Site icon InMarathi

लघवी थांबवून ठेवत असाल, तर या परिणामांबद्दल नक्की वाचाच…

urine-control-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या शरीराची पचनक्रिया योग्यप्रकारे होण्यासाठी आपल्या शरीरातील मलमूत्र योग्य त्या वेळी शरीरातून बाहेर पडणे आवश्यक असते. नाहीतर त्यामुळे आपल्याला शरीराच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

कितीतरी लोक कामात व्यस्त असताना जाणूनबुजून लघवी थांबवण्याची मोठी चूक करतात.

जर तुम्ही १० मिनिटांपेक्षा जास्त लघवी थांबवलीत, तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होऊ शकतात आणि हे खूपवेळा तुमच्या जीवावर देखील बेतू शकते.

त्यामुळे जर तुम्ही देखील लघवी थांबवण्याची चूक करत असाल, तर तुम्हाला देखील आताच सावध होण्याची गरज आहे.

 

 

मूत्रमार्गामध्ये संसर्ग होतो

जर तुम्ही दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ लघवी थांबवण्याची चूक करत असाल, तर त्यामुळे तुमच्या मूत्रमार्गामध्ये संसर्गाची समस्या निर्माण  होऊ शकते.

असे का होते ?

खरेतर, जशी आपल्याला लघवीला लागते, तसेच आपला मेंदू आपल्यापर्यंत ही माहिती पुरवतो. मूत्रामध्ये देखील कितीतरी दूषित पदार्थ असतात.

जर या पदार्थांना खूप वेळेपर्यंत एकाच जागी अडवून ठेवले, तर हे पदार्थ इन्फेक्शनचे कारण बनू शकतात. हे पदार्थ एवढे धोकादायक असतात की, यांच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन देखील करावे लागू शकते.

 

 

किडनी स्टोन होण्याची भीती

जर तुम्ही जास्त वेळ लघवी तशीच थांबवून ठेवलीत, तर तुमच्या मूत्रपिंडावर म्हणजेच किडनीवर साहजिकपणे त्याचा प्रभाव पडतो. ज्यामुळे ते किडनीमध्ये साठून राहून, किडनी स्टोनदेखील तयार होऊ शकतो.

असे का होते ?

मूत्राशयामध्ये जेव्हा सर्व गोष्टी वेगवेगळ्या करून जेव्हा लघवी तयार होते, तेव्हा आपला मेंदू आपल्याला ही माहिती पोहोचवतो की, तयार झालेली लघवी बाहेर टाका.

लघवी जर दहा मिनिटांच्या आत बाहेर टाकली गेली नाही, तर ती परत मागे येण्यास सुरुवात होते. हे सारखे अशाप्रकारे चालू राहिले, तर तुमच्या मूत्रपिंडामध्ये किडनी स्टोन तयार होतो.

 

 

मूत्राशयाला सुज येणे

आपली लघवी मूत्राशयात एकत्रित होते. या लघवीमध्ये असे कितीतरी पदार्थ असतात, जे आपल्या शरीराला खूप नुकसानकारक ठरू शकतात. फक्त हेच एक कारण आहे की, हे तुमच्या मूत्राशयाच्या आत एक प्रकारची प्रक्रिया करतात आणि यामुळे आपल्या मूत्राशयाला सूज येण्याचे प्रमुख कारण ठरतात.

किडनी म्हणजेच मूत्रपिंड खराब होणे

कधी – कधी इमर्जन्सीमध्ये लघवी थांबवणे, आपण एखादेवेळी समजू शकतो. पण तुम्ही आळसामुळे जर नियमितपणे लघवी थांबवत असाल, तर तुमच्यासाठी हे धोकादायक ठरू शकते.

लघवी सारखी थांबवली तर, हे लघवीमधील पदार्थ सारखे तुमच्या किडनीच्या आसपास येत असतात आणि यामुळे तुमच्या मूत्रपिंडाला म्हणजेच किडनीला खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो.

या कारणामुळे, तुमची किडनी खराब होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे.

 

 

लघवीच्या रंगामध्ये बदल

जर तुम्ही गरज नसतानाही सातत्याने लघवी थांबवत असाल आणि योग्य काळामध्ये मूत्रविसर्जन करत नसाल, तर यामुळे तुमच्या लघवीचा रंग बदलू शकतो. हे होणारे परिवर्तन लघवीला हिरवा, पिवळा आणि अजूनही कितीतरी रंगामध्ये बदलू शकते.

मूत्राशयाच्या मांसपेशी कमकुवत होतात

आपल्या लघवीमधील विषारी घटक मूत्राशयाच्या मांसपेशींचे नुकसान करण्यामध्ये कोणत्याही परकारची कमतरता ठेवत नाही. यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

 

गरोदरपणात ही लक्षणं दिसत असली तर वेळीच व्हा सावध अन्यथा….

किचनमध्ये वापरात असलेली हळद भेसळयुक्त नाही ना? या टेस्टनी लगेच करा खात्री

जर तुम्ही देखील रोज – रोज लघवी थांबवत असाल, तर तुम्हाला देखील याच समस्यांमधून जावे लागू शकते. यामुळे लघवी करताना तुमचे लिंग देखील दुखू शकते.

त्यामुळे लघवी थांबवण्याच्या आधी नेहमी त्यामुळे होणाऱ्या समस्यांचा नक्की विचार करा, नाहीतर ते तुमच्या जीवावर बेतू शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version