Site icon InMarathi

विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’ – कुठे आणि कसं ते वाचा!

Bruce Campbell home InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तुम्ही समुद्रकिनारी घर बघितलं असेल किंवा घनदाट रानात किंवा डोंगराच्या टोकावर उंचीवर काचेची घरं अनेक फोटोंमध्ये तुम्ही बघितली असतील पण त्याहीपेक्षा काहीतरी अचाट, विचित्र किंवा वेगळं आणि अद्भुत तुम्ही पाहिलं नसेल!

 

interior design ideas

 

जगात काही तरी जगावेगळं करून दाखवणे… ह्या वाक्याची आजची परिभाषाच बदलली आहे. ह्या व्याक्याचा काही लोकांनी एवढा शब्दशः अर्थ घेतला की, खरंच जगापेक्षा काहीतरी अतीच वेगळं करून बसतात. ज्याला आपण weird किंवा विचित्र म्हणतो!

असंच काहीतरी केलं आहे Bruce Campbell ह्यांनी. त्यांनी त्यांच्या स्वप्नाच्या घराची एक वेगळीच प्रतिमा सर्वांसमोर मांडली आहे.

 

metro

 

Bruce हे मागील ६ महिन्यांपासून एका विमानात आपलं घरं बनवून राहत आहेत. हा पण हे विमान हवेत उडत नाही तर ते नेहेमी जमिनीवरच असते. Bruce हे Aircraft Fleet Recycling Association (AFRA) चे सदस्य आहेत. ह्या ग्रुपचं काम म्हणजे हे जुन्या विमानांचे सुंदर घरांमध्ये रुपांतर करतात.

 

 

ह्याची सुरवात १९९९ साली झाली, जेव्हा Bruceने १००,००० मिलियन डॉलरमध्ये Boeing 727 हे विमान विकत घेतले आणि त्यालाच आपला महाल बनवला.

ह्या विमानाला एका घराचं रूप देण्यासाठी Bruce यांना अनेक वर्ष लागली.

या विमानाची डागडुजी करताना शक्यतो ब्रुस यांनी विमानाचे ओरिजीनल पार्ट्सच वापरणं पसंत केले आणि त्यातून ही अद्भुत घर उभं केलं! 

Aircraft Fleet Recycling Association (AFRA) चे सदस्य या नात्याने ब्रुस यांचं असं म्हणणं सुद्धा आहे की सगळ्या वापरात नसलेल्या विमानांच रूपांतरे  घरामध्ये केलं पाहिजे!

शिवाय यात वापरलेले मटेरीयल इतकं स्ट्रॉंग आहे की कोणत्याही वादळाचा किंवा भूकंपाचा ते सामना करू शकतं!

 

atlasobscura.com

 

ह्या विमानात बनलेल्या घरात दोन रेस्टरूम आणि दोन शॉवर आहेत. कॉकपिटला रीडिंग रूममध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. तसेच विमानाच्या पंखांना Deck बनविले गेले आहे. ह्या विमानाच्या १०६६ स्क्वेअर फुट एरियाचा Bruce ने पुरेपूर वापर केला आहे.

 

dailysportX

 

ही जुनं विमान आणून त्याचा हा कायापालट करण्यास ब्रुस यांनी १२०००० डॉलर्स पेक्षा जास्त खर्च केला आहे!

 

atlasobscura.com

 

याबाबत Obcura शी झालेल्या मुलाखतीत Bruceने सांगितले,

ही जागा लवकर खराब होणारी नाही, तसेच ह्याची साफ-सफाई करणे देखील खूप सोप्पे आहे. त्यासोबतच आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे इथे खूप जागा आहे.

 

atlasobscura.com

 

जर तुम्हालाही असा विमानाचा महाल हवा असेल तर तुम्ही Bruce ह्यांना संपर्क करू शकता, त्यांच्या वेबसाइट च्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला हव्या त्या वेळेत या विमानातल्या घराला तुम्ही भेट देऊ शकता!

तर ही आहे ब्रुस यांच एक वेगळं अद्भुत जग, पण ब्रुस त्यांच्या या विमानात बनवेलेल्या घरच्या पत्त्याच्या बाबतीत बरीच गुप्तता पाळून आहेत आणि ते अगदी साहजिक आहे!याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही पण त्यासाठी काही गोष्टी मान्य करायला लागतात!

 

NBC news

 

इतकं होऊनही ब्रुस म्हणतात की अजूनही ही घर पूर्णपणे तयार नाही झालं आहे, अजूनही बऱ्याच गोष्टी त्यांना करायच्या आहेत, त्या नक्की काय आहेत ही येणाऱ्या काही वर्षातच आपल्याला दिसेल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version