चहाच्या प्रेमापायी नोकरी सोडून टाकले चहाचे दुकान; ज्यातून उभा झाला २२७ कोटीचा व्यवसाय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
चहा हा भलेही इंग्रजांनी भारतात आणला असेल, तरी आज तो जगात भारतीय चहा म्हणूनच प्रसिद्ध आहे. कारण भारतात ज्या प्रकारे चहा बनविला जातो तसा जगात आणखी कुठेही मिळणे शक्य नाही. म्हणूनच कदाचित अनेक विदेशी हे देखील ह्या भारतीय चहासाठी वेडे आहेत.
भारतात तर प्रत्येक दुसरी व्यक्ती ही चहा प्रेमी असते. चहा म्हटलं की सर्वांच्याच तोंडून होकार येतो, काही लोकांना तर चहाचं व्यसन जडलेलं असतं. पण हे चहाचं व्यसन भक्त भारतीयांनाच नाही तर विदेशी लोकांनामध्येही आता पसरताना दिसत आहे.
ह्या व्यसनापायी एका विदेशी महिलेने चक्क एक चहा कंपनी सुरु केली. २०१८ मध्ये त्यांच्या ह्या कंपनीचा महसूल अंदाजे सात मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २२७ कोटी एवढा आहे.
अमेरिकी महिला Brook Eddy ह्या देखील एक चहा प्रेमी आहेत. त्यांचं चहावरील प्रेम हे एवढं प्रबळ होतं की, त्यांनी २००७ ‘भक्ती चहा’ नावाने एक चहा कंपनीच सुरु केली. त्यांनी ही कंपनी सुरु करण्यामागे एक कारण होतं, ते म्हणजे जेव्हा Brook Eddy भारतातून अमेरिकेत परतल्या तेव्हा त्यांना चहाचे वेड जडले.
त्यामुळे त्यांनी भारतात मिळणारी चहा बनविण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या त्यात अयशस्वी ठरल्या. म्हणून मग त्यांनी ही कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेच्या एका साप्ताहिक नियतकालिकानुसार, Brook Eddy ह्यांना चहाचे वेड तेव्हा लागले जेव्हा त्या २००२ साली भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. पण २००६ साली जेव्हा त्या परत त्यांच्या मायदेशी म्हणजेच अमेरिकेतल्या कॉलोराडो परतल्या तेव्हा त्यांना तेथे भारतीय चहा मिळाला नाही.
ह्या दरम्यान त्या भारतीय चहासाठी अक्षरशः त्रासल्या होत्या, पण कॉलोराडो येथील कुठल्याच कॅफेमध्ये त्यांना तसा चहा मिळाला नाही. म्हणून त्यांनी २०१६ साली स्वतःची एक कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. ज्याला भक्ती चहा असे नावं देण्यात आले.
आपल्या ह्या कंपनीसाठी त्या नेहेमी भारतात आल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या कारच्या मागे एक ठेला जोडून त्यावर मेसनच्या बरण्या (Mason Jars) विकण्यास सुरवात केली. काहीच दिवसांत त्यांच्या ह्या प्रयत्नाला यश आले.
लवकरच त्या लोकप्रिय झाल्या. त्याच्या एका वर्षाच्या आतच भक्ती चहा ह्या कंपनीने आपली पहिली वेबसाईट लॉन्च केली. त्यानंतर कारने फिरणारी ही कंपनी एक मोठा बिझनेस बनली.
Brook Eddy ह्यांचा जन्म एका हिप्पी कुटुंबात झाला, तर मिशिगन येथे त्या मोठ्या झाल्या. त्या सांगतात की, त्यांना भारतीय कल्चर खूप आवडत आणि त्यांना भारतीय लोकांबद्दलही खूप आपुलकी वाटते. पुढे त्या सांगतात की, मी जेवढ्या वेळा भारतात आली तेवढ्या वेळा मी काही ना काही येथून शिकून गेली.
Brook Eddy ह्या जुळ्या मुलांच्या सिंगल मदर आहेत. तरी त्यांनी आपल्या ह्या चहा प्रेमापायी आणि चहाच्या ह्या व्यवसायासाठी आपली नोकरी देखील सोडली. जेणेकरून त्या चहा बनविण्याची पद्धत शिकून भारतीय चहाला इतर लोकांपर्यंत पोहोचू शकतील. एवढंच नाही तर त्या ह्या व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक स्तरावर आणि पर्यावरणीय स्तरावर काम करत आहेत.
ह्याशिवाय त्यांनी ‘GITA – Give, Inspire, Take Action’ नावाची एक संस्था देखील सुरु केली आहे. ज्याचा हेतू बेघर आणि निराधार, तसेच विविध कारणांमुळे निराधार झालेल्या लोकांना मदत करणे हे आहे. अश्या लोकांच्या मदतीसाठी आजवर ह्या संस्थेमार्फत ५ लाख डॉलर म्हणजेच ३ कोटीहून जास्त रुपयांचं दान दिले आहे.
आज भारतीय चहा हा कुठवर पोहोचला आहे आणि त्यात किती ताकद आहे ह्याचं भक्ती चहा हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.