' मनसे : प्रचंड आशावादी ! – InMarathi

मनसे : प्रचंड आशावादी !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सोशल नेटवर्क वर गुढीपाडव्याला एक जोक फिरत होता त्याचा मतितार्थ असा होता की ..  “पूर्वी मराठी माणूस फक्त दसऱ्याच्या दिवशी बनत असे आता गुढीपाडव्याला ही बनणार आहे” या जोक वर अनेक माध्यमातून प्रतिक्रिया उमटल्या त्या साहजिक होत्या पण त्यातून मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्या दोन संघटनांचे द्वंद्व दाखवण्याचा उघड प्रकार झालेला होता पण पुढे लोकांचा थोडा भ्रमनिरास झाला.

मध्यंतरी राज ठाकरे यांचे एक तडाखेबाज भाषण अनेक दिवसांनी शिवाजी पार्कच्या मैदानात झाले आणि त्या भाषणानंतर त्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने बरीच सुंदोपसुंदी महाराष्ट्रात पाहायला मिळाली. शिवाजी पार्क हे मैदान न्यायालयाच्या निर्णयानुसार सायलेन्स झोन म्हणून घोषित झाल्यामुळे राज यांना त्यांच्या पक्ष स्थापनेच्या दिवशी पार्कात मेळावा घेण्यास अनेक दिवस अडचण येत होती.

परंतू शिवसेनेला सुमारे ५० वर्ष सुरु असलेल्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळत असे आता तसाच एक पारंपारिकसोहळा म्हणून गुढीपाडवा  साजरा करण्यास मनसे ला देखील परवानगी देण्यात आली आहे आणि ती गोष्ट आता महाराष्ट्रातील कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा शिवसेनेला जास्त डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

 

MNS-Raj-Thackeray-inmarathi
mid-day.com

मनसेची सुरवातीची १९ मार्च २००६ ची झालेली सभा आणि नुकतीच झालेली सुमारे १२ वर्षानंतरची सभा यात तोच बाज लोकांना पाहायला मिळाला. फक्त या गेलेल्या १२ वर्षात पुलाखालून बरचस पाणी वाहून गेलेले आहे. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन करण्याआधी ते शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या समर्थकांचे एक जाळे महाराष्ट्रभर निर्माण केलेले होते आणि पुढे त्या समर्थकांना घेऊन त्यांनी स्वताचा पक्ष काढला.

त्यांनी पक्ष का काढला? कोणत्या परिस्थितीत काढला हे सगळे सध्या गौण मुद्दे ठरलेले आहेत पण त्यांनी पक्ष काढून तो तारून दाखवला हा महत्वाचा मुद्दा राजकारणाच्या दृष्टीने ठरतो.

राज यांनी सुरवातीला घेतलेल्या जीन्स आणि टी शर्ट वरच्या ट्रॅक्टर वर फिरणाऱ्या शेतकऱ्याचे अपील असो अथवा त्यांची ब्लू प्रिंट असो.. अथवा “माझ्या पक्षातील कार्यकर्ता त्यांचे वडील… त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले पाहिजे” वगैरे नी तरुणांमध्ये धमाल उडवून आली होती. त्यानेच फक्त पक्ष वाढत नाही हे लक्षात आल्यावर २००८ च्या सुमारास मराठीच्या मुद्द्याला हात घालत त्यांनी राजकारण ढवळून काढले आणि नंतर झालेल्या २००९ च्या लोकसभेला व विधानसभेत पक्षाला घवघवीत यश मिळाले व तिकडून शिवसेना व मनसे हा मोठा संघर्ष महाराष्ट्रात सुरु झाला. लोकसभेला मनसेला लाखांच्या घरात मतदान झाले याने अनेकांचे अवसान गळाले होते.

राज यांच्या पक्ष स्थापनेच्या २ वर्षातच महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाच्या कार्याची नोंद ही राज्यशास्त्रातील जाणकारांनी घेतली आणि भाषिक राजकारणाचा एक नवा pattern म्हणून emergence of maharashtra navnirman sena हा विषय विद्यार्थ्यांना अभ्यासाला दिला जाऊ लागला. (व आता १२ वर्षांनी कदाचित त्याचा उलट अभ्यास विद्यार्थी करत असावेत.)

या सर्व बाबींचा धोका ओळखून त्यांच्यावर सेना भाजप युतीकडून टीका होऊ लागली आणि विशेषता शिवसेनेने राज यांना टार्गेट केले व त्यांच्या रणनीती ने मनसे पराभवास सर्वत्र कारण ठरू लागली. जेव्हा लोकसभेला शिवसेनेच्या महत्वाच्या जागा मनसेने घेतलेल्या फरकामुळे निवडून आल्या त्यावेळेला सध्याचे खासदार व आत्ता पराभूत झालेले गजानन किर्तीकर यांनी थोडक्यात माईक वर एक विधान केले की

“मनसेला मत म्हणजे कॉंग्रेस राष्ट्रवादीला मत”.

हे सुरवातीचे एक विधान मनसेला इतके महाग पडले की त्या उभ्या राहिलेल्या पेच रुपी आवाहनाचे राज यांनी योग्य समाधान न केल्याने राज यांच्या पक्षासमोर निवडणूकीच्या राजकारणाचे प्रश्न उभे राहिले ते आजवर उभेच आहेत. आंदोलन व निवडणुकांचे राजकारण हा एक वेगळा भाग असतो. मनसेचे प्रत्येक मत हे त्यानंतर योग्य ठिकाणी कामी आले नाही. ते कमी होत गेले.

 

MNS-rally_inmarathi
firstpost.com

किर्तीकारांच्या त्या विधानानंतर सेनेसोबत युतीत असलेल्या गोपिनाथ मुंडे यांनी देखील “आमचे मत कोणी फोडायचा प्रश्न येत नाही” असे विधान करून मनसे हा पक्ष निवडून यायला नाही तर मत फोडायला आलेला आहे. असा समज सर्वदूर पसरवला व त्यावर मनसेने आजतागायत महाराष्ट्रात सर्व लढाया एकट्यानेच लढून हा समज सर्व समाजात ते निवडून येऊ शकत नाहीत म्हणून दृढ करून ठेवलेला दिसून येतो.

महाराष्टात सर्वत्र युत्या आणि आघाडीची सुमारे ३५ वर्ष परंपरा असताना मनसेच्या एकाकी लढाया या काय सूचित करतात?

कुठेही कधीही कोणाशीही युती न करणे, कधीही कोणाच्याही व्यासपीठावर न जाणे आणि कधीही इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याला आपल्या व्यासपीठावर बोलावणे ही मनसेच्या पराभवाची प्रमुख कारणे आहेत.

त्यासोबत ही अनेक कारणे आहेत पण त्यावर वेगळा लेखप्रपंच करावा लागेल. जर रिपाई, रासप, स्वाभिमानी पक्ष असे छोटेसे पक्ष भाजप सोबत सत्तेत जाऊ शकतात मंत्री होऊ शकतात तर त्यांच्या तुलनेग राज यांच्यासोबत मतदार अधिक आहेत आणि पक्षही खूप मोठा आहे.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर सेनेला काहींनी वसंतसेना म्हणून हिणवले होते तर नुकत्याच झालेल्या पाडव्याच्या मेळाव्यानंतर व घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेला ‘शरदसेना’ म्हणून हिणवले जाऊ लागले आहे. यावर सोशल मीडियावर जोक चा पाऊस पडलाय. यावरही मनसेने काही ठोस केले नाही तर ते नुकसानीला नकीच कारण ठरू शकते. मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याआधी राज यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली अशी बातमी येऊन गेली तसेच राज यांनी पवारांची घेतलेली मुलाखत ही चर्चेचा विषय ठरली होती.

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज यांनी चौफेर फटकेबाजी तर केलीच पण केंद्र सरकार वर टीका करत भाजपची डोकेदुखी वाढवली. भाजप राम मंदिराच्या प्रश्नावरून देशात दंगली घडवेल असा अप्रत्यक्ष संदेश देऊन मोदी मुक्त भारताची राज यांनी हाक दिली.

तसेच श्रीदेवी, निरव मोदी आणि इतर अनेक मुद्दे घेऊन राज यांनी राजकारण तर ढवळले पण शिवसेनेविरोधात चकारही न काढून लोकांना अचंबित करून टाकले. आता या घटनेवरून केंद्रस्थानी येऊन राज हे परत चर्चेचा विषय ठरलेले आहेत. मागील लोकसभेला राज यांचे टार्गेट शिवसेना आहे असे सर्वत्र भासवले गेले होते व फक्त भाजपला पाठींबा देऊन त्यांनी पराभवानंतर लोकसभा लढवणार नाही असे जाहीर केले.

उत्तर प्रदेश मध्ये सपा आणि बसपा एकत्र आल्याने भाजप चा पोटनिवडणुकीत पराभव लोकांनी नुकताच पहिला आहे यामुळे भाजपला शह द्यायचा असेल तर अस्तित्व नसलेल्या पक्षालाही सोबत घ्यावे लागेल असे सर्वत्र चर्चिले गेले आहे राज हे ही त्यात महत्वाचे ठरतात.

मनसेचे मतदार महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. राज यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेवरची टीका का टाळली आहे? याची चर्चा व तर्क वितर्क विविध माध्यमातून होऊ लागले आहेत व शिवसेना देखील या राजकीय घटनेकडे नजर ठेवून आहे. राज हे महाराष्ट्रातले मोठे नेते तर आहेतच पण ते कुशल संघटक नाहीत अशी त्यांच्यावर सतत टीका होत राहिली आहे. याउपर शिवसेनेचे संघटन हे सर्वाधिक भक्कम असून त्यामुळे त्यात निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे सेनेतले अंतर्गत कार्यकर्ते हे राज यांनाच जाऊन मिसळू शकतात याची जाणही सेनेला आहे. त्यामुळे आचार्य अत्रेंच्या भाषेत सांगायचे झाल्यास यावतचंद्रदिवाकरो असे पर्यंत सेना आणि मनसे युती होणे शक्य नाही. मराठी माणसाने यावर आशावादी राहणे सोडून द्यावे. नुकत्याच मनसेच्या उरलेल्या सहा नगरसेवकांना पक्षात घेऊन सेनेनं आपली भूमिका सिद्ध केलेली आहे.

 

Shivsena-vs-MNS-inmarathi
www.mumbailive.com

पाडवा मेळाव्यात वातावरण धवळल्या नंतर नुकत्याच झालेल्या रेल्वेसमोरील विद्यार्थ्यांच्या संपात मनसेने जाऊन सकाळी सकाळी उडी घेतली त्यावेळी कोणी खासदार दिल्लीमध्ये उठ्लेही नसावेत. हजारोंच्या संख्येने रेल्वेत apprentice करून नोकरी न मिळालेले उमेदवार विद्यार्थी हे रेल्वे रुळावर जाऊन ऐन ऑफिसच्या काळात रेल्वे गाड्या अडवून बसले होते. हा संप मनसेनेच आयोजित केला अशी सुप्त चर्चा अनेकांत होती. त्या मुलावर रेल्वेने केलेला सौम्य लाठीचार्ज वगळता ४ तास गाड्या रोखुनही एकावरही एकही गुन्हा दाखल झाला नाही? हा सर्वत्र प्रश्न चर्चेचा विषय ठरला.

लगेच रेल रोको मिटल्यावर ते विद्यार्थी राज यांना भेटले आणि महत्वाचे म्हणजे दिल्लीत बसलेले रेल्वे मंत्री सेनेच्या खासदारांसमोर मनसेवर चिडलेले दिसले.

सेनेचे खासदार गजानन किर्तिकर माध्यमासमोर येऊन काय बोलले? काही लोकांना आयते श्रेय लाटायची सवय आहे.!! लोकांनी दुर्लक्ष केलेले हे विधान मनसेचे महत्व निर्माण करून जाते आहे. ४ तास रेल्वे रोखून ही मनसेवर वां त्या आंदोलकावर कारवाई नाही? म्हणजे मनसेची आणि राज्य सरकार ची सेटिंग आहे की काय? सकाळी ७ वाजता देशभरातून माटुंग्याच्या ठिकाणीच बेकायदेशीर आंदोलन करायला हजारो विद्यार्थी कसे काय आले? कुठून आले? हा पूर्व नियोजित डाव तर नव्हता ना अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. त्यांना उत्तेजीत केलेले दिसले. अशी आंदोलने सहज पणाने होत असतात काय?

मागच्या काही काळात प्रधानमंत्री पदासाठी मोदी स्पर्धेत नसताना नंरेन्द्र मोदी ही भारताची शेवटची आशा आहे असे म्हणणारे राज यांनी पाडव्याला मोदिमुक्त भारताची घोषणा केली आहे आणि त्या व अनेक जुन्या मुद्द्याना घेऊन राज यांची सेना परत एकदा सक्रीय झालेली दिसून येते आहे.

१२ वर्षात त्यांच्या पक्षाच्या नावावर अनेक गर्दीचे विक्रम व आंदोलने तर आहेतच त्याशिवाय पराभवाचे मोठे शल्यही आहे. कधीही ग्रामपंचायत सदस्य वा लोकप्रतिनिधी न झालेले काही लोक थेट नेते बनवून त्यांना राज यांनी राजकारणात स्टँड केले आहे. ज्या ओघाने त्यांच्या पक्षात विक्रमी संख्येने तरुण आले त्याच वेगाने अनेक कारणांनी ते कमी होत गेले आहेत. तरुणांना खास कार्यक्रम न देऊनही राज यांची लोकप्रियता टिकून आहे फक्त आता त्यांना इतक्या दिवस नसलेल्या आघाडीच्या राजकारणाचे पाठबळ नवीन मार्गदर्शकाकडून मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यांच्या पक्षाची ओंनलाईन सदस्य मोहीम सुरु झाल्याने ते पुढील निवडणुकीत आघाडी करण्याची दाट शक्यता पडताळून पाहण्यासाठी पदाधिकार्यांना दौर्यावार पाठवते झाले आहेत . मनसे हा एकमेव पक्ष असा आहे की नाशिक मध्ये सत्तेत असताना देखील त्यांचे सर्वाधिक नगरसेवक हे विरोधी पक्षात सहभागी झाले होते. हा चुकीचा संदेश सर्वत्र पसरल्याने अनेक ठिकाणी पक्ष संघटनेची हानी झालेली आहे. यातून त्यांचा पक्ष व नेते काय शिकलेत? हे येणारा काळच ठरवेल पण सध्या त्यांची सेना ही शरदसेना आहे की देवेद्रसेना याचे उत्तर शिवसेनेला मात्र  शोधावे लागनार आहे हे नक्की..

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?