' या देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो! – InMarathi

या देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सुट्टी ही सर्वांना हवीच असते. आठवडाभर काम केल्यावर सर्वांनाच सुट्टीची गरज असते. लोक तर नेहमी आपल्याला सुट्टी कशी मिळेल ह्याचीच वाट बघत असतात. पण फ्रान्समध्ये ह्याच्या अगदी उलटच काहीतरी घडले होते.

 

job rules around the world-inmarathi04
msn.com

फ्रान्समध्ये जर तुम्ही आठवड्याच्या सातही दिवस काम केले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तूम्हाला ह्यावर विश्वास बसत नसेल पण फ्रान्समध्ये सुट्ट्यांची चिंता ही एम्प्लॉइजना कमी आणि सरकारला जास्त असते. येथे कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत एक वेगळाच कायदा आहे. हा कायदा तेव्हा समोर आला जेव्हा तिथल्या एका बेकरवर ३६०० डॉलर म्हणजेच जवळपास २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आणि ह्यामागील कारण म्हणजे त्याने सुट्टी घेतली नाही.

 

bekari-products-inmarathi01
copperchocs.com

फ्रान्समध्ये सुट्टी नाही घेतली तर दंड भरावा लागतो. फ्रान्स येथील एका बेकरीचे ४१ वर्षीय मालक सेड्रिक वाईव्रे ह्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी मागील वर्षाच्या उन्हाळ्यापासून आतपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. हे तेथील लेबर लॉ चे उलंघन आहे. त्यांनी आठवड्यातील एक दिवसही सुट्टी न घेता सातही दिवस बेकरी सुरु ठेवली, जे कायद्याच्या विरुद्ध आहे.

 

bekari-products-inmarathi
pixabay.com

ह्या व्यक्तीने पर्यटकांची वाढती संख्या बघून संपूर्ण आठवडाभर आपली बेकरी सुरु ठेवली. पण फ्रान्सच्या लेबर लॉ नुसार छोटे-मोठे व्यावसायिक हे आठवड्यातील केवळ ६ दिवसच काम करू शकतात. पण सेड्रिक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण सातही दिवस काम केलं आणि तेही रात्री उशिरापर्यंत. त्यानंतर जवळपास ५०० लोकांनी एका याचिकेवर सही करत सेड्रिकने सातही दिवस बेकरी सुरु ठेवल्याबाबत कोर्टात पिटीशन दाखल केली आहे.

 

bekari-products-inmarathi03
nutraceuticalbusinessreview.com

तर काही लोकांनी सेड्रिकची बाजू घेत ह्या कायद्याचा विरोध केला आहे. ह्या विरोधात लोक रस्त्यावर उतरली आहेत. त्यांच्यामते ह्या कायद्यामुळे व्यवसायात नुसकान होते.

पण जर असा कायदा आपल्याही देशात असेल तर सर्व कर्मचारी नक्कीच आनंदी होतील…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?