' लहान मुलांना योग्य आहार देणं गरजेचं असतं. काय असावं आणि काय नसावं? वाचा… – InMarathi

लहान मुलांना योग्य आहार देणं गरजेचं असतं. काय असावं आणि काय नसावं? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – डॉ. प्राजक्ता जोशी 

===

लहान मुलांचा आहार (वयोगट- १ ते ५) :

लहान मुलांच्या आहाराचा विचार करताना २ बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.

पहिले म्हणजे प्रत्येक अन्नघटक हा ऊर्जेचा ऊत्तम स्त्रोत असायला हवा. कारण लहान मुले खुप सक्रिय असतात. दुसरे प्रत्येक अन्नघटक हा अत्यंत पौष्टिक असला पाहिजे.

कारण त्यांची वाढ होत असते. त्यामुळे संपुर्ण, सकस आहार ही या वयोगटाची गरज असते. तसेच लहान वयोगट असल्याने थोडे थोडे किमान दिवसातून ५ वेळा खाऊ घालावे.

1) Breakfast
2) Lunch
3) Dinner
4) Snacks- 2times

 

दैनंदिन कॅलरीज :

 

health tips-inmarathi

 

मात्र आपण carbs, proteins यांची भाषा न बोलता ज्याद्वारे वरील तक्त्याची पुर्तता होईल अशा अन्नघटकांबद्दल बोलुया.

धान्ये:

सर्व प्रकारची धान्ये आहारात समाविष्ट असावीत. कारण ही ऊर्जेचा ऊत्तम स्त्रोत असुन ह्यात B-complex व fibres भरपुर प्रमाणात असतात.

गहु, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदुळ, ओट्स, राजगिरा ही धान्ये पारंपारीक पद्धती व ॠतु, हवामान यांचा विचार करून सेवन करावीत. तसेच पोहे, रवा, दलिया हेही ऊत्तम स्त्रोत आहेत. फक्त मैदा पचनास जड असल्याने तो टाळावा.

डाळी व मांसाहार :

 

health tips-inmarathi01

 

हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थाव्यतिरीक्त proteins चे ऊत्तम स्त्रोत आहेत. तुर, मुग, ऊडीद, चना सर्व डाळींमध्ये protein तर असतेच पण त्याव्यतिरीक्त Bcomplex व fibreदेखील असते.

मांसाहाराचा विचार करता अंडी, मासे, meat हे उत्तम स्त्रोत आहेत. मात्र कच्ची अंडी, कच्ची कडधान्ये, तसेच processed meat (nuggets, pattties) या गोष्टी टाळाव्या.

दूध व दुग्धजन्य पदार्थ :

 

health tips-inmarathi04

 

यामध्ये calcium; vitA, vitD ,proteins व healthy fats असतात. दुध, दही, पनीर व दुधाचे पारंपारीक पदार्थ हे त्याचे ऊत्तम स्त्रोत आहेत.
मात्र low fat milk, yogurts, cheese, flavoured milk, drinks टाळावेत.

फळे व भाज्या :

 

health tips-inmarathi05

 

फळे व भाज्या या vitamins, minerals, व fibres चा ऊत्तम स्त्रोत आहेत. हिरव्या पालेभाज्या लोह व कॅल्शीअमचा स्त्रोत आहेत .असे प्रत्येक भाजी व फळांतून विशेष घटक मिळत असतात.त्यामुळे सर्व भाज्यांचा समावेश आहारात असावा.

 

health tips-inmarathi06

 

मात्र frozen instant vegetable snacks टाळावेत. Seasonal, ताजी, पिकलेली फळे खावीत. तर dehydrated fruits, jams, jellies हे प्रकार टाळावेत.

याशिवाय महत्वाचे घटक म्हणजे

Fats आणि Sugar :

तुप,लोणी यासारखे good fat मुलांना अवश्य द्यावे. २७gm एवढी त्याची दैनंदिन गरज असते. साखर देखील मूळ व सेंद्रीय स्वरूपात द्यायला काही हरकत नाही.

फक्त chocolates, biscuits, sauces टाळावेत. मीठ देखील २gm पेक्षा अधिक देऊ नये. Low calorie व high sugar products टाळावेत.

Hydration :

 

water healwater health-inmarathi04th-inmarathi04

 

Hydration हा देखील महत्वाचा घटक आहे. “पाणी” हाच त्याचा ऊत्तम पर्याय आहे. दूध, ताज्या फळाचा रस हेही पर्याय आहेत. नारळपाणी, वेगवेगळी ताजी सरबते, मिठ साखर पाणीहेही ऊत्तम पर्याय आहेत.

Sometime food :

Chocolates, पेस्ट्रीज, तळलेले पदार्थ, junk food, केक, आईस्क्रीम, soft drink हे सकस नसले तरीही मुलांना आवडतेच! त्यामुळे आठवड्यातुन एकदा व कमी प्रमाणात द्यावेत.

काही सोप्या टीप्स :

  • चौरस आहार, आकर्षक रंगसंगती, आवडती चव यामुळे मुलांचा आहार वाढतो.
  • जेवनांच्या मधील वेळात गोड पदार्थ, सरबते, दुध टाळावीत.
  • प्रत्येक मुलाचा आहार वेगळा असतो. त्यामुळे बळजबरीने खाऊ घालु नये.

आता याबाबत आयुर्वेद विचार पाहुया…

आयुर्वेदात नवजात शिशुपासून ते कुमारावस्थेपर्यंत आहाराचे वर्णन आहे. मात्र आज आपण प्रकृतीनुसार लहान मुलांची आहाराबाबत काय काळजी घ्यावी हे पाहुया.

वातप्रकृती :

या प्रकृतीची मुले ही संवेदनाशील,कलात्मक व सतत सक्रिय असतात. सर्व गोष्टी लवकर आत्मसात करतात. एकावेळी खूप गोष्टी करत शिकत असतात. ती लवकर विचलीत होतात.

आहार :

पचनशक्ती नाजुक असते. गरम गरम व पचनास हलके अन्न द्यावे. पोषक सुप्स, गरम पोहे, दलिया यांचा अवश्य समावेश असावा. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान2-3 तास आधी करावे.

पित्तप्रकृती :

लहान मुले उत्तम इच्छाशक्ती असलेली, उत्तम नेतृत्व गुण व गतिशील असतात. कुठलेही ज्ञान लवकर आत्मसात तर करतातच पण सखोल अभ्यासही करतात.

यांची पचनशक्ती तीव्र असते. त्यामुळे जेवण वेळेवर व अधिक प्रमाणात द्यावे. थंड गुणाचे पदार्थ अधिक द्यावेत. गरम मसाले टाळावेत.

कफप्रकृती :

अशी मुले शांत, स्थिर, कनवाळु स्वभावाची असतात. गोष्टी हळुहळू शिकतात मात्र शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकतात. भावनिक दृष्टीने अत्यंत स्थिर असतात. ही मुले खुप वेळ न खाता राहु शकतात.

खरे खवय्ये असतात. पण त्यामुळे over eating ची सवय लागू शकते. मसाल्याचे पदार्थ यांच्या आहारात अवश्य असावेत. थंड व जड पदार्थ टाळावेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?