आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
काही वर्षांपूर्वीचा काळ आठवा जेव्हा स्वयंचलित वाहने नव्हती, मोबाईल फोन्स नव्हते, टीव्ही/कॉम्पुटर नव्हता, एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या तेव्हा देखील लोक जगायचे. त्यांच्याजवळ आजच्या आपल्यापेक्षा जास्त आठवणी आहेत.
तुमच्या जर लक्षात असेल तर तेव्हाचे लोक हे अगदी ठणठणीत राहायचे. ना जास्त आजार ना काही. नाहीतर आजचे लोक तीशीतच आजारी पडतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे आजची लाइफस्टाईल. तिचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा, ही आजच्या लोकांची सर्वात मोठी समस्या आहे.
त्यासाठी मग लोकं जिम लावतात, डायट करतात, वेगवेगळे प्रयत्न करतात. कारण वजन कमी करण्याचं म्हटलं तर हे सर्व आलंच. वजन कमी करायचं असेल तर खाण्यावर बंधन लावायलाच हवी अस सूत्रच झालं आहे.
पण जिभेवर ताबा ठेवणे हे काही सोप्पे नाही. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, एकाने हे करून दाखवलं आहे. आणि तेही डायट वगैरे न करता. त्यातही त्याने दिवसाला तीनदा बिर्याणी खात हा कारनामा करून दाखवला आहे.
हे करून दाखवलंय हैद्राबादच्या एका तरुणाने. ज्याचं नाव निशांत अप्पारी असे आहे. त्यांनी ५० दिवसांपर्यंत दिवसाला तीनदा बिर्याणी खाल्ली आणि हे करूनही तो फिट आहे.
आता तुम्ही नक्कीच विचार करत असाल की, नेमकं ह्याने काय केलं तरी काय? तर निशांतने स्वतःवर डायट किंवा अति वर्कआउट करण्याचं प्रेशर घेतलं नाही. त्याने आपलं बिर्याणी प्रेम देखील बाजूला सारलं नाही.
त्याने मस्तपैकी दिवसांना तीनवेळा बिर्याणी खाल्ली आणि त्यासोबतच थोडंफार वर्क आउट देखील केलं. पण त्याने फुल बॉडी वर्कआउट न करता केवळ केवळ वरच्या अंगाचाच व्यायाम केला.
आपल्या ह्या प्रयोगात निशांतने जंक फूड देखील खाल्ले. त्यानंतर देखील निशांतने ५० दिवसांत ३ किलो वजन आणि २ इंच कमी केलं.
निशांत हा स्वतः एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. त्याला हा प्रयोग करून हे सिद्ध करायचं होतं की, फीट राहण्यासाठी पुरेसे खाणे देखील महत्वाचे असते.
समजा जर तुम्ही डायट फॉलो करत आहात, म्हणजे तुम्ही दिवस दिवस केवळ सलाड खाऊन जगत आहात पण जर तुम्ही त्या सलाड खाल्ल्याने प्रोड्यूस झालेल्या कॅलरीज बर्न करत नाहीत, तरी देखील तुम्ही लठ्ठ होऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी केवळ डायट करणे किंवा डायट आणि जिम दोन्ही करण्यापेक्षा, प्रमाणात हवं ते खा आणि त्यासोबतीला व्यायाम देखील करा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.