Site icon InMarathi

या फोटोग्राफरने ‘पक्षाच्या नजरेतून’ टिपलेले सुंदर फोटो थक्क करून टाकतात !

finland-inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आज आपल्या सर्वांजवळ स्मार्टफोन्स आहेत, ज्याचा आपण अनेक पद्धतीने वापर करतो. ह्याने आपले जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे. ह्याचं स्मार्टफोन्समध्ये असे अशी गोष्ट आहे जी त्याला आणखीनच उपयोगी बनवते. ती म्हणजे कॅमेरा. कॅमेरा हे एक असे फिचर आहे ज्याशिवाय आपल्या सर्व गोष्टी ह्या अपूर्णच. सकाळच्या चहापासून ते कोणाला भेटलो, कुठे गेलो, काय केलं, ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही आपण ह्या कॅमेऱ्याने कॅप्चर करतो. पण कधी कधी ह्यासार्वंत आपण एक महत्वाची गोष्ट विसरतो आणि ते म्हणजे, “फोटोग्राफी ही एक कला आहे.”

पण आजच्या ह्या स्मार्टफोन्सच्या युगात हातात जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा आला आणि त्यातील काही फीचर्स माहित झाले की सर्वांनाच आपण उत्कृष्ट फोटोग्राफर झाल्यासारखं वाटतं. पण असं नसतं. फोटोग्राफर तो असतो, जो प्रत्येक वस्तूकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या वस्तूची किंवा जागेची, परिस्थितीची एक नवी बाजू जगापुढे मांडतो.

 

 

असचं काहीसं Jani Ylinampa ह्या फोटोग्राफरने करून दाखवलं आहे. Jani Ylinampa हे एक फिनिश निसर्ग छायाचित्रकार आहेत. त्यांनी घेतलेले फोटो बघून तुम्हाला कळेलच की ते निसर्ग छायाचित्रकार म्हणून किती उत्कृष्ट आहेत. Jani Ylinampa ह्यांची विशेषता म्हणजे ते सूर्यास्त, नद्या, डोंगर, झरे आणि जंगल इत्यादी निसर्गाला एका वेगळ्याच प्रकारे आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.

नुकतच Jani Ylinampa ह्यांनी फिनलंड येथील Kotisaari ह्या बेटाचे काही अविस्मरणीय फोटोज आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. ह्या फोटोजचे वैशिष्ट्य म्हणजे Jani Ylinampa ह्यांनी ह्या बेटाचे फोटो हे Aerial View टेक्निकने घेतले. आणि त्यांनी ह्या फोटोद्वारे ह्या बेटावरील निसर्गाच्या प्रत्येक ऋतूला एका अविस्मरणीय फोटोत कैद केले. त्यांनी उन्हाळा, हिवाळा, शरद आणि वसंत ऋतुत ह्या बेटावरील वातावरण कश्यापद्धतीने बदलत ते दाखवलं आहे.

१. उन्हाळा :

 

२. वसंत ऋतू :

 

 

३. हिवाळा :

 

 

४.  शरद ऋतू:

 

फोटोग्राफर फोटो काढत नाही, तर तो फोटो बनवतो. अशा अर्थाची एक म्हण आहे इंग्रजीत. हे फोटो पाहिल्यावर ती म्हण तंतोतंत खरी असल्याची खात्री पटते.

आहे ना एकदम जबरदस्त फोटोग्राफी…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version