Site icon InMarathi

अंबानींचं काय घेऊन बसलात? खरं तर हे आहेत जगातील सर्वात महागडे “विवाह” सोहळे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न म्हणजे आपल्याकडे एक सोहळा असतो. ज्याची तयारी कितीतरी महिन्यांपासून करण्यात येते. पाहुण्यांच्या यादीपासून ते आहेरापर्यंत सर्वकाही चोख असावं अशीच सर्वांची इच्छा असते.

सामान्य लोकांकडे जेव्हा लग्न कार्य असते, तेव्हा त्यांचा कल हा विनाकारण पैसे खर्च होऊ नये आणि कमीतकमी पैश्यात कार्यक्रम पार पडावा ह्याकडे असतो.

तर ह्याच्या अगदीच उलट अतिश्रीमंत लोकांचा कल हा निव्वळ पैश्यांची उधळण कश्याप्रकारे करता येईल ह्यावर असतो.

 

indianexpress.com

आता अंबानीचच घ्या ना… मुकेश आणि नीता अंबानी ह्यांच्या मुलीचा म्हणजेच इशा अंबानी हिचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात झालेल्या खर्चाचा अनेक लोकांनी हिशेबही मांडला. देशातल्या एवढ्या बड्या उद्योगपतीच्या मुलीचे लग्न म्हटल्यावर चर्चा तर होणारच बॉस!

इशा अंबानीच्या या लग्नाचीही अनेक माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली. त्यात झालेला खर्च, अलिशान थाट वगैरे विषय यावर लोक येथेश्च बोलले.

ह्याचं पंगतीत बसणारे आणखी काही विवाह सोहळे आहेत ज्यांच्यावर अतोनात पैसा खर्च केला गेला. ह्यात राजपुत्र आणि राजकन्या ह्यांच्या विवाह सोहळ्याचा देखील समावेश आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

प्रिंसेस डायना आणि प्रिंस चार्ल्स :

 

closerweekly.com

ह्यात पहिले नावं येते ते प्रिंस चार्ल्स आणि प्रिंसेस डायना ह्यांचं. ब्रिटन राजघराण्याचे वारस प्रिन्स चार्ल्स हे १९८१ साली प्रिन्सेस डायना ह्यांच्याशी विवाहबंधनात अडकले.

हा विवाहसोहळा २० व्या शतकातील सर्वात महागडा आणि तेवढाच अलिशान होता. तेव्हा ह्यांचं लग्न हे सर्वांच्या र्चेचेचा विषय बनले होते.

ह्या विवाहसोहळ्याला अनेकांनी आपल्या टीव्हीवर लाइव्ह देखील बघितले. त्यावेळी ह्या लग्नावर ४८ मिलियन डॉलरचा खर्च करण्यात आला होता. जो आजच्या हिशोबाने ७० मिलियन डॉलर एवढा म्हणजेच ४५५ कोटीहून जास्त खर्च ह्या लग्नावर करण्यात आला होता.

वनिशा मित्तल आणि अमित भाटिया :

 

वनिशा मित्तल ही जगातील प्रसिद्ध आणि स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी मित्तल ह्यांची मुलगी आहे.

लक्ष्मी मित्तल हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. वनिशा मित्तल आणि अमित भाटिया ह्याचं लग्न २००४ साली झालं. ह्या विवाहसोहळ्यावर एकूण ६६ मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ ४२९ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

प्रिंस विलियम आणि केट मिडलटन :

 

popsugar.com

प्रिंस विलियम आणि केट मिडलटन हे देखील ब्रिटनच्या शाही कुटुंबातील आहेत. ह्यांचा विवाहसोहळा देखील अविस्मरणीय असा होता. एवढंच काय तर ह्या लग्नाला ‘वेडिंग ऑफ दि सेंचुरी’चा किताब दिला गेला.

हा विवाहसोहळा २०११ साली पार पडला. ह्या लग्नात देखील ३४ मिलियन डॉलर म्हणजेच २२१ कोटीचा खर्च झाला होता.

वेन रूनी आणि कोलीन मक्लोहलीं :

 

liverampup.com

फुटबॉलर वेन रुनी आणि कॉलीन ह्याचं लग्न देखील जगातील महागड्या लाग्नांपैकी एक आहे.

ह्यांच्या लग्नाचे फोटो विकत घेण्यासाठी एका प्रसिद्ध नियतकालिकाने ४.२ मिलियन डॉलरची ऑफर देखील दिली होती.

ह्या लग्नात रुनी ह्यांनी त्यांच्या ६४ नातेवाईकांना लग्नाच्या ठिकाणी नेण्यासाठी ५ प्रायव्हेट प्लेन हायर केले होते. ह्या लग्नाचा एकूण खर्च हा ८ मिलियन डॉलर म्हणजेच आताचे ५२ कोटी रुपये एवढा होता.

चेलसी क्लिंटन आणि मार्क मेजविंस्की :

 

nypost.com

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन आणि हिलेरी क्लिंटन ह्यांची मुलगी चेलसी हिचा विवाह सोहळा देखील अगदी थाटात पार पडला. २०१० साली चेलसी क्लिंटन हिचे लग्न मार्क मेजविंस्की ह्याच्याशी झाला.

ह्या लग्नात ५ मिलियन डॉलरचा म्हणजेच ३२ कोटीचा खर्च झाला होता.

एलिझाबेथ टेलर आणि लॉरी फ्रोन्स्की

 

financesonline.com

ड्रगच्या व्यसनात पार अडकून गेलेले दोघेजण एका व्यसनमुक्ती केंद्रात भेटतात. त्यापैकी एक असते प्रसिध्द हॉलीवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर आणि दुसरा असतो एक साधासुधा बांधकाम कामगार लॉरी फ्रोन्स्की.

व्यसनमुक्ती केंद्रातच त्यांच्यात प्रेमाचा बंध निर्माण होतो आणि ते लग्न करण्याचा निर्णय घेतात.

त्या काळात चर्चेचा विषय झालेल्या या लव्ह स्टोरीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक दिवस एकत्र राहिल्यानंतर शेवटी या जोडप्याने लग्नाचा निर्णय घेतला. हे लग्न १९९१ साली मायकल जॅक्सनच्या उपस्थितीत पार पडले.

या लग्नाला तब्बल २८ कोटी रुपये इतका खर्च त्या काळात आला होता.

तर ही आहे जगातल्या काही सर्वात महागड्या लग्न सोहळ्याची यादी. याव्यतिरिक्त अनेक सोहळे आहेत ज्यांच्यात भरपूर खर्च केला गेला.

 

मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाचे आश्चर्य वाटणाऱ्या सर्वांनी हे खर्चाचे आकडे पाहून तोंडात बोटे घातली नाहीत तरच नवल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version