आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
नुकत्याच बघितलेल्या चित्रपटांपैकी सिकारीओ हा खूप छाप पाडून गेला माझ्या मनावर! अत्यंत उत्कृष्ट दिग्दर्शन, cinematography आणि खूप तगडे performances ह्या सिनेम्याच्या जमेच्या बाजू! तसेच अत्यंत प्रभावी पार्श्वसंगीत हि सुद्धा एक जमेची बाजू! पार्श्वसंगीत आणि cinematography साठी ऑस्कर नामांकनं सुद्धा ह्या सिनेमाला मिळालेली!
चित्रपटाचा डायरेक्टर Denis Villeneuve हा सध्याच्या घडीला हॉलिवूडमधील सर्वात टॅलेंटेड डायरेक्टर्सपैकी आहे!
कथानक आणि विषय तसा जुनाच असून देखील डायरेक्टरने ज्या पद्धतीने तो सादर केलाय त्याला जवाब नाही! तुम्हाला जर करमणूक करून घ्यायची असेल किंवा regular suspense thriller मूवी बघायचा असेल तर हा सिनेमा चुकूनही बघू नका! ह्या सिनेम्यात अजिबात आशेचा किरण नाही. ड्रग cartelsशी लढतांना माणुसकी कशी हरवलीये ह्याचं वास्तव ह्या चित्रपटात दाखवलं गेलंय. खूप क्रूर, अंगावर काटे आणणारे प्रसंग आहेत ह्या सिनेम्यात पण ते देखील रेगुलर सस्पेन्स सिनेमासारखे नाहीत.
हा सिनेमा आपण Kate Macer (एमिली ब्लण्ट ) ह्या FBI एजन्टच्या नजरेतून अक्षरशः जगत असतो. अमेरिका आणि मेक्सिकोच्या बॉर्डरवर drug cartel थांबवण्यासाठी केट एका मिशनमध्ये स्वतःहून सहभागी होते आणि मग सुरु होतो
तिला खचवत जाणारा प्रवास. तिला पहिल्याच दिवशी अनेक धक्कादायक गोष्टी बघायला मिळतात आणि कराव्याही लागतात. हा सिनेमा release होऊन जवळजवळ ३ वर्षे झालीत म्हणून प्लॉट points डिस्कस करायला हरकत नाही.
केटला ह्या मिशनमध्ये सहभागी झाल्यापासून ते सिनेमा संपेपर्यंत पूर्ण खच्ची होतानाच आपण बघतो. त्याची कारणं अशी – तिला सामील करून घेताना मॅट (जॉश ब्रोलीन ) आणि तिचे वरिष्ठ अधिकारी तिच्याशी खोटं बोलतात, तिला अत्यंत हिंसक दृश्य बघायला मिळतात, तिला जबरदस्ती एका मेक्सिकन पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडावी लागते, तिला बारमध्ये भेटलेला तिचा नवीन प्रियकर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो.
तिला शेवटपर्यंत कल्पना नसते की तीला ह्या मिशनमध्ये नक्की का सामील करून घेण्यात आलय, Alejandro ( Benicio del Toro) हा टीम मेंबर नक्की कोण आहे ह्याची तिला काहीच कल्पना नसते. ह्यामुळे तिला पहिल्याच दिवशी सिगरेट ओढण्याची सवय लागते. तिचं खचत जाणं हे रंगांच्या shades वरून सुद्धा डिरेक्टरने दाखवलंय. मिशन स्वीकारण्याअगोदर ती डार्क ब्लु शर्ट मध्ये दाखवलीये आणि शेवटी तोच रंग shade फिकट होत जातो आणि ग्रे रंगाचा होऊन जातो.
Alejandro हा एक हिटमॅन जरी असला तरी तो एक माणूस आहे असं दाखवण्याचा प्रयत्न डिरेक्टरने केलाय! पण हा माणूस बदल्याच्या भावनेने पेटलाय! त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्यात ज्या cartel च्या बॉसचा हात असतो. त्याला मारण्याच्या भावनेने हा पेटलेला असतो. पण बदला घेऊन सुद्धा त्याला शेवटी केटकडे बघितल्यावर त्याच्या मेलेल्या मुलीची आठवण येते … याचा अर्थ असा कि प्रतिशोध घेऊनही तो तसाच राहतो.
Silvio नावाचा एक corrupt मेक्सिकन पोलीस अधिकारी २-३ सीन्स मध्ये आपल्याला दाखवण्यात येतो त्यात तो त्याच्या मुलासोबत छान गप्पा मारतो, त्याला फुटबॉल खेळण्याचंही promise करतो. त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर मात्र चिंता दाखवली आहे. तिला कल्पना असावी कि आपला नवरा ड्रग कार्टेलला मदत करतोय. सिल्व्हियोला सगळं नाईलाजास्तव करावं लागतंय असं डिरेक्टरने दाखवलंय.
ह्या चित्रपटाच्या पहिल्या ४० मिनटांना तोड नाही! संपूर्ण चित्रपट उत्तमच आहे. पण पहिली ४० मिनिटं… त्यातही एक १३ मिनिटांचा scene …. डायरेक्टरला साष्टांग नमस्कार. टेन्शन बिल्ड करत करत डायरेक्टर आपल्याला क्लायमॅक्स पर्यंत नेतो …आणि क्लायमॅक्स फक्त १० सेकंदांचा मोजून.
ह्या चित्रपटाचे अनेक interpretations आतापर्यंत अनेक नामांकित criticsने दिले आहेत!
चित्रपटाचा सर्वात शेवटचा scene – सिल्व्हियोचा मुलगा फुटबॉल सामना खेळत असतांनाच दूरवर पुन्हा गोळीबार. हे तिथल्या लोकांसाठी नवीन नाही पण सिल्व्हियोचा मुलगा चेहऱ्यावर निरागस भाव आणून बघतो. सिल्व्हियोच्या पत्नीच्या चेहऱ्यावर तोच चिंतेचा भाव… कदाचित त्यांना कल्पना नसावी की, सिल्व्हियो मेलाय. अंगावर शहारे येतात आणि सिनेमा संपतो.
US आणि Mexico च्या बॉर्डरवर घडणाऱ्या ह्या घटना! अमानुष – हा एकच शब्द येतो डोळ्यांपुढे!
हा सिनेमा आवर्जून बघा!!! Truly a “Classic”!!!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.