‘इलेक्ट्रॉनिक’ नाकाच्या मदतीने आता आपला गंध ओळखून अनलॉक होणार स्मार्टफोन !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
स्मार्टफोन्स हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहे. आज आपली सकाळ ही ह्या स्मार्टफोनचं तोंड बघूनच होते आणि रात्र ही देखील ह्याच्याच सहवासात जाते. दिवसभरातील कितीतरी वेळ आपण आपल्या ह्या स्मार्टफोनला देतो. ह्याचं वाढतं क्रेझ लक्षात घेता त्याची उपयोगिता आणखी वाढविण्यासाठी आज मोबाईल कंपन्या वेगेवगळे अॅप्लिकेशन बनवीत आहेत. आता तर एक असं अॅप्लिकेशन तयार होत आहे जो व्यक्तीच्या गंधाची ओळख करून त्याचे विश्लेषण करेल.
हा शोध इज्राइल येथे लागला आहे, येथील एका कंपनीने इलेक्ट्रॉनिक नाक बनविण्याचा दावा केला आहे.
ह्या अॅपच्या माध्यमातून, व्यक्तीचा गंध ओळखून फसवणूक होण्यापासून वाचले जाऊ शकते. कंपनी नॅनोसेंट चे सहसंस्थापक ऑरेन गॅवरिली आणि इराण रोम सांगतात की, हा सेन्सर गंधाच्या आधारे वेगेवेगळे संकेत देऊ शकतो. ज्यामुळे कॉस्मॅटिक, परफ्यूम आणि साबणाची तपासणी करण्यास मदत होईल. एवढेच नाही तर, गंधांशी संबंधित अनेक प्रकारचे अनुप्रयोग देखील होऊ शकतात.
ह्या इलेक्ट्रॉनिक नाकाच्या मदतीने स्मार्ट डिवाईसना वासावरून लॉक-अनलॉक करणे सोप्पे होईल. इतर कुठल्याही सिस्टीमच्या तुलनेत हे जास्त सोयीस्कर ठरेल. आतापर्यंत जेवढ्या लॉकिंग सिस्टीम तयार करण्यात आल्या आहेत त्यांना सहजपणे हॅक करण्यात आले आहे. पण विशेषज्ञांच्या मते येणाऱ्या काळात ह्या अॅप्लिकेशनचा वापर आपण अनेक क्षेत्रात करू शकतो, आणि ते इतर सिस्टीमच्या तुलनेत जास्त सुरक्षित असेलं.
सध्या स्मार्टफोन्सना आणखी स्मार्ट बनविण्यासाठी अनेक अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहेत. ह्याचे वेगवेगळे उपयोग आहेत, ज्याने आपलं जीवन अधिक सोयीस्कर झालं आहे. आज आपण आपल्या स्मार्टफोनवर हवं ते करू शकतो. पण त्यासोबतच तो सुरक्षित असणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. ह्या इलेक्ट्रॉनिक नाकाच्या मदतीने आता आपला स्मार्टफोन आणखी स्मार्ट नक्कीच होईल.
सध्या हे तंत्रज्ञान पूर्णपणे तयार व्हायला अजून वेळ आहे. त्यावर प्रयोग होणे बाकी आहे. पण जर हे तंत्र वापरात आले तर नक्कीच ह्याचा फायदा आपल्याला आपला स्मार्टफोन आणि त्यातील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी होणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.