Site icon InMarathi

विमानातील खुर्च्या निळ्या रंगाच्याच का असतात? जाणून घ्या…

airport-worker-dance-inmarathi

telegraph.co.uk

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाच्या या काळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बऱ्याच गोष्टी करणं अशक्य झालेलं आहे. विमान प्रवास हा यापैकीच एक आहे.

आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी विमानाने प्रवास केला असेल किंवा विमान बघितले तरी नक्कीच असेल. तेव्हा कधी तुमच्या लक्षात आले का की, जवळपास प्रत्येक विमानातील खुर्च्यांचा रंग हा निळाच असतो. इतर कुठलाही रंग सहसा दिसत नाही.

पण असे का असेल? म्हणजे निळ्या रंगा व्यतिरिक्त इतर कुठल्या रंगाच्या खुर्च्या का नसाव्यात विमानात? निळ्या एवजी लाल, काळा किंवा पांढरा हे रंग का वापरले जात नसतील? इतरही अनेक रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सीट्सचा रंग निळाच असतो.

 

indiatoday.in

 

तर ह्यामागे काही कारणे आहेत. ह्यापैकीच एक म्हणजे, काही लोक मानतात की, निळा रंग हा आकाशाची आठवण करवून देतो म्हणून त्या रंगाला निवडले गेले असावे. पण हे याचे खरे कारण नव्हे. ही तर केवळ दंतकथा आहे.

खरे तर विमानात असणाऱ्या ह्या निळ्या रंगाच्या खुर्च्यांची सुरवात ही खूप आधीच्या काळातच झाली होती. ब्रिटीश वैज्ञानिकांच्या मते, निळा रंग हा विश्वसनीयता आणि सुरक्षिततेचं प्रतिक आहे.

 

naidunia.jagran.com

 

त्यामुळे निळा रंग हा प्रवाश्यांमध्ये एक सकारात्मकता पसरवतो. त्यांना सुरक्षिततेची जाणीव करवून देतो. प्रवासात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे जवळपास सर्वच एअरलाईन्समध्ये ह्या निळ्या रंगाच्याच खुर्च्या दिसतात.

 

foxnews.com

 

ह्यावर झालेल्या एका रिसर्चमध्ये असे समोर आले की, ९० टक्के लोक हे ब्रान्ड कलरच्या आधारे कंपनीच्या सेवा घ्यायच्या, की नाही हे ठरवत असतात. मग अश्यात लोकांचा कल हा निळ्या रंगाकडे असतो. ते निळ्या रंगाकडे आकर्षिले जातात.

म्हणूनच ग्राहकांवर प्रभाव टाकण्यासाठी या रंगाचा वापर करण्याचा पर्याय विमान कंपन्या निवडतात.

 

indiatoday.in

 

निळ्या रंगाच्या खुर्च्या लावण्यामागे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे ह्या रंगाच्या खुर्च्या लवकर खराब होत नाहीत. ह्यावरील धूळ किंवा डाग दिसून येत नाहीत. त्यामुळे त्या जास्त काळासाठी वापरात आणल्या जाऊ शकतात.

थोडक्यात सीट जास्त काळासाठी चांगली दिसण्यासाठी निळा रंग फायदेशीर ठरतो. म्हणून सुद्धा निळा रंग त्यासाठी निवडला जातो.

 

 

१९७०-८० साली काही एअरलाईन्सने ह्या निळ्या रंगा ऐवजी लाल रंगाच्या खुर्च्यांचा वापर केला होता. पण त्या लाल रंगाच्या खुर्च्या त्यांना लवकरच परत निळ्या रंगात बदलाव्या लागल्या.

ह्याचं कारण म्हणजे ह्या लाल रंगाच्या खुर्च्या असताना त्या काळादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांत आक्रमता वाढलेली बघायला मिळाली. त्यामुळे हा प्रयोग फोल ठरला आणि त्यांना खुर्च्या परत निळ्या रंगाच्या कराव्या लागल्या.

 

express.co.uk

 

विमानातील खुर्च्यांवर आर्टिफिशियल लेदर किंवा फॅब्रिकचा वापर केला जातो. एअरक्राफ्ट नियमांनुसार दूरच्या प्रवासासाठी खुर्च्यांवर अश्या प्रकारचे फॅब्रिक लावले जाते जे अतिशय आरामदायक असेल, जेणेकरून प्रवाश्यांना प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही.

तर आर्टिफिशियल लेदर हे जवळच्या प्रवासासाठीच्या फ्लाईट्ससाठी सोयीचे आहे. कारण जर ह्यावर चुकीने काही पडलं तरी त्याचा डाग पडत नाही आणि त्याला साफ करणे हे देखील सोपे असते.

तर मग, विमानाच्या सीटच्या निळ्या रंगमागचं गुपित आज तुम्हाला उलगडलं असेल. 

असंच तुमच्या मित्रांना सुद्धा ही गम्मत कळावी अशी तुमची इच्छा असेल ना? मग हे आर्टिकल तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा नक्कीच वाचायला सांगा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version