' काही काळाने या कामांमध्ये माणसांची जागा रोबोट्स घेऊ शकतात! मग माणसांनी काय करायचे? – InMarathi

काही काळाने या कामांमध्ये माणसांची जागा रोबोट्स घेऊ शकतात! मग माणसांनी काय करायचे?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जगामध्ये सगळीकडेच आता तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असल्याचे आपल्याला दिसून येते. जी कामे करण्यासाठी पहिल्यांदा खूप वेळ आणि लोक लागत होती, ती कामे आता सहज आणि कमी पैश्यामध्ये केली जातात. येणाऱ्या काळामध्ये बहुतेक गोष्टी ह्या ऑटोमॅटिक होतील. आता किचनपासून गाड्यांपर्यंत सर्वच ऑटोमॅटिक होत चा`लले आहेत. आपण कितीतरी दशकांपासून चित्रपटांमध्ये बघत आलो आहे की, जेव्हा रोबोट्स येतील तेव्हा आपले जग कसे होईल. आता तर रोबोट्स बनायला सुरुवात देखील झालेली आहे.

 

Robots will replace these jobs.Inmarathi
trak.in

जगभरामध्ये होणाऱ्या प्रयोगांवर लक्ष दिले तर आपल्याला हे समजेल की, दरदिवशी रोबोट्स बनत चालले आहेत आणि ते काही असे – असे काम करत आहेत ज्यांच्याबद्दल आपण विचार देखील करू शकत नाही. एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, २०२५ पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आपल्या जीवनाच्या एका मोठ्या भागावर प्रभुत्व असेल.

आज आपण अशा काही कामांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर रोबोट्स आपले आधिपत्य गाजवू शकतात. आधीच माणसाना काम मिळणे खूप कठीण होऊन बसले आहे, मग त्यातच या कामांमध्ये माणसांच्या जागी रोबोट्सना रिप्लेस केले गेले तर कितीतरी लोक बेरोजगार होतील !

कंस्ट्रक्शन वर्कर्स

 

Robots will replace these jobs.Inmarathi1
oneindia.com

घर बनवायचे असेल किंवा फॅक्टरी किंवा वेअरहाऊसमध्ये सामान उचलायचे काम असो, ज्यामध्ये जास्त श्रम लागतात. या कामांवर रोबोट्स सर्वात पहिल्यांदा आपला जम बसवतील. हे रोबोट्स अजून जलद आणि ताळमेळ राखत काम करतील. अॅमेझॉनच्या वेअरहाउसेसमध्ये अशाप्रकारची कामे होतच आहेत.

ट्रॅफिक पोलीस

 

Robots will replace these jobs.Inmarathi2
yourstory.com

गेल्या काही दिवसांमध्ये मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये रोबोकॉप नावाच्या ट्रॅफिक कंट्रोल रोबोटने काम करण्यास सुरुवात केली आहे. हा रोबोट सिग्नल आणि ट्रॅफिक पोलीस या दोघांसारखे देखील काम करतो. हा रोबोट रस्त्यांवर होणाऱ्या प्रत्येक क्रियेवर लक्ष ठेवतो आणि कंट्रोल रूमपर्यंत सर्व माहिती पोहोचवतो. हे तर नक्की आहे की, या तंत्रज्ञानावर अजून काही काम होईल आणि ही अजून प्रगत होईल.

वकील

 

Robots will replace these jobs.Inmarathi3
theweek.in

रोबोट्स एवढ्या सहजतेने वकिलांची जागा घेऊ शकत नाहीत. पण त्यांच्या सपोर्टिंग स्टाफचे काम ते जरूर करू शकतील. कोणतीही केस फाईल करणे, कॉन्ट्रॅक्ट बनवणे किंवा पार्किंग फाईनसारख्या छोट्या – मोठ्या प्रकरणांना हाताळणे ही कामे करू शकतात.

टेलीमार्केटिंग आणि कस्टमर सर्व्हिस

 

Robots-will-replace-these-jobs.Inmarathi4.
bluevalleytelemarketing.com

आपल्यातील बहुतेकांनी पहिले असेल की, या प्लॅटफॉर्मवर चॅटबोट्सचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान अजून प्रगत करण्यासाठी काम चालू आहे. लवकरच हे बोट्स टेलीमार्केटर्स आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या जागेवर दिसू शकतात.

ज्वेलर्स, प्रेशियस स्टोन वर्कर्स

 

Robots will replace these jobs.Inmarathi5
hamstech.com

येणाऱ्या काळामध्ये ज्वेलर्स, मौल्यवान हिरे आणि मेटल इत्यादींचे काम करणाऱ्यांचा धंदा मंदावेल. आकड्यांनुसार, यामुळे यांच्या रोजगारामध्ये १० टक्क्यांपर्यंत कमतरता येणार आहे आणि २०२२ पर्यंत रोबोट्स ज्वेलरी डिझाईन करणे आणि सुधारण्याच्या कामामध्ये मदत करतील.

क्रिकेट पंच आणि रेफरी

 

Robots will replace these jobs.Inmarathi6
indianexpress.com

क्रिकेट आणि टेनिससारख्या खेळांमध्ये मुख्य पंचाच्या मदतीसाठी कंप्यूटराइज्ड ‘हॉक – आय’ पंचाची मदत घेतली जाते. याच्या मदतीने ही स्थिती सोप्याप्रकारे स्पष्ट होते. आता तर ही फक्त एक सिस्टम आहे, पण अजून प्रगत झाल्यावर हे खूप काही करू शकते.

ड्रायव्हर्स

 

Robots will replace these jobs.Inmarathi7
i.blogs.es

गुगल, टेस्ला आणि उबेर यांसारख्या कितीतरी मोठ्या कंपन्या ड्रायव्हरलेस कार बनवण्याच्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. नुरो (Nuro) स्टार्टअपने एक सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवली आहे, जी सामान एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहोचवते. ऑडी देखील एक अशीच ड्रायव्हरलेस कार बनवत आहे.

कॅशियर

 

Robots will replace these jobs.Inmarathi8
jerrymabbott.files.wordpress.com

आता बँकांमध्ये बहुतेक ठिकाणी पैसे भरण्यासाठी एक खास प्रकारची मशीन लावण्यात आलेली आहे. तसेच, जगभरामध्ये कितीतरी स्टोर्सवर सेल्फ चेकआउट डेस्क बनलेले आहेत, जिथे ग्राहक स्वयंचलित पद्धतीने आपली बिले भरतात. त्यामुळे कॅशियर ऑटोमेटेड होण्याचे लक्षण ९७.१ टक्के आहे.

अशा ह्या आणि इतर काही कामांचा ताबा लवकरच माणसांऐवजी रोबोट्स घेऊ शकतात आणि त्यामुळे माणसांना काही समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?