आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगामध्ये असे कितीतरी रहस्य आहेत, जी अजूनही उलगडली नाहीत. त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती अजून कोणालाही नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही पुराव्याने सिद्ध करणे, संशोधकांना देखील जमले नाही.
पण त्यांचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आज आपण अशाच एका रहस्य असलेल्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्याबद्दल लोकांचा आतापर्यंतचा अंदाज चुकीचा होता.
२०१३ च्या सुमारास स्नोरकेलर्स या शास्त्रज्ञांच्या एका गटाने एका प्राचीन शहराच्या पाण्याखाली असलेल्या अवशेषांचा शोध लावल्याचा दावा केला होता, ज्याला ग्रीसने गांभीर्याने घेतले होते. शेवटी हे ठिकाण पुरातन वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आले.
स्नोरकेलर्स यांनी याबद्दल नोंदवले होते की, जेव्हा झकिंथॉस बेटावर ते समुद्राच्या आतमधील जग पाहत होते, त्यावेळेस त्यांना तिथे प्राचीन काळातील शहराचे काही अवशेष सापडले होते आणि त्यानंतर त्याला पुरातत्व दर्जा प्राप्त झाला होता.
यामध्ये स्नोरकेलर्सना विविध प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यांच्या या शोधामध्ये त्यांना मानवजातीचे भयानक ठसे पाहण्यास मिळाले.
एखाद्या विशाल दंडगोलाची संरचना आंतरबांधणीचा आयताकृती दगड अशाप्रकारचे काही अवशेष मिळाले होते. हे कदाचित प्राचीन काळामध्ये समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एखाद्या भव्यदिव्य शहराचे अवशेष असू शकतात, जे कदाचित कालांतराने पाण्यामध्ये बुडाले असतील.
तथापि, येथील संरचनेच्या व्यतिरिक्त संशोधकांना असे आढळले की या जागेवर मानवी वस्ती कदाचित प्राचीन काळामध्ये होती, कारण येथे त्यांना त्याकाळचे काही कुंभारकाम केलेले अवशेष आणि त्या काळातील काही नाणी आढळून आली.
सागरी आणि पेट्रोलियम भूविज्ञान जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पेपरनुसार, “समुद्रामध्ये मिळालेले स्तंभ आणि इतर काही हे नेहमीच काही पुरातन काळातील नसतात.”
स्नोरकेलर्सना हे शहराचे अवशेष अटलांटिसच्या थंड भागामध्ये मिळाले होते, पण हे नक्की काय आहेत हे त्यांना समजले नव्हते. संशोधकांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिकडे जाऊन स्वत: विज्ञानाच्या मदतीने याबद्दल माहिती काढली.
त्यांच्या संधोधनानंतर हे स्पष्ट झाले की, ही पाण्याच्या तळाखाली दिसण्यात आलेली रचना मानवनिर्मित नाही. तर कोणाकडून तरी तयार करण्यात आलेली नैसर्गिक रचना आहे आणि हा कोणीतरी जीवाणू असू शकतो.
शोध पथकाने, त्या पाईपसारख्या दिसणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण केले आहे, जे प्राचीन ग्रीक स्तभांशी साम्य साधतात. जवळपास ५० लाख वर्षांपूर्वी ही भूगर्भीय संरचना तयार होण्याचे काम सुरु झाले, जेव्हा सूक्ष्मजीवांनी समुद्राच्या तळातील मिथेन व्हेंटच्या आसपास क्लस्टर करणे सुरु केले.
जीवाणूंनी मेटाबोलाइझ केले म्हणून ते खनिज डोलोमाईटमध्ये स्तराच्या तळाशी आले. हे सर्व एका रासायनिक प्रक्रियेद्वारे घडते, ज्याला कोक्रीशनिंग असे म्हटले जाते.
जरी यांसारखे समुद्रामध्ये असलेल्या संरचना असामान्य नसल्या, तरी त्या बहुतेक खोल पाण्यामध्येच आढळतात. यामुळे हे समजते की, जी समुद्राच्या पाण्याखाली असलेली ही संरचना आतापर्यंत आपण मानवनिर्मित समजत होतो, ती मानवनिर्मित नसून समुद्र जीव आणि मासे यांचेच एक शहर आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.