Site icon InMarathi

महागाई ला नावं ठेवताय? परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महागाई “आवश्यक” असते! समजून घ्या!

Inflation and Economy.Inmarathi00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दरदिवशी कोणत्या न कोणत्या कारणावरून महागाई वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव तर आता गगनाला भिडले आहेत. साधी वस्तू घेताना देखील आता चार – पाच वेळा विचार करावा लागत आहे. त्यामुळे ह्या महागाईला लोक खूप कंटाळले आहेत. या महागाईमुळे लोक सरकारला दोष देत असतात, कारण लोकांचा पगार आणि त्यांच्या गरजा यांच्यातील असमतोल वाढत चालला आहे.

 

indiatoday.in

जिथे १० वर्षापूर्वी १००० रुपयांमध्ये खूप काही येत होते, तिथेच आज १००० रुपयांमध्ये खूप कमी गोष्टी खरेदी करता येतात. पण तुम्हाला हे माहित आहे का ? तुम्ही नेहमी नाव ठेवत असलेली ही महागाई आपल्या अर्थव्यवस्थेसाठी तेवढीच महत्त्वाची आहे. आज आपण महागाई आपल्या अर्थव्यवस्थेसाठी कशी महत्त्वाची आहे, याबद्दल माहिती घेऊया..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महागाईची व्याख्या :

महागाईची एक साधी परिभाषा म्हणजे ‘आवश्यक वस्तूंच्या आणि सेवांच्या किंमतीमध्ये सतत होणारी वाढ’. महागाई हे वस्तूंची मागणी आणि त्या वस्तूंच्या पुरवठ्यामधील अंतर यांच्यामुळे उद्भवणाऱ्या बाजारपेठेची परिस्थिती आहे. महागाईच्या काळामध्ये पैश्याचे मूल्य कमी होते आणि एखादी साधी वस्तू खरेदी करण्यासाठी खूप पैसे द्यावे लागतात.

 

zeebiz.com

महागाईचा अर्थव्यवस्थेवर होणारा सामान्य परिणाम :

विविध वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर, असे दिसून आले आहे की, चलनवाढीच्या मध्यम दराने अर्थव्यवस्थेमध्ये अधिक उत्पादनासाठी गुंतवणूकदार आणि उत्पादकांना प्रेरित केले, कारण त्यांना त्यांच्या खर्चाच्या तुलनेत अधिक परतावा मिळावा. ही परिस्थिती अर्थव्यवस्थेत रोजगार आणि क्रयशक्ती निर्माण करते म्हणून अर्थव्यवस्थेचा सर्व बाजूंनी विकास होतो.

पण जर उद्योजक ह्या मिळालेल्या फायद्याची परत गुंतवणूक करत नाहीत किंवा विलासी जीवनावर खर्च करत नाहीत किंवा उत्पादक कृतींमध्ये काही गुंतवणूक करत नाहीत. तर अशावेळी त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार नाही, कारण नवीन गुंतवणूक न केल्यामुळे नवीन नोकऱ्या उपलब्ध केल्या जाणार नाहीत आणि ग्राहकांची क्रयशक्ती देखील कमी होईल.

 

arabnews.com

महागाईचे नकारात्मक परिणाम :

पण महागाईचे काही नकारात्मक परिणाम देखील दिसून येतात. महागाईमुळे लोकांची खरे उत्पन्न कमी होते, कारण महागाईच्या तुलनेत लोकांचे पागार खूप कमी प्रमाणात वाढतात. त्यामुळे याचा सरळ परिणाम लोकांच्या बचतीवर आणि गुंतवणुकीवर होतो. या महागाईमुळे खूप कमी प्रमाणात शिल्लक त्यांच्याकडे जमा राहते, त्यामुळे ते वेगळी गुंतवणूक करू शकत नाहीत. यामुळे याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. अशाप्रकारे महागाईचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

महागाईमुळे समाजाच्या कमकुवत घटकांवर कसा परिणाम होतो ?

समाजामध्ये एक असा वर्ग असतो, जो एक निश्चित उत्पन्न प्राप्त करत असतो. यामध्ये दैनंदिन वेतन कमावणारे, निवृत्तीवेतन धारक. पगारदार इत्यादींचा समावेश होतो. महागाईमुळे या लोकांची खरेदी करण्याची शक्ती कमी होते, जे अर्थव्यवस्थेची एकूण मागणी कमी करते.

indiatimes.com

पण यावरून अर्थव्यवस्थेसाठी महागाई फायद्याची आहे की नाही हे ठरवता येत नाही. कारण महागाईबद्दल आपण पूर्ण विचार केला तर, आपल्याला असे आढळून येते की, चलनवाढीचा दर जर ३ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान असेल, तर तो अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे. पण जर हा दर या श्रेणीच्या पलीकडे गेला असेल, तर त्याचा देशातील उत्पादन क्षेत्रावर विपरीत परिणाम होतो आणि ते नोकरीच्या संधी आणि इतर संधी कमी करतो.

अशाप्रकारे महागाई ही नेहमी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असते आणि याचा सरळ परिणाम लोकांच्या जीवनावर देखील दिसून येतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version