पाणी असणारे एक-दोन नव्हे, तब्बल पंधरा ग्रह सापडले आहेत !
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या संपूर्ण आकाशगंगेत एक पृथ्वीच असा ग्रह आहे ज्यावर जीवन आहे. आणि त्याचे कारण म्हणजे पृथ्वीवर पाणी आहे. म्हणूनच मानवांच्या राहण्यासाठी ही सगळ्यात सोयीस्कर आहे.
पण ते पाणी अतिशय बहुमुल्य आहे. सध्या आपल्याकडे असा एकच ग्रह असल्यामुळे आपल्याला पृथ्वीवरील जल संवर्धन करणे फार गरजेचे झाले आहे. कारण पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचा फार अत्यल्प साठा उरला आहे. जो देखील संपुष्टात येण्याचा मार्गावर आहे.
म्हणूनच जगभरातील वैज्ञानिक आकाशगंगेच्या पलीकडे जाऊन शोध घेत आहेत की, आपल्या पृथ्वीसारखा आणखी कुठला ग्रह आहे का? ज्यावर पाणी उपलब्ध असेल.
ह्याच शोधकार्य दरम्यान जपान येथील वैज्ञानिकांनी अश्या १५ नवीन ग्रहांचा शोध लावल्याचा दावा केला आहे. ह्यामध्ये एक सुपर अर्थ देखील आहे जेथे पाण्याचा साठा असल्याची शक्यता आहे.
वैज्ञानिकांच्या मते हे सर्व एक्सोप्लॅनेट एका लाल रंगाच्या छोट्या ताऱ्याभोवती परिक्रमा घालतात. हे तारे आकाराने लहान आणि थंड तापमान असलेले आहेत.
जपानच्या टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी हा शोध नासाच्या केपलर स्पेसक्राफ्टच्या दुसऱ्या अभियानाच्या आकड्यांवर अभ्यास केला.
नासाच्या ह्या स्पेसक्राफ्टने अमेरिकेच्या हवाई येथील टेलिस्कोप आणि स्पेन च्या नॉरडिक ऑप्टिकल टेलिस्कोपच्या मदतीने हा खास अंतराळ डेटा तयार केला आहे. ह्या नवीन एक्सोप्लॅनेट बाबतच्या शोधाबद्दल सांगताना जपानी वैज्ञानिक प्रो-हिरानो म्हणतात.
ह्या रिसर्चदरम्यान ज्या १५ ग्रहांचा शोध लावण्यात आला आहे त्यापैकी तीन ग्रह हे सुपर अर्थ असल्याचं मानल्या जात आहे. कारण ते आकाराने पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.
हे सर्व ग्रह आपल्या पृथ्वीपासून जवळपास २०० प्रकाशवर्ष दूर असलेल्या एका लाल ताऱ्याच्या भोवती परिक्रमा करत आहेत. ह्या ३ सुपर अर्थांपैकी बाहेरच्या बाजूने असलेल्या ग्रहावर पाणी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण ह्याबाबत कुठेलेही प्रमाण अजूनही सापडलेले नाही. त्यामुळे सध्याचं त्यावर भाष्य करणे कठीण आहे.
म्हणूनच नासा एप्रिल महिन्यात ट्रांजिटिंग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटेलाईट (टीईएसएस) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून ह्या ब्रह्मांडातील आणखी असे एक्सोप्लॅनेट शोधता येतील.
काही काळापुर्वीच नासा ने अंतराळातील तारे आणि ग्रहांच्या शोधासाठी बनविन्यात आलेल्या आर्टीफिशिअल ईंटेलिजन्स (एआय) सिस्टिमला जगासाठी सार्वजनिक केले आहे.
जेणेकरून ह्या तंत्राचा वापर करून जगभरातील वैज्ञानिक आपल्या सोलर सिस्टिम च्या पलीकडील ग्रहांचा शोध घेऊ शकतील. ह्या सिस्टिमच्या मदतीने एक न्यूरल नेटवर्क तयार करण्यात आले होते.
ज्याने नासाच्या केपलर स्पेस टेलीस्कोपने जमा केलेल्या माहितीच्या आधारे केपलर -90-आय आणि केपलर -80-जी नावाचे दोन ग्रह शोधुन काढले होते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.