Site icon InMarathi

भारतातले हे १० विचित्र पण महत्वाचे कायदे प्रत्येकाला ठाऊक असायलाच हवेत!

akshay kumar featured inmarathi

the indian express

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण ज्या देशात राहतो त्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेबाबत आपल्याला संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे असते. कारण ते आपल्यासाठीच असतात.

पण असे काही कायदे देखील असतात जे खूप लोकांना माहित नसतात. ते जाणून घेणे आपल्यासाठी गरजेचे असते. काही कायदे अत्यंत आवश्यक आहेत तर काही कायदे तितकेसे महत्वाचे वाटत नाहीत, पण त्यांचे पालन हे केलेच गेले पाहिजे!

असेच काही भारतातील कायदे आहेत जे कदाचित तुम्हाला माहित नसतील पण ते जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय गरजेचे आहे.

 

१. एक मुलगा असताना दुसरा मुलगा किंवा एक मुलगी असताना दुसरी मुलगी दत्तक घेता येत नाही.

 

 

आपल्या देशात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही समजूत प्रचंड खोलवर रुतून बसली आहे. त्यातून लोकांनी बाहेर पडावे यासाठी कित्येक संस्था आणि एनजीओ कार्यरत आहेत!

शिवाय सध्याच्या विस्कळीत जीवनशैलीमुळे बरीच जोडपी मूल होऊ देत नाहीत. अशावेळी अशा अनेक जोडप्यांचा कल मुले दत्तक घेण्याकडे असतो.

एखाद्या जोडप्याला एक मुलगा आहे आणि त्यांना आणखी एक मूल दत्तक घ्यायचे असेल, तर ते मुलाला दत्तक घेऊ शकत नाहीत. कारण कायद्या अंतर्गत ते मान्य नाही.

हिंदू अडॉप्शन अँड मेन्टेनन्स अॅक्ट  १९५६ नुसार, विवाहित जोडपे एकाच लिंगाच्या दोन मुलांना दत्तक घेऊ शकत नाही. म्हणजे जर त्या जोडप्याला आधी मुलगा असेल, तर त्यांना मुलीलाच दत्तक घ्यावे लागेल.

 

२. महिला ह्या तक्रारी ईमेलद्वारे देखील करू शकतात.

 

 

महिलांकरिता हा कायदा खरच फायदेशीर ठरणारा आहे. जर एखादी महिला ही तिची तक्रार नोंदविण्याकरिता पोलीस ठाण्यात जाऊ शकली नाही तर ती डेप्युटी कमिश्नर किंवा पोलीस कमिशनरला आपली तक्रार ईमेल किंवा रजिस्टर्ड पोस्ट पाठवू शकते.

 

३. कुठलीही व्यक्ती कुठल्याही हॉटेल मधून पाणी घेऊ शकते किंवा तिथले बाथरूम वापरू शकते.

 

 

इंडियन अॅक्ट १८६७ नुसार कुठलीही व्यक्ती कुठल्याही हॉटेलमधून स्वतःसाठी किंवा स्वतःच्या पाळीव जनावरांसाठी मोफत पाणी मागू शकते. तसेच ती हॉटेलचे बाथरूम वापरू शकते.

 

४. संपत्ती खरेदी केल्यावर त्याची सार्वजनिकरित्या सूचना देणे.

 

 

हा कायदा कदाचित अनेकांना ठाऊक असेल. जेव्हा तुम्ही कुठलीही स्थावर संपत्ती म्हणजेच जमीन किंवा घर खरेदी करता तेव्हा त्याची सूचना ती वृत्तपत्रातून देणे गरजेचे असते.

तुम्ही ती कुठल्याही वृत्तपत्रात देऊ शकता.

 

५. लग्नाला एक वर्ष होईपर्यंत घटस्फोटाचा अर्ज देता येत नाही.

 

 

हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १४ नुसार कुठल्याही विवाहित जोडप्याला लग्नाला एक वर्ष होईपर्यंत घटस्फोट घेता येत नाही. लग्नाला एक वर्ष होइपर्यंत ते घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकत नाही.

 

६. सिलेंडरचा स्फोट झाल्यास भरपाईची मागणी करता येते…

 

 

जर घरातल्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाली, तर तुम्ही उपभोक्त्या कंपनीकडे ४० लाखापर्यंत भरपाईची मागणी करू शकतात.

 

७. एका दिवसाला एकदाच दंड आकारला जाऊ शकतो.

 

 

एखादा कायदा तोडल्यावर जर तुम्हाला त्याकरिता दंड भरावा लागला असेल तर त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चुकीकरिता दंड भरावा लागत नाही.

पण ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, एकदा दंड भरल्यावर तुम्ही वारंवार कायदे मोडायला मोकळे झालात.

 

८. लिव्ह-इन-रिलेशनशिप हे बेकायदेशीर नाही…

 

 

लिव्ह-इन-रिलेशनशिपला आपल्या देशात अजूनही सामाजिकदृष्ट्या मान्यता मिळालेली नाही. पण तरी त्याला कायद्याची मान्यता प्राप्त आहे.

म्हणजे आपण जरी आपल्या परंपरेनुसार त्याला चुकीचे मानत असलो तरी देखील ह्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही.

 

९. स्त्री पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावे.

 

 

संविधानात नमूद परिच्छेद ३९ (डी) नुसार, स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावे. पण ह्या कायद्याची अमंलबजावणी होताना फारशी दिसून येत नाही.

 

१०. महिला गुन्हेगाराला महिला पोलिसच अटक करू शकतात.

 

 

अनेकदा असे बघायला मिळते की, महिलांना देखील पुरुष पोलीस अटक करतात. पण कायद्यानुसार कुठलाही पोलीस अधिकारी महिलेला अटक करू शकत नाही. तर त्यासाठी स्त्री पोलीस असणे गरजेचे असते.

तसेच सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत स्त्रियांना अटक केली जाऊ शकत नाही.

तर हे काही महत्वाचे कायदे आपल्याला एक भारतीय म्हणून माहिती असायलाच हवे. आणि जर माहित नसतील तर आपल्या गरजेच्या सर्व कायद्यांची माहिती करुन घ्यायलाच हवी.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version