनी व्हेत्रसूर या राक्षसाचा पराभव करण्यासाठी कलरीपयट्टू या मार्शल आर्ट्स प्रकारचा उपयोग केला होता असे म्हणतात.

आजही हा प्रकार केरळ आणि दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि लोक अजूनही तो मोठ्या प्रमाणात शिकतात.

 

 

यावरून हे समजते की, आज आपण परदेशात बनवलेल्या चित्रपटांमध्ये जे मार्शल आर्ट्स पाहतो, त्याची सुरुवात आपल्या भारतामध्येच झालेली आहे. त्यामुळे मार्शल आर्ट्सचा जनक आपला भारतच आहे असे म्हणण्यात काही वावगे नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version