आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुमच्यापैकी बहुतेक तरुणांना डब्लूडब्लूइ (World Wrestling Entertainment) हा शो आवडत असेलच. कारण जगातील आणि आपल्या भारतातील कितीतरी तरुण मंडळी या शोचे खूप मोठे चाहते आहेत. ते पण छोटे – मोठे चाहते नाही तर, खूप मोठे चाहते.
डब्लूडब्लूइचे रॉ आणि स्मॅक डाऊन यापैकी एकही शो हे चाहते बघायचा सोडत नाहीत. डब्लूडब्लूइ बघताना मनातील एक सर्व टेन्शन बाजूला होते आणि एक वेगळाच उत्साह निर्माण होतो.
त्यात डब्लूडब्लूइचा मेन इव्हेंट – रेस्लमेनिया येणार असेल तर सर्व फॅन्स अक्षरशः वेगळ्याच विश्वात जगत असतात.
रेस्लमेनिया हा डब्लूडब्लूइचा वर्षातील सर्वात मोठा मेन इव्हेंट असतो.
ह्या वर्षीच्या एप्रिलमधील रेसलमेनिया मध्ये एजे – स्टाईल आणि रॉयल रम्बल विजेता नाकामोरा हे डब्लूडब्लूइ स्मॅक डाऊन चॅम्पियनशीपसाठी लढताना दिसले.
तर द बीस्ट – ब्रॉक लेसनर आणि शिल्ड मेंबर रोमन रिंग्स हे दोघे डब्लूडब्लूइ रॉ चॅम्पियनशीपसाठी एकमेकांविरोधात लढताना दिसले.
अशाच कितीतरी रोमांचक फाईट्स आपल्याला रेस्लमेनियामध्ये पाहायला मिळतात.
पण हा डब्लूडब्लूइ शो जो आपण एवढ्या उत्साहाने बघतो, तो खरंच तेवढा चांगला आहे का? त्यामध्ये दाखवलेल्या सगळ्या मारामाऱ्या “खऱ्या” असतात का ?
– हे असे प्रश्न नक्कीच उत्पन्न होतात.
कारण त्यामध्ये दाखवलेली एवढी हाणामारी आणि रक्त वगेरे बघून हा विचार पडतो. आज आपण याचविषयी जाणून घेणार आहोत..
हे ही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत माणूस आता चक्क WWE विकत घेण्याच्या तयारीत!
डब्लूडब्लूइ हा शो एक मनोरंजनाच कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. डब्लूडब्लूइ या शोला कोणत्याही प्रकारच्या खेळाचा दर्जा देण्यात आलेला नाही आहे.
तो फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे.
त्यामुळे त्यातील रेस्लरना खेळाडूंचा दर्जा देण्यात येत नाही.
सोमवारी रात्री डब्लूडब्लूइचा रॉ हा शो असतो, मंगळवारी स्मॅक डाऊन हा शो असतो. या दोन शोमधील प्रत्येक सामने हे खूप रंजक असतात.
कधी – कधी तर असे काहीतरी या डब्लूडब्लूइच्या शोमध्ये घडते ज्याची कधीही आपण अपेक्षा केलेली नसते.
कधी दोन रेसलरची मॅच चालू असताना तिसरा रेसलर तिथे येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांची मॅच तिथेच संपते. असे कितीतरी वेळा होते, जे आपल्यासाठी आश्चर्यकारक असते.
असे अनेक प्रसंग तुम्ही देखील या डब्लूडब्लूइच्या शोमध्ये पाहिले असतील.
आणि म्हणूनच तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, डब्लूडब्लूइ हा शो पूर्णपणे एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी सारखा लिहिलेला असतो.
त्याच्यामधील बहुतेक गोष्टी खऱ्या नसतात. एवढेच काय, तर हे डब्लूडब्लूइचे सुपरस्टार्स जी फाईट करतात ती देखील खोटी असते.
या डब्लूडब्लूइच्या सुपरस्टार्सनी यासाठी योग्य तो सराव केलेला असतो आणि हे वेल ट्रेन्ड असतात. त्यामुळे ते प्रत्येक मूव्ह योग्यप्रकारे करतात. प्रत्येक सामना कोण जिंकणार आहे, हे पहिलेच ठरलेले असते.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांना देखील काही प्रमाणात याबद्दलची माहिती असते…
या सुपरस्टार्सच्या डोक्यातून किंवा शरीरामधून येणारे रक्त देखील खोटे असते. यासाठी हे सुपरस्टार्स “ब्लड कॅप्सूल”चा वापर करतात.
त्यांच्या मूव्ह्स एवढ्या व्यवस्थित असतात की, असे वाटते, ते खरंच एकमेकांना खूप मारत आहेत. पण ते एकप्रकारचा अभिनय आपल्या समोर सादर करत असतात.
खूप कमी मॅच आहेत, ज्या स्क्रिप्टेड नसतात. त्यातीलच एक म्हणजे डेड मॅन म्हणजेच द अंडरटेकर आणि ब्रॉक लेसनर यांच्यामध्ये झालेला रेस्लमेनियाचा सामना.
यामध्ये काय होणार आहे, हे पंचाला देखील माहित नव्हते. त्याला एवढेच सांगितले होते की, प्रत्येकवेळी तीन काउंट करायचे आणि तसेच त्याने केले.
कधी – कधी हे पंच सुपरस्टार्स पुढची मूव्ह विसरल्यास त्यांच्या जवळ जाऊन त्यांना त्याची आठवण करून देतात.
ते त्यांची विचारपूस करत असल्याचे लोकांना भासवत असतात. ते एकतर पुढे काय करायचे ते सांगतात किंवा काही बॅक स्टेजमधून महत्त्वाचा संदेश अचानक आला तर तो सांगितला जातो.
एका मॅचमध्ये रोमन रिंग्सला कोमेंट्री करणार्याने ब्लड कॅप्सूल दिली होती.
असा हा तरुणांचा आवडता डब्लूडब्लूइ शो पूर्णपणे स्क्रिप्टेड असतो. डब्लूडब्लूइच काय तर इतरही बहुतेक शो हे स्क्रिप्टेड असतात, पण बघताना लोकांना ते खरोखरच असे होत आहे असे वाटते.
युट्युबवर देखील तुम्हाला याबद्दलच्या कितीतरी व्हिडीओज पाहायला मिळतील.
त्यामुळे या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मानवी क्षमतेच्या बाहेरच्या असणाऱ्या करामती कधीच घरी करण्याचा प्रयत्न करू नका असेही शोच्या दरम्यान सांगितले जाते. या फाईट पाहणे मनोरंजक असते यात शंका नाही.
पण त्या घरी करून पाहणे धोकादायक असते हेही लक्षात ठेवले पाहिजे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.