हे आजोबा ३० वर्षांपासून आहेत ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये. ते सुद्धा निर्जन बेटावर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तुम्ही हृतिक रोशन आणि अमिषा पटेलचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बघितला असेल. त्यात जेव्हा हृतिक आणि अमिषा हे एका बेटावर पोहोचतात. त्यानंतर त्यांचा इतर जगाशी संबध तुटतो आणि त्यांना त्या बेटावर कुठल्याही सुविधेशिवाय रहावं लागतं. हे तर झालं चित्रपटाचं.
मागील काही महिन्यांपासून संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ‘सेल्फ आयसोलेशन’हा शब्द अनेकदा ऐकायला मिळायला. त्याचा अर्थही समजला. पण उपचारासाठी, अनावधनाने आयसोलेशनमध्ये राहणं वेगळं असतं. खऱ्या आयुष्यात आपण स्वतःहून तब्बल ३० वर्षे निर्जन बेटावर एकट्याने राहणं तर दूर. पण कधी कोणी तसा विचार तरी करेल का?
कारण माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तो नेहेमी समूहात राहतो. एकटे राहण्याचा आपण विचार देखील करू शकत नाही. पण एक असे वृद्ध आहेत जे मागील ३० वर्षांपासून एका निर्जन बेटावर एकटे राहत आहेत. तरीदेखील ती व्यक्ती आपल्या सर्वांच्या तुलनेत जास्त आनंदी आहे.
एखाद्या बेटावर एकट राहणे म्हणजे ना मोबाईल, ना टीव्ही, संचाराचे कुठलेही साधन नाही, करमणुकीचे साधन नाही, नीट खायला नाही, जवळपास माणसे नाहीत. कदाचित कुणीही असं राहणे पसंत करणार नाही.
पण Mauro Morandi नावाच्या एका व्यक्तीने हे करून दाखवलं आहे. हे वृद्ध १९८९ पासून Budelli ह्या बेटावर एकटे राहत आहेत. आणि ते अतिशय सुंदर जीवन जगत आहेत.
Mauro ह्यांनी आताच्या आधुनिक जीवनशैलीपासून निराश होऊन ह्यापासून दूर Rosy-Sandy Beach ज्याला La Spiaggia Rosa देखील म्हणतात, तेथे वास्तव्यास राहण्याचा निर्णय घेतला.
आता Mauro ह्यांच्या प्रत्येक दिवसाची सुरवात ही नैसर्गिक सुंदर देखाव्यांपासून होते. त्यांना रोज निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळते. समुद्राच्या लाटा, सूर्याचं कोवळं उन्ह, सर्वत्र हिरवळ, वाहणारा थंड वारा. जे आपण आपल्या सुट्ट्यांसाठी प्लॅन करतो. म्हणजे काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहायसाठी, जे अनुभावायसाठी जिथे आपल्याला व्हॅकेशन प्लॅन करावं लागतं, ते अनुभव Mauro हे रोज घेतात.
एवढ्या वर्षांपासून Mauro हे आपलं हे जीवन अगदी गूढपणे जगत होते. पण मागील काही वर्षांआधी त्यांनी त्यांचे हे अनुभव सोशल मिडीयावर शेअर करण्याचा निर्णय घेतला.
Mauro ह्यांची एक प्रेयसी देखील होती. जी वर्षातून १५ दिवस त्यांच्याकडे येऊन राहायची. पण नुकतच त्यांनी त्यांच्या प्रेयसीशीदेखील आपलं नातं तोडलं.
येथे राहून त्यांनी आजवर ह्या बेटावरील १,३०० पर्यटक जागांचा फेरफटका मारला आहे. Mauro ह्यांच्या दोन मुली आहेत ज्यांना भेटण्यासाठी ते कधी-कधी Modena येथे जातात.
अलिकडच्या काही दिवसांत हे आजोबा सोशल मिडियावर ॲक्टिव्ह झाले आहेत. इन्स्टाग्रामवर ते समुद्राची अतिशय सुंदर सुंदर छायाचित्रे पोस्ट करत आहेत. शिवाय त्यांचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत त्यांचे इन्स्टाग्रामवर ६१ हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
ह्याबाबत डेली मेलशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,
“जर कधी मला ईथून जावे लागले तर कदाचित मी Sardinia येथे जाईल, आणि तिथल्या समुद्र किनारी राहायला मला आवडेल. पण मी आता पुन्हा शहरांकडे परतणार नाही.”
तर रिपोर्टनुसार,२०१६ मध्ये सरकारने हे बेट हस्तगत करून त्याला La Maddalena National Park मध्ये समाविष्ट केले.
आपण नेहेमी एक समाधानी, सुखी जीवन जगण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो. दिवसरात्र धावाधाव करत असतो. पण तरी आपण किती समाधानी जीवन जगतो ? आपण आधुनिकीकरणाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की निसर्ग काय असतो, तो किती सुंदर असू शकतो आपण हेच विसरलो आहोत. पण Mauro ह्यांना कदाचित हे खुप चांगल्याने गवसले असावे…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.