Site icon InMarathi

राग आल्यावर आपल्या चेहऱ्याचा रंग का बदलतो? जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

राग हा माणसाच्या स्वभावात आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नाही की आपल्याला राग येतो. जेव्हा कोणी खूप रागात असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो की, “काय रे काय एवढा लाल झाला आहे?” म्हणजेच का एवढा रागावला आहेस.

 

lovetoknow.com

पण तुम्ही कधी विचार केला आहे की, आपण अतिशय रागावलेलो असताना आपला चेहरा हा लाल का होऊन जातो.

पण आता ह्या कोडे सुटते आहे. अमेरिकेच्या ओहायो विद्यापीठाच्या रिसर्चमध्ये एक गोष्ट समोर आली आहे की, माणसाच्या भावना बदलल्या की त्यांच्या शरीरातील रक्त संचार प्रक्रिया देखील बदलते. ह्या विद्यापीठातील शोधकर्त्यांनी ह्या विषयावर आणखी रिसर्च करून ते या निकषावर पोहचले की, वेगवेगळ्या भावनांनुसार लोकांच्या चेहऱ्याचा रंग बदलतो.

 

psychologistworld.com

त्यासोबतच ह्यावर देखील रिसर्च करण्यात आली की, चेहऱ्यावरील रंगांच्या आधारे कुठल्या व्यक्तीच्या भावना जाणून घेता येतात का? ह्यावर हा निकष समोर आला की, सामन्यतः वेगवेगळ्या भावनांमध्ये व्यक्तीचे नाक, भुवया आणि गाल ह्यांचे रंग बदलतात. ७५ टक्के प्रकरणांत व्यक्तीच्या चेहऱ्याच्या रंगावरून त्याच्या भावनांना ओळखल्या जाऊ शकते.

 

askideas.com

ह्या रिसर्च टिमला लीड करणारे डॉक्टर एलेक्स मार्टिन्ज सांगतात की, “व्यक्तीच्या चेहऱ्यावरील बदलणारे एक्सप्रेशन आणि बदलणारा रंग ह्याचा संबंध सेन्ट्रल नर्वस सिस्टिमशी असतो. आम्ही ह्या रिसर्चमध्ये ह्या सिस्टिमला समजण्याचा प्रयत्न केला. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या भावना जागृत होतात, तेव्हा त्याचा प्रभाव सरळ-सरळ त्याच्या शरीरातील रक्त प्रवाहावर पडतो. हा प्रभाव अति आनंद किंवा दुख, भीती, राग ह्यांसारख्या भावनांमध्ये दिसून येतो. अश्यात सेन्ट्रल नर्वस सिस्टिम शरीराला संकेत देतात.

 

meetup.com

हे संकेत मिळाल्यानंतर रक्ताच्या प्रवाहाची गती आणि रक्त संरचना ह्यांच्यात भावनांनुसार फरक पडतो. हाच फरक चेहऱ्याच्या बदलणाऱ्या रंगाच्या रुपात दिसून येतो. ही संपूर्ण प्रक्रिया कुठल्याही वयाच्या व्यक्तीत एकसारखीच असते.

 

globalseducer.com

ह्यावर ओहियो विद्यापीठाच्या टिमच्या मते, ही संपूर्ण प्रक्रिया जर आपण समजून घेतली तर कुठल्याही व्यक्तीचा चेहरा बघून त्याच्या भावना समजल्या जाऊ शकतात. सेन्ट्रल नर्वस सिस्टिमच्या ह्या कार्यप्रणालीला समजून ह्याचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी संबंधित रीसर्चमध्ये देखील केला जाऊ शकतो.

सध्या ओहियो विद्यापीठाचे वैज्ञानिक एक असा कॉम्पुटर प्रोग्राम बनविण्याच्या प्रयत्नात आहेत, जो व्यक्तीच्या चेहऱ्याचा रंग बघून त्याच्या भावना सांगू शकेल. जर व्यक्ती श्वास रोखून धरेल, पापण्या मिचकावणार नाही तरी देखिल हा प्रोग्राम ९० टक्के अॅक्युरेसीने त्या व्यक्तीच्या भावना सांगू शकेल. वैज्ञानिकांनी व्यक्तीच्या १८ वेगवेगळ्या भावनांचे सॅम्पल घेऊन ह्या कॉम्पुटर प्रोग्रामला बनविण्याच्या दिशेने काम करण्यास सुरवात केली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version