Site icon InMarathi

गणिताच्या क्षेत्रात असामान्य योगदान देणा-या या पाच भारतीय गणितज्ञांबद्दल तुम्हालाही अभिमान वाटेल

ramanujan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

गणित हा तसा तर खूप रोचक विषय आहे पण तो ज्याला कळाला त्यासाठीचं तो रोचक ठरतो हे दुर्दैव आहे. पण ज्यांना हा विषय समजला त्यांच्या बुद्धिमत्तेला विशेष दर्जा प्राप्त असतो असेच म्हणावे लागेल.

आपल्या देशाला देखील गणितज्ञांचा वारसा लाभला आहे. ज्यांनी आपल्या देशालाच नाही तर जगाला गणिताचे धडे दिले. आज त्याच गणितज्ञांचे स्मरण आपण करणार आहोत.

आर्यभट :

 

indiatoday.in

 

आर्यभट ह्यांना भारतातील पहिले गणितज्ञ मानले जाते. ५ व्या शतकात त्यांनी हा सिद्धांत मांडला होता की पृथ्वी गोल आहे, आणि ती सूर्याभोवती परिक्रमा घालते. त्यांनी हे देखील सांगितले होते की, हे करताना पृथ्वीला ३६५ दिवसांचा कालावधी लागतो.

त्यांच्याच नवे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट ह्याचे नावं देण्यात आले होते.

श्रीनिवास रामानुजन :

 

indiatoday.in

 

महान गणितज्ञ म्हणून ख्याती असलेले श्रीनिवास रामानुजन ह्यांनी एकेकाळी त्यांची शाळा सोडली होती.

ते शाळेत असताना जेव्हा ते इंग्रजी ह्या विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी त्यांची शाळा तिथेच सोडली. ह्यानंतर त्यांनी गणितात आपली रुची ओळखली आणि त्याच्या आधारे जगभर प्रसिद्धी मिळविली.

त्यांनी गणिताचे १२० थेरम्स दिले. ज्यासाठी केंब्रिज विश्वविद्यालयातून त्यांना निमंत्रण पाठविण्यात आले. त्यांनी अॅनालिटिकल थिअरी ऑफ नंबर्स, एलिप्टिकल फंक्शन आणि इनफाइनाइट सिरिज वर बरचसं काम केलं.

शकुंतला देवी :

 

educationflash.in

 

भारताची पहिली आणि सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ञ शकुंतला देवी. त्यांना ‘मानवी कॉम्पुटर’ देखील म्हटले जाते. कारण त्या कॅलक्यूलेटर न वापरता गणिताचे मोठ-मोठे कॅलक्यूलेशन्स करायच्या.

६ वर्षांच्या वयात त्यांनी भारतातील मोठ-मोठ्या विश्वविद्यालयांमध्ये आपल्या कौशल्याचे नमुने सादर केले होते.

त्यांचे नवे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्यांनी जगातील सर्वात गतिमान कॉम्पुटर येण्याआधी ५० सेकंदात २०१ चा २३ वा रूट काढून आणि हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता.

सी आर राव :

 

youtube.com

 

सी आर राव ह्यांना आपण सर्व जाणतो, ते त्यांच्या ‘थिअरी ऑफ इस्टीमेशन’ ह्यासाठी प्रसिद्ध आहेत.

सी आर राव ह्यांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला, ते १० बहीण-भावांमध्ये ८ वे होते.

आंध्र विश्वविद्यालयात त्यांनी गणितात एम.ए ची पदवी घेतली. आणि त्यानंतर कोलकोता येथील विश्वविद्यालयातून स्टॅटेस्टीक्स मध्ये देखील एम.ए. पदवीत गोल्ड मिळवले.

त्यांनी एकूण १४ पुस्तकं लिहिली. तसेच मोठ्या जर्नल्समध्ये त्यांचे ३५० रिसर्च पेपर छापून आले आहेत. त्यांची काही पुस्तकं युरोपियन, चीनी आणि जपानी भाषेत भाषांतरीत करण्यात आली आहेत. तर १८ देशांच्या विश्वविद्यालयांनी त्यांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे.

सी एस शेषाद्री :

 

wikipedia.org

 

सी एस शेषाद्री ह्यांनी अलजेब्रिक जीओमेट्रीमध्ये खूप काम केले आहे. मद्रास विश्वविद्यालयातून गणित ह्या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी बॉम्बे विश्वविद्यालयातून पीएचडी पूर्ण केलं.

ह्याव्यतिरिक्त त्यांनी शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट ह्यांचा शोध देखील लावला आहे. ह्यासाठी त्यांना २००९ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version