Site icon InMarathi

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरून व्हिडीओज डाऊनलोड करायचे आहेत? या ट्रिक्स वापरा..

Facebook, Twitter Videos Download.Inmarathi00

youtube.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण नेहेमी सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेक व्हिडीओ बघत असतो. आणि त्यातले काही आपल्याला आवडतात देखील. पण आपण त्या व्हिडीओज ला शेअर करू शकतो मात्र डाऊनलोड करू शकत नाही. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम ह्या सोशल साईट्सवर रोज अनेक व्हिडीओ अपलोड होत असतात. पण त्यावर डाऊनलोडचे ऑप्शन नसते. त्यामुळे कधी कधी आपल्याला हवे असलेले व्हिडीओ आपल्याला डाऊनलोड करता येत नाही.

 

business-opportunities.biz

पण आपण २०१८ सालात आहोत, जिथे आज टेक्नोलॉजीने एवढी प्रगती केली आहे तिथे ह्याने अडचण कशी होणार. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही अश्या सोप्प्या ट्रिक्स घेऊन आलो आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही सहजपणे हे सोशल साईट्सवरील व्हिडीओ डाऊनलोड करू शकता.

हे ऑनलाईन व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही काही वेबसाईट्सची मदत घेऊ शकता. ह्या साईट्सचा वापर करणे आगद सोप्पे आहे. ह्यासाठी कुठल्याही प्रकारचे सॉफ्टवेअर वगैरे इनस्टॉल करण्याची गरज नाही. पण ह्या वेबसाईट डेक्सटॉप किंवा लॅपटॉप करिता आहेत. तर मोबाईलवर व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही Snap Tube आणि Videoder ह्यांचा वापर करू शकता.

फेसबुक :

फेसबुक हि जगातील सर्वात लोकप्रिय अशी सोशल नेटवर्किंग साईट आहे. आपण जवळजवळ आपला रिकामा पूर्ण वेळ हा फेसबुक सर्फिंगमधेच घालवतो. ह्यावर देखील अनेक व्हिडीओ टाकले जातात.

फेसबुकवरील व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी आधी त्या व्हिडिओ स्क्रीनच्या मध्ये राईट क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर काही ऑप्शन्स येतील त्यापैकी Show Video URL ह्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला त्या व्हिडीओचा URL दिसेल त्याला कॉपी करा.

 

addictivetips.com

आता www.downloadvideosfrom.com ही वेबसाइट उघडा आणि त्यावरील बारवर ही URL पेस्ट करा. तुम्हाला हवा असलेला व्हिडीओ फॉरमॅट निवडा. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला व्हिडीओ डाऊनलोड होण्यास सुरवात होईल. आणि अश्यारितीने तुम्ही फेसबुक वरून व्हिडीओ अगदी सहजपणे डाऊनलोड करू शकाल.

ट्विटर :

ट्विटर देखील जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक आहे. जर तुम्हाला ट्विटर वरील व्हिडीओ डाऊनलोड करायचा असेल तर त्या पोस्ट वरील उजव्या बाजूला एक छोटासा Arrow तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्वात वर Copy link to tweet हे ऑप्शन दिसेल. ह्यावर क्लिक करा. आता त्या पोस्टची लिंक ही कॉपी झालेली असेलं. पण हे तुम्हाला दिसणार नाही तर केवळ कॉपी लिंकच नोटीफिकेशन येईल.

 

vengadordigital.com

आता http://www.downloadtwittervideo.com/ ही वेबसाईट उघडा. इथे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या बारवर राईट क्लिक करून ती लिंक पेस्ट करा. त्यानंतर खाली असलेल्या डाउनलोडिंग फॉरमॅटपैकी एक निवडा आणि व्हिडिओ डाउनलोड करा.

इन्स्टाग्राम :

इन्स्टाग्राम हा सध्याच्या तरुणाईचा सर्वात आवडता टाईमपास झालाय. आज तुम्हाला इन्स्टाग्रामवर अनेक फोटोज आणि व्हिडिओज बघायला मिळतात. पण त्यावर देखील व्हिडिओ डाऊनलोड करण्याचं ऑप्शन नसतं.

जर तुम्हाला इन्स्टाग्राम वरील कुठला फोटो/व्हिडिओ डाऊनलोड करायचा असेल तर सर्वात आधी आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट उघडा. जर तुम्ही मोबाईलवर अॅप उघडत असाल, तर कुठल्याही फोटो/व्हिडिओच्या उजव्या बाजूला तुम्हाला ३ डॉट दिसतील ह्या डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर copy share url ह्या ऑप्शन वर क्लिक करून त्या फोटो/व्हिडिओची URL कॉपी करून घ्या.

 

sprinklr.com

जर तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटर वापरात आहात तर इन्स्टाग्रामवर लॉगइन करा. ह्यामध्ये प्रत्येक फोटो/व्हिडिओच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉट तुम्हाला दिसतील. ह्या डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Go to post हे ऑप्शन दिसेल. ह्यावर क्लिक केल्यानंतर तो फोटो/व्हिडिओ एका नव्या विंडो मध्ये ओपन होईल.

येथून तुम्ही त्याचा URL कॉपी करा. त्यानंतर https://downloadgram.com/ ही वेबसाईट ओपन करा. ह्यावर ही कॉपी केलेली लिंक पेस्ट करून डाऊनलोडवर क्लिक करा. त्यानंतर फोटो/व्हिडिओ तुम्हाला कुठे सेव्ह करायचा आहे ते निवडा, त्यानंतर डाऊनलोड सुरु होईल.

ह्या अप्लिकेशन्समुळे तुम्ही २४ वेगवेगळ्या वेबसाईट्स वरून वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. पण हे App तुम्हाला Google Play Store वर मिळणार नाही. कारण गुगल ह्या व्हिडीओज डाऊनलोड करण्याची परवानगी देत नाही. पण हे Apps तुम्ही Snaptube आणि Videoder ह्या वेबसाईट्सवरून डाऊनलोड आणि इनस्टॉल करू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version