Site icon InMarathi

भारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेटच्या विश्वचषकाचा थरार सध्या आपण अनुभवत आहोत. कालच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळवत विश्वचषकासाठीची आपली दावेदारी ठळकपणे सिद्ध केली आहे.

ऑस्ट्रेलियासारख्या तुल्यबळ संघाला हरवल्यामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले असणार यात शंका नाही.

या विश्वचषक स्पर्धेत आणखी काय काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

icc.com

आज आम्ही भारतीय ड्रेसिंग रुममधील काही सिक्रेट्स सांगणार आहोत, जे कदाचित तुम्ही कधीही ऐकले नसतील. प्रत्येकजण घरात आणि ऑफिसमध्ये वेगवेगळ्याप्रकारे वागतात.

आपण जसे घर आणि ऑफिसमध्ये वेगवेगळे वागतो, तसे खेळाडू हे मैदानावर आणि ड्रेसिंग रुममध्ये वेगवेगळे वागतात.

ते मैदानामध्ये विरोधी संघाचे कट्टर विरोधक असले, तरी ड्रेसिंग रुममध्ये ते एकमेकांचे मित्र असतात.

रैनाची वैयक्तिक नाराजी

 

mid-day.com

महेंद्रसिंग धोनीपेक्षा रैना हा पाच वर्षांनी लहान आहे, जेव्हा रैनाला धोनी बरोबर बेड शेयर करायला सांगितले तेव्हा ते त्याला आवडले नाही. त्या

च काळामध्ये जेव्हा तो धोनीच्या कॅप्टनशीप खाली खेळला होता, तेव्हा रैनाला अस्खलित इंग्रजी बोलणे जमत नव्हते आणि तसेच त्याला डायनिंग टेबलवर काटे चमचे देखील वापरणे जमत नव्हते.

रैना हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला होता. तसेच, त्याला आपला बेड एका अशा माणसाशी शेअर करायचा होता, जो टीम इंडियाचा सदस्यच नाहीतर एक यशस्वी कर्णधार होता.

गांगुली आणि सचिन यांच्यामधील भांडण

 

ggpht.com

गांगुली आणि सचिन यांची भांडणे काही एकमेकांच्या विरोधात झाली नव्हती. त्यावेळी मॅच फिक्सिंगचे काळे ढग क्रिकेट जगतावर फिरत होते.

९० च्या दशकामध्ये क्रिकेटचे जगताला ही कीड मोठ्या प्रमाणात लागली होती आणि याचा काही प्रमाणात प्रभाव भविष्यावर देखील पडला.

जर तुम्ही सचिनच्या जीवनावर निघालेली सचिन – अ बिलियन्स ड्रीम्स पाहिली असेल, तर तुम्हाला ते छायाचित्र नक्कीच आठवत असेल, ज्यामध्ये ते प्रॅक्टिस सेशन दरम्यान एकमेकांकडे जरा रागाने पाहत आहेत.

ज्या छायाचित्रामुळे काही वाद निर्माण झाले होते आणि लोकांनी त्यावर आपापल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

धोनीने अचानकपणे घेतलेला निवृत्तीचा निर्णय

 

cricketcountry.com

धोनी हा अनिश्चिततेचा राजा आहे. तो कधी कोणता निर्णय घेईल, याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही.

२०१४ मध्ये जेव्हा भारताची ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी मालिका सुरु होती, त्यावेळी धोनीने मध्येच आंतरराष्ट्रीय कसोटी फॉर्ममधून निवृत्तीची घोषणा केली.

आपल्या संघासाठीही हे अविश्वसनीय होते. रहाणे आणि रैना यांनी भावूक होऊन यावर प्रतिक्रिया ही दिली. धोनीचा निर्णय सगळ्यांनाच आश्चर्यात टाकणारा होता.

सचिनचे चक दे इंडिया स्पीच

 

twitter.com

२००३ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने खूप धावा केल्या होत्या, ज्या कोणताही भारतीय आजही विसरू शकत नाही. या स्पर्धेमध्ये त्याने भारताला कितीतरी सामने जिंकवण्यासाठी मोलाची मदत केली.

त्याचबरोबर सचिनने आपल्या टीम मेंबर्सना या स्पर्धेच्या दरम्यान ड्रेसिंग रुममध्ये प्रेरणा देणारे स्पीच देखील दिले होते.

या स्पर्धेमध्ये भारताने लागोपाठ आठ विजय मिळवले होते. पण अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

गांगुलीने युवराज बरोबर केलेला प्रॅन्क

 

assettype.com

युवराज सिंगचा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू गांगुली कर्णधार असताना झाला. २००० मध्ये झालेल्या आयसीसी नॉकआउट टूर्नामेंटमध्ये युवराजचा डेब्यू होणार होता.

सामना खेळण्याचा एक दिवस आधी गांगुलीने युवराजला सांगितले की, तुला उद्या ओपनिंग साठी जायचे आहे.

हे ऐकून युवराजला थोडी भीती वाटली, पण त्यावेळी त्याला हा म्हणण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, कारण हे कर्णधाराने सांगितले होते. त्या रात्री या ओपनिंगच्या विचारामुळे त्याला रात्रभर झोप आली नाही.

पण दुसऱ्या दिवशी युवराजला दादाने सांगितले की, तो फक्त त्याची फिरकी घेत होता. त्याला काही ओपनिंगला जायची गरज नाही.

कपिल देव विरुद्ध दाऊद इब्राहीम

 

thefearlessindian.in

१९८३ मध्ये भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर बुकींची नजर भारतीय संघावर आणि त्यांच्या टीम मेम्बर्सवर पडली. दाऊद इब्राहीमला पहिल्यापासूनच क्रिकेटमध्ये रस होता.

त्याला बहुतेक वेळा क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील सामना पाहताना बघितले गेले आहे.

माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसकर असा दावा केला होता की, १९८६ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दरम्यान दाउद इब्राहीम हा भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता आणि त्यांनी खेळाडूंना जर तुम्ही पाकिस्तानला हरवलात, तर मी तुम्हाला प्रत्येकाला एक कार देईन.

पण हे ऐकून काही कपिल देवला आनंद वैगेरे झाला नाही आणि त्याने त्याला बाहेर जाण्यास सांगितले.

याबद्दल कपिल देवने खुलासा करताना सांगितले होते की, “हा असा मनुष्य नक्कीच आमच्या ड्रेसिंग रुममध्ये एखादी ऑफर घेऊन आला होता, पण ती कारची ऑफर दिली होती हे चुकीचे आहे.”

ह्या आणि अशाप्रकारच्या कितीतरी गोष्टी ड्रेसिंग रुममध्ये घडलेल्या आहेत आणि अजूनही कितीतरी गमती – जमती या ड्रेसिंग रुममध्ये चालूच असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version