Site icon InMarathi

एखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते? जाणून घ्या

orangutan-inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काहीच दिवसांआधी केनिया येथील दुर्मिळ आणि त्या प्रजातीच्या सर्वात शेवटच्या पांढरा रायनो सुडान ह्याचा मृत्यू झाला. हा त्याच्या प्रजातीचा शेवटचा नर रायनो होता. त्याच्या मृत्यू नंतर ह्या प्रजातीला विलुप्त जाती म्हणून घोषित करण्यात आले.

 

time.com

पण तरी वैज्ञानिक ही जाती नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी आयविएफ म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी ह्या तंत्रज्ञानावर आस लावून बसले आहेत. कदाचित ह्याचा मदतीने सुडानच्या पुढील पिढीला जन्माला घालता येईल.

वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर (WWF) च्या संरक्षण अभियानाचे प्रमुख कॉलीन बटफिल्ड ह्यांच्या मते ही एक अतिशय वाईट परिस्थिती आहे.

१९५८ साली वैक्विटा नावाच्या एका मोठ्या समुद्री माशाच्या शोध लागला होता. त्यानंतर जावन ह्या प्रजातीच्या गेंड्याचा शोध लागला होता. पण आता ह्या प्रजाती देखील नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत.

 

orangutantrekkingtours.com

त्यासोबतच सुमात्रा येथे आढळणारे गेंडे, काळे गेंडे, अमूर बिबट्या, रानटी हत्ती, आणि बोर्नियो येथील ऑरंगुटेन सारख्या काही प्रजाती आहेत ज्या आता नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत किंवा त्यांची संख्या केवळ १०० च्या घरात आहे.

ह्या पाठोपाठ निसर्गाच्या संरक्षणासाठी बनविण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय संघ (IUCN) ने अश्या काही प्राण्यांच्या जातींची यादि जाहिर केली आहे, जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ह्या यादीनुसार ५,५८३ अश्या प्रजाती आहेत ज्यांना वाचविण्यासाठी काही गंभीर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

bbc.com

२०१७ साली २६ प्रजातींना ह्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ह्या प्रजाती एका वर्षाआधी पर्यंत नामशेष होण्याच्या धोक्यापासून दूर होत्या. वर्ष २०१६ साली IUCN च्या अंदाजानुसार सांगण्यात आले आहे की, आता केवळ ३० वैक्विटा मासे शिल्लक आहेत. आणि पुढील काही दशकांत ही प्रजाती देखील नामशेष होऊन जाईल.

पशु संरक्षणासाठी अभियान चालविणाऱ्यांच्या मते अश्या देखील अनेक प्रजाती असतात ज्या नामशेष झाल्या असे मानले जाते. पण नंतर त्या अजूनही अस्तिवात असल्याचं समोर येते. त्यामुळे ह्या संदर्भात केवळ आकड्यांवर विश्वास ठेवणे बरोबर नाही.

 

audubonnatureinstitute.org

जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांना मोजणे सोप्पे असते त्यासाठी जीपीएस ट्रॅकर, कॅमेरा, हाडांच्या सापळ्यांची गणना, पंजांच्या खुणा इत्यादीवरून ते मोजता येते.

एखादी प्रजाती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कश्या पद्धतीने ठरविले जात असेल?

जर एकाच प्रजातीचे अनेक जीव जेव्हा एकाच ठिकाणी राहायला लागतात. तेव्हा असे मान्य जाते की, कुठल्या आजारामुळे अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे त्या सर्वांचा मृत्यू होऊ शकतो.

भौगोलिकदृष्ट्या ती प्रजाती किती मोठ्या परिसरात पसरलेली आहे हे देखील बघितले जाते. त्यांच प्रजनन चक्र कीती दिवसांच असते? तसेच ते एका वेळी कीती बाळांना जन्म देऊ शकतात हे देखिल बघितले जाते. ते कुठल्या प्रकरच्या आपत्तींना सामोरे जाऊ शकतात. त्या प्रजातीच्या संख्येत अनुवांशिकरित्या विविधता आहे का? ते कुठे, कुठल्या प्रकारच्या धोक्यात राहतात, त्यांना त्यापासून किती धोका आहे हे देखील बघितल्या जाते.  ह्या प्रकारे प्राण्यांची, जीवांची कुठली प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहे हे ठरविले जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version