संपूर्ण जगच अचानक शाकाहारी झालं तर काय होईल? जाणून घ्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या भारतीय संस्कृतीत अन्न म्हणजे पूर्णब्रह्म मानलं जातं. अन्नाला नावं ठेवणं हे आपल्याइथे पाप मानले जाते, कारण आज अन्न मिळतंय उद्या ते नाही मिळालं तर, त्यामुळे देवाप्रमाणेच अन्नाचा देखील आदर करायला आपली संस्कृति शिकवते!
जगात २ प्रकारचे अन्न सेवन केले जाते ते म्हणजे शाकाहार आणि मांसाहार!
आहाराच्या बाबतीत शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद नेहमी चालू असतो. शाकाहारी लोक त्यांची बाजू मांडत असतात, तर मांसाहारी लोक त्यांची.
या दोघांमध्ये पण काही वेगवेगळ्या प्रकारची माणसे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच मासे खाणारे पण चिकन न खाणारे. पण त्यांचा विषय आपण जरा बाजूलाच ठेवू.
शाकाहारी आणि मासाहारी माणसांच्या खाण्याच्या आवडीनिवडी देखील खूप वेगवेगळ्या असतात.

याच दोन वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या सवयीमुळे एक समतोल बनलेला आहे. पण जरा विचार करा, जर अचानक सर्व जगातील माणसे शाकाहारी झाली, तर काय होईल?
हा नक्कीच आपल्याला विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
आज आपण जर सर्वच माणसे शाकाहारी बनले, तर हवामान, वातावरण, आपले आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांच्यावर काय परिणाम होईल याबद्दल जाणून घेणार आहोत.
जर २०५० पर्यंत जगातील सर्व माणसे शाकाहारी झाले तर दरवर्षी जवळपास ७० लाख मृत्यू कमी होतील आणि प्राण्यांपासून तयार करण्यात आलेली उत्पादने जराही खाल्ली नाहीत तर दरवर्षी ८० लाख लोक कमी मरतील.
ऑक्सफर्ड मार्टिन स्कूल फ्युचर ऑफ प्रोग्राममध्ये एका मार्को स्प्रिंगमॅन नावाच्या संशोधकाने हे संशोधन केले.
त्याच्या मते, खाद्य सामग्रीशी जोडलेल्या उत्सर्जनामध्ये ६० टक्क्यांपर्यंत घट होईल. हे रेड मिटच्या बंदीमुळे होईल, कारण रेड मिट मिथेन गॅस उत्सर्जित करणाऱ्या प्राण्यांपासून मिळते.

पण याच्यामुळे शेतकऱ्यांवर त्याचा वाईट प्रभाव होईल. शुष्क आणि अर्धशुष्क भागांचा पशुपालन करण्यासाठी वापर केला जातो. आफ्रिकेच्या सहाराजवळ सहेल लँड आहे आणि येथे राहणारे लोक पशुपालनावर अवलंबून आहेत.
त्यामुळे त्यांना स्थायी रुपात कुठेतरी दुसरीकडे नाईलाजाने विस्थापित व्हावे लागेल. याच्यामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख धोक्यात येऊ शकते.
जंगलाच्या हवामानात होणारे बदल कमी होतील. संपत चाललेली जैव विविधता परत येईल आणि जंगलामध्ये एकप्रकारचे संतुलन बनेल. पहिल्यांदा शाकाहारी प्राण्यांना वाचवण्यासाठी हिंसक प्राण्यांना मारले जात होते.
जे प्राण्यांच्या व्यवसायाशी जोडलेले आहेत, त्यांना आपल्यासाठी वेगळे ठिकाण आणि करियर शोधावे लागेल. त्यानंतर ते शेती, बायोऊर्जा आणि वनीकरण यांच्याकडे कल करू शकतात.
जर अशा लोकांना रोजगाराचे नवीन साधन न मिळाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार होतील.

काही प्रकरणांमध्ये याचा जैव – विविधतेवर वाईट परिणाम होईल. मेंढ्यांच्या चरण्यामुळे कितीतरी शतकांपासून जमिनीला आकार देण्यास मदत मिळते.
त्यामुळे पर्यावरणासाठी मेंढपाळांना प्राणी पाळण्यासाठी पैसे द्यावे लागतील, कारण जर त्यांच्या मेंढ्या किंवा शेळ्या कुणी विकत घेतल्या नाहीत तर त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन उरणार नाही.
परंपरेवर त्याचा खूप वाईट प्रभाव पडेल. जगभरामध्ये असे कितीतरी समुदाय असे आहेत, जे लग्नामध्ये आणि उत्सवामध्ये मांस भेट म्हणून देतात. त्या प्रथा बंद होतील.
प्रामुख्याने याचा परिणाम अन्न साखळीच्या संतुलनावर होईल. हा परिणाम सर्वात विपरीत असेल. कारण मांसाहार हा खाल्ल्या जाणाऱ्या प्रजातींचे प्रमाण नियमित ठेवायला मदत करत असतो.

–
सकाळी उठल्यावर मळमळतं, डोकं दुखतं? मॉर्निंग नॉशिया दूर करणारे हे ६ सोपेे उपाय तुमच्यासाठीच..
–
मांसाहार पूर्णपणे बंद झाल्यामुळे हृदयाचे आजार, डायबिटीस, स्ट्रोक आणि कोणत्याही प्रकारच्या कर्करोग यांसारख्या आजाराची भीती राहणार नाही.
अशामध्ये जगभरातील दोन किंवा तीन टक्के जीडीपी जो मेडिकल बिलावर खर्च होते, तोही पूर्णपणे वाचेल.
पण आपल्याला पोषणाची काही पर्यायी वस्तूंच्या बदल्यात मांसाला बदलावे लागेल.
एका अंदाजानुसार, जगातील दोन अब्ज लोक हे कुपोषित आहेत. धान्याऐवजी मांस आणि त्याच्याशी जोडलेल्या उत्पाद्कांमुळे लोकांना जास्त पोषण मिळते.
अशा प्रकारचे काही चांगले तर काही वाईट परिणाम जग पूर्णपणे शाकाहारी झाल्यावर होतील आणि शेतकऱ्यांवर आणि त्याच्याशी निगडीत इतर क्षेत्रांवर देखील परिणाम होईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.