जुन्या नोटांवर बंदी आणण्याच्या निर्णयामागे ६ महिन्यांची गुप्त कार्यवाही!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
सोशल मिडीयावरील नेहेमीसारखाच एक दिवस. कुणी मोदींवर सर्जिकल स्ट्राईक वरून शिव्या घालतंय तर कुणी त्यांच्या भाषणांवरून खिल्ली उडवतंय. कुठल्या तरी कोपऱ्यातून काळ्या धनाच्या कारवाईबद्दल “कधी होणार कार्यवाही?” असा छद्मी प्रश्न विचारला जातोच आहे. अशा वेळी संध्याकाळी मोदीजी टीव्ही वर लाईव्ह येणार म्हणून बातमी येते.
मन की बातचं कवतिक कमी झाल्या सारखं वाटतंय म्हणून एवढं कुणी ते मनावर पण घेतलं नाही. 6.30 ला मोदी टीव्ही कॅबिनेट मिटिंग घेतात आणि ती तशीच स्थगित करून टीव्ही वर येऊन धडाम! धमाका
500 आणि 1000 च्या नोटा सध्या सरळ कागदासारखी करून सोडतात…! ५०० आणि १००० ची Currency Ban करून!
सोशल मिडीयावर पोस्ट्स, कमेंट्स, मेसेजेस चा अक्षरशः पाऊस पडतो. मोदी समर्थक सोडाच, विरोधक/टीकाकारदेखील ह्या निर्णयाने एकीकडे स्तिमित झालेले असतात तर दुसरीकडे आनंद व्यक्त करतात…!
पण एक प्रश्न सगळ्यांना पडून सुद्धा दुर्लक्षित राहतो. एवढ्या मोठ्या निर्णयाची अमलबजावणी सर्व इतक्या गुप्तपणे, इकडची बातमी तिकडे कळू नं देता कशी जमली? घोषणेच्या काही दिवस आधी २००० ची नोट घोषित केली गेली – घोषणा केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून २ दिवस बँका बंद ठेवल्या गेल्या. त्यांच्यापर्यंत २००० च्या नोटा पोहोचवल्या गेल्या…ह्यासाठी प्रचंड तयारी लागली असणार…आणि एवढी तयारी करून ही बातमी फुटली कशी नाही?
मोदींचा निर्णय म्हणजे एक चमकलेली वीज वाटत असावी बऱ्याच जणांना. पण तसं नाहीये. हा मुत्सद्दी नेता गेल्या बऱ्याच दिवसांपासून ही मोहीम डोक्यात ठेवून होता. ह्यावर मोदीजींनी सहा महिन्यांपासून काम सुरु केलं होतं.
ह्यावर मोदीजींनी फक्त तिघांसोबत चर्चा केली. रिजर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल, भारताचे आर्थिक व्यवहार सचिव शक्तीकांत दास आणि गुंतवणूक व चलन सचिव डॉ. सौरभ गर्ग.
ह्या चौघांच्या चर्चा रात्री उशिरापर्यंत चालायच्या आणि कुणालाच कानोकान खबर नसायची. अगदी मोदींच्या कॅबिनेट मध्ये सुद्धा कुणालाच ह्या प्लॅन ची कल्पना नव्हती.
सर्वात महत्वाचं काम होतं ते सौरभ गर्ग ह्यांचं.
त्यांनी सहा माहिन्यांआधी 1000 च्या नोटांची छपाई बंद केली आणि गुप्तपणे 2000 च्या नवीन नोटांची छपाई सुरु केली. हे सगळं कुणालाही गळती नं होता घडवून आणल्याचं श्रेय गर्ग ह्यांनाच जातं.
मोदीजींनी घोषणा करण्याच्या आधीच काही आठवडे एक सर्क्युलर काढलं होत ज्यात –
“कॅबिनेट मिटिंग ला कुणीच मोबाईल फोन आणू नये”
असं कटाक्षाने नमूद केलं होतं. ह्याने मिटिंग मध्ये असलेल्या कॅबिनेट आणि बाकी लोकांचा मीडिया शी संपर्क तुटला.
घोषणेचं सर्क्युलर सुद्धा ज्या मशीन मधून केंद्रीय अर्थसंकल्प छापण्यात येतो त्यातून छापलं होत. आणि जी लोकं ह्यावर काम करत होती त्यांना संपूर्ण वेळ बाहेरच्या जगापासून अलग ठेवण्यात आलं होतं. म्हणजे ह्याबद्दल कुणाकडे माहिती पसरण्याच्या भीतीला संपुर्णपणे संपवलं होतं.
महत्वाचं म्हणजे कॅबिनेट ला बेसावध असताना ह्या हालचाली करणे!
घोषणेच्या दिवशी कॅबिनेट मिटिंग चा अजेंडा सुद्धा – “जपान दौऱ्यातील MoU बद्दल चर्चा करण्यासाठी” असा होता. त्यामुळे
कॅबिनेट मधल्या एका मंत्रांनी ह्याबद्दल बोलतांना सांगितलं,
आम्हाला तर मिटिंग च्या आधी 10 मिनिटे ह्याबद्दल माहिती मिळाली. सरकारसाठी हा एक खूप धिटाईचा निर्णय होता. सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी जोवर मोदींचं भाषण संपत नाही म्हणजे 6.47 p.m. ते 9.00p.m. मिटिंग हॉल मध्येच राहून आपलं सहकार्य दिलं.
आजच्या युगात, जिथे बातमी फुटून इंटरनेट वर वणव्यासारखी पसरते, तिथे एवढा मोठा प्लॅन साकार करून मोदींनी खरंच एक surprise दिलंय. आणि ह्या surprise मुळेच हा निर्णय परिणामकारक असणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.