पुरेसं पाणी न मिळाल्याने शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हे तर आपल्या सर्वांना माहित आहे अन्नाविना मनुष्य जवळपास २० दिवस जगू शकतो. पण पाण्याविना जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस राहू शकतो.
तर अमेरिकेच्या एका विद्यापीठातील बायोलॉजीचे प्राध्यापक रेंडल के पॅकर ह्यांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांत एका बंद कारमध्ये असलेलं लहान मुल किंवा उन्हात खेळत असलेला एखादा अॅथलीट ह्यांना जर पाणी मिळाले नाही तर काही तासांत देखील त्यांचा जीव जाऊ शकतो.
आणि ह्याचं कारण म्हणजे डी-हायड्रेशन. म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता होणे.
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसनुसार डी-हायड्रेशन ही एक अशी अवस्था आहे, जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची जेव्हढी गरज असते तेवढे त्याला मिळत नाही. लहान मुलं आणि वृद्ध लोकांना डी-हायड्रेशन चा सर्वात जास्त धोका असतो.
–
हे ही वाचा – काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरावर खरंच घातक परिणाम होतात का?
–
आता जाणून घेऊ शरीरात पाण्याची कमी झाल्यावर शरीर कश्याप्रकारे कार्य करते…
- शरीरात पाण्याची कमतरता झाली म्हणजे सर्वात आधी तोंड सुकू लागते, तहान लागायला लागते. हे आहे डी-हायड्रेशनचे पहिले लक्षण.
- ह्यानंतरचे लक्षण म्हणजे लघवीचा रंग गडद होणे, त्याला दुर्गंधी येणे. डॉक्टरांनुसार असे ह्यामुळे होते, कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर आणि मीठ ह्यांचातील संतुलन बिघडते.
- पाणी पिले नाही तर काही तासांनी तुम्हाला थकवा जाणवू लागतो. आणि जर अश्या स्थितीत असलेलं एखादं मुलं रडलं तर त्याच्या डोळ्यातून पाणी येणं देखील थांबत.
- त्यानंतरच्या काही तासांत लघवी येण्याची मात्रा अगदीच कमी होऊन जाते. काही लोकांना तर चक्कर येणे आणि डोळ्यांना थकवा जाणवणे अश्या समस्या उद्भवतात.
- दुसऱ्या दिवशी शरीर तोंडात अधिक थुंकी बनविण्याचा प्रयत्न करू लागतं. ओठं सुकायला लागतात आणि डोळे देखील दुखायला लागतात.
- खूप जास्त झोप येते. शरीर कुठल्याही परिस्थितीत शरीरातील पाणी वाचविण्याचा प्रयत्न करत असते.
- मधुमेह किंवा ज्यांना हृदयासंबंधित आजार असतात त्यांच्यात ही लक्षण जास्त लवकर दिसून येतात. तसेच मद्यपान करणाऱ्या आणि ३८ डिग्री हून अधिक तापमानात काम करणाऱ्या लोकांना देखील ह्या समस्या जाणवतात.
–
हे ही वाचा – आरोग्याच्या अनेक समस्यांवर एक चांगला उपाय, बस्स हे इतकंच करा!\
–
- पाण्याविना दुसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत लघवीत जवळपास ८ तासांचे अंतर होऊन जाते. पल्सरेट वाढून जातो. त्वचेवरील पाण्याची कमतरता दिसायला लागते. नीट दिसत नाही.
- अशक्तपणा एवढा वाढतो की, सरळ उभं राहणे देखील अवघड होते. हात-पाय थंड पडतात.
- ही स्थिती अतिशय धोकादायक असते. ह्यामुळे कुणाचा जीव देखील जाऊ शकतो. त्या व्यक्तीला जरी उपचार उपलब्ध झाला तरी देखील त्या व्यक्तीला वाचवणे डॉक्टरांसाठी एवढ सोप्पे नसते.
त्यामुळे पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर देखील सांगतात की, शरीराला पाण्याची नितांत गरज असते त्यामुळे खूप पाणी प्या.
त्याचप्रमाणे जेवढी गरज आपल्याला पाणी पिण्याची आहे तेवढीच गरज पाणी वाचविण्याची देखील आहे. काही दिवसांआधी अश्या ११ शहरांचीची यादी जाहीर करण्यात आली होती ज्यांच्याकडे पाणी अतिशय कमी प्रमाणात शिल्लक आहे. ह्यात दक्षिण भारतातील बंगळूरू शहराचे देखील नाव होते.
तर यूएनच्या एका अंदाजानुसार वर्ष २०३० पर्यंत पाण्याची डिमांड ही ४० टक्क्यांनी वाढणार आहे. पुरेसं पाणी जेव्हा शरीराला मिळत नाही तेव्हा काय परिस्थिती उद्भवते हे जाणून घेतले तरी लक्षात येईल की पाण्याचं नियोजित व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे.
===
हे ही वाचा – सावधान : पाणी पिण्याच्या सवयींबद्दल “हे” जाणून नाही घेतलं, तर तीच संजीवनी जीवघेणी ठरू शकेल
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.