' रेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” ! – InMarathi

रेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मुंबई लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. या लोकलवर होणारा कोणताही परिणाम सरळ – सरळ मुंबईच्या जीवनावर परिणाम करतो. पावसाळ्यामध्ये लोकल ठप्प झाल्यास किंवा इतर वेळी एखादा अपघात झाल्यास ही मुंबईची लाईफलाईन थांबते आणि मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. त्यामुळे नेहमी रेल्वे प्रशासन ह्या लोकलला सुरळीत चालू ठेवण्याच्या मागे असते आणि त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यामागे त्यांचा कल असतो.

 

Wadala experiment stopped railway track crossing accidents.Inmarathi
mhlivenews.com

मुंबईच्या लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. ही लोकल आपल्याला कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपल्या निश्चित स्थळी पोहोचवते. त्यामुळे रिक्षा किंवा बसचा पर्याय सहसा लोक निवडीत नाहीत. नुकत्याच विद्यार्थ्यांनी केलेल्या एका आंदोलनामध्ये त्यांनी माटुंगा स्टेशनवर लोकल थांबवल्या होत्या, त्यामुळे त्या दिवशी काही प्रमाणात वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता.

आज आपण एका अशा प्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्यामुळे रेल्वेचे होणारे अपघात हे ७५ टक्क्यांनी कमी झाले. हा प्रयोग हार्बर रेल्वेच्या वडाळा स्थानाकाजवळ करण्यात आलेला होता, ज्याच्यामुळे मुंबई लोकलला चांगला फायदा झाला.

 

Wadala experiment stopped railway track crossing accidents.Inmarathi1
indiarailinfo.com

भारतीय रेल्वेचा वडाळा प्रयोग हा एक मनोवैज्ञानिक प्रयोग होता. ज्याच्यामुळे रेल्वे ट्रॅक पार करतेवेळी होणाऱ्या अपघातांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे. मुंबईच्या वडाळा या व्यस्त रेल्वे स्थानकाच्या भागामध्ये हा प्रयोग करण्यात आलेला होता, जिथे रेल्वे अपघात खूप मोठ्या प्रमाणावर होत असत.

लोकांच्या मेंदूवर आणि मनावर एक वेगळ्याच प्रकारचा प्रभाव टाकणाऱ्या या प्रयोगाला मुंबईच्या फायनल माईल (Final Mile) नावाच्या कंपनीने रेल्वे बरोबर मिळून केले. रेल्वे ट्रॅक पार करण्याच्या घाईमध्ये अचानक रेल्वे समोर येते आणि त्यामुळे अपघात घडून येतो. पण असा निर्णय लोक का घेतात, याच्यामागे तीन मुख्य मनोवैज्ञानिक कारणे आहेत. याच कारणांवर क्रिएटिव्हपणे तोडगा काढला आहे.

होणाऱ्या परिणामांची कल्पना नसणे

 

Wadala experiment stopped railway track crossing accidents.Inmarathi2
livemint.com

रेल्वे ट्रॅक पार करतेवेळी आपल्या सामोर दोन निर्णय असतात, ते म्हणजे एक तर तिथेच थांबा किंवा पुढे पळा. पण यामध्येच आपण बरोबर काय आणि चुकीचे काय याचा निर्णय आपल्याला घेता येत नाही आणि त्यांच्या होणाऱ्या परिणामांची आपल्याला कल्पना देखील नसते. याच्यावर उपाय म्हणून रेल्वेने काही पोस्टर्स लावले, ज्यामध्ये एक मनुष्य ट्रेनच्या खाली येत आहे. हे पोस्टर अशा जागांवर लावण्यात आले, जिथे सर्वात जास्त अपघात होतात. हे पोस्टर लावण्याचा परिणाम असा झाला की, तिथून जाताना लोकांची नजर त्या पोस्टरवर पडत असे आणि संभाव्य अपघाताची कल्पना करत ते अलर्ट होत असत.

Leibowitz Hypothesis

या हायपॉथिसिसने हे सिद्ध करण्यात आले आहे की, लोकांना जोरात येणाऱ्या मोठ्या वस्तूंपेक्षा लहान वस्तूंची जास्त भीती वाटते. हा मनुष्याच्या विकासाचा परिणाम आहे, कारण अश्मयुगीन काळामध्ये हत्ती, उंट यांच्याऐवजी माणसांना सिंह, वाघ, चित्ता यांच्यापासून जास्त नुकसान होत असे.

 

Wadala experiment stopped railway track crossing accidents.Inmarathi3
wp.com

लोक समोरून जलद गतीने येणाऱ्या रेल्वेचे योग्यप्रकारे अंदाज लावू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून असे करण्यात आले की, जलद गतीने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज लावता यावा म्हणून काही अंतरावर रेल्वे ट्रॅक्सवर पिवळ्या रंगाचा कलर दिला गेला. ह्या पिवळ्या ट्रॅक्सने एखाद्या बोल्ड मार्करसारखे काम केले. यामुळे लोकांना अंदाज मिळू लागला की, त्यांना पार करणारी रेल्वे किती वेगाने त्यांच्या जवळ येईल.

रेल्वेचा हॉर्न ऐकू न येणे

आपण एकेवेळी फक्त एकाच आवाजावर योग्यप्रकारे फोकस करू शकतो. जर एकाचवेळी कितीतरी आवाज एकत्रित ऐकू येत असतील तर आपला मेंदू खूप आवाजांना ऐकूनही न ऐकल्यासारखे करतो. कितीतरी वेळा असे होते की, रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आजूबाजूच्या आवाजामध्ये एकत्रित होतो आणि आपले लक्ष हॉर्नच्या आवाजावर राहत नाही.

 

Wadala experiment stopped railway track crossing accidents.Inmarathi4
indiamart.com

याच्या उपायासाठी संभाव्य अपघात होणाऱ्या क्रॉसिंग पाँइंटच्या १२० मीटर आधी एक विसल बोर्ड (Whistle board) लावले गेले. रेल्वे चालकाला निर्देश केले गेले की, या विसल बोर्डपासून पुढे जात असताना एक मोठा लांब हॉर्न वाजवण्यापेक्षा थोड्या – थोड्या अंतराने दोन हॉर्न वाजवा. याप्रकारे हॉर्न वाजवल्यामुळे लोकांचे लक्ष हॉर्नकडे जाते.

चालत्या रेल्वेमधून थोड्या अंतरावर दोन आवाजांमधील आवाजाच्या तीव्रतेमधील अंतर जाणवू शकते. यामुळे लोक हा अंदाज लावण्यामध्ये सक्षम होतात की, रेल्वे आता जवळ आलेली आहे.

अशाप्रकारे रेल्वेने एकदम साध्या पद्धतीने या उपाय योजना करून वडाळा क्षेत्रामध्ये अपघातांची संख्या ७० ते ७५ टक्के कमी झाली आहे आणि या अपघातांमुळे रेल्वेला होणाऱ्या नुकसानामध्ये देखील कमी झाली आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग अपघात रोखण्याच्या योजनेसाठी भारतीय रेल्वेने ५० कोटी रुपये ठरवले होते, पण ह्या योजना केल्यामुळे हे काम काही हजारांमध्येच होऊन गेले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?