' भारतात दहा हजाराची नोट चलनात होती. वाचा अजून एका, १९७८च्या नोट बंदीची कहाणी… – InMarathi

भारतात दहा हजाराची नोट चलनात होती. वाचा अजून एका, १९७८च्या नोट बंदीची कहाणी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या ऐतिहासिक निर्णयाची अगदी गल्लीबोळात चर्चा सुरु होती. हा निर्णय आपल्या अर्थव्यवस्थेसाठी किती पोषक आहे आणि काळ्या पैश्याच्या वाढत्या राक्षसाला रोखण्यासाठी तो किती योग्य आहे हे मोदींनी त्यांच्या भाषणातून जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न देखील केला होता.

या निर्णयामुळे भ्रष्टाचार हा संपूर्णत: नष्ट होणार नसला किंवा काळ्या पैश्यावर पूर्णत: नियंत्रण मिळवणे शक्य नसले तरी त्याचे अनेक सकारात्मक परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात दिसतील अशी आशा वर्तवण्यात आली होती.  

पण बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नसेल की, वापरत असलेले चलन हद्दपार करण्याचा निर्णय हा काही पहिल्यांदाच घेण्यात आलेला नव्हता.

यापूर्वी १९७८ साली १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा वापरातून बंद करण्याचा निर्णय ‘तत्कालीन’ पंतप्रधानांनी जाहीर केला आणि अर्थकारणाच्या पटलावर तो एक चर्चेचा विषय होऊन बसला होता.

तेव्हा प्रधानमंत्री होते ‘मोरारजी देसाई’…!

 

demonetisation-in-india-in-1978-marathipizza01

स्रोत

देशाचे अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिलेल्या मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर १६ जानेवारी १९७८ च्या रात्री १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. तेव्हाही दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९७८ रोजी सर्व बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या.

आणीबाणी प्रकरणावरून जनतेचा रोष ओढवून घेतलेल्या कॉंग्रेस पक्षाला सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आणि नवीन सरकार म्हणून जनता पक्ष सत्तेत आला होता.  तेव्हा अर्थमंत्री म्हणून कारभार पाहत होते – ‘एच.एम. पटेल’ ते देखील गुजरातचेच.

सरकारच्या या निर्णयानंतर लोकांमध्ये ही देखील कुजबुज सुरु होती की, कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडे असणाऱ्या सीक्रेट फंड्स ना चाप बसवण्यासाठी नवनिर्वाचित जनता सरकारने निर्णयाच्या आडून ही नवी युक्ती लढवली आहे.

पण तेव्हाच्या आणि मोदींनी घेतलेल्या निर्णयाच्या परिस्थीमध्ये खूप मोठा फरक होता. मोदींनी घेतलेल्या निर्णयाला विद्यमान आरबीआय गव्हर्नर उर्जित  पटेल यांचा पाठींबा लाभला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

परंतु मोरारजी देसाईंनी घेतलेल्या निर्णयाला तत्कालीन आरबीआय गव्हर्नर आय.जी. पटेल यांचे सहकार्य लाभले नव्हते.

हा निर्णय अंमलात आणण्यासाठी High Denomination Bank Notes (Demonetisation) Act, १९७८ हा कायदा अस्तित्वात आणला.

या कायद्यानुसार उच्च मूल्याच्या नोटांचे म्हणजेच ५०० किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटांच्या हस्तांतरणावर आणि वापरावर बंदी घालण्यात आली होती.या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला ३ वर्षाच्या कारावासाची तरतूद देखील कायद्यात केली गेली होती.

परंतु हा कायदा फार काळ टिकू शकला नाही. या कायद्याला २५ वर्षे पूर्ण व्हायच्या आतच एनडीए सरकारने १९९८ साली १००० च्या नोटा पुन्हा नव्याने वापरत आणण्याचा निर्णय घेतला. (आता त्याच एनडीए सरकारने पुन्हा १००० ची नोट बाद केली!!)

भारतामध्ये १९३४ सालापासून उच्च मूल्याच्या नोटा म्हणजेच ५०० किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा वापरात आणल्या गेल्या. सर्वात जास्त मूल्य असलेली नोट होती १०,००० रुपयांची…ज्यांची छपाई आरबीआय कडून १९३८ मध्ये करण्यात आली होती.

 

demonetisation-in-india-in-1978-marathipizza02

 स्रोत

मोदी आणि देसाईंच्या पूर्वीही १९४६ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा, सर्वप्रथम १००० आणि १०००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १९४९ मध्ये नवनिर्वाचित भारत सरकारने १००० आणि १०००० च्या नोटा पुन्हा वापरत आणल्या.

त्यानंतर मोरारजी देसाईंनी १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. पण पुन्हा ३० वर्षांच्या आत या नोटा सरकारतर्फे पुन्हा वापरत आणल्या गेल्या.

demonetisation-in-india-in-1978-marathipizza03

 स्रोत

त्याकाळी या निर्णयाचा काय परिणाम झाला होता?

तेव्हा या निर्णयाचा परिणाम त्या मर्यादित जनतेवरच झाला ज्यांच्याकडे ५००, १००० आणि १०,००० च्या नोटा असायच्या.  सामान्य लोकांना त्याचा फारसा त्रास जाणवला नाही. परंतु व्यावसायिक आणि आर्थिक जगतात मात्र या निर्णयामुळे भंबेरी उडाली होती.

मोरारजी देसाईंनी काळ्या पैश्याला रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा तेव्हा म्हणावा तसा फायदा झाला नाही. कारण बाद करण्यात आलेल्या नोटा लगेचच पुन्हा वापरात आल्या होत्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?