' सर्वांच्या लाडक्या चॉकलेटचा जन्म आणि इतिहास खूपच आगळा-वेगळा आहे! – InMarathi

सर्वांच्या लाडक्या चॉकलेटचा जन्म आणि इतिहास खूपच आगळा-वेगळा आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चॉकलेट ह एकमेव असा पदार्थ आहे जो सर्वांच्या आवडीचा आहे. खुप कमी लोक असे असतात ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. जसा प्रत्येक गोष्टीचा काही ना काही इतिहास असतो तसाच ह्या चॉकलेटमागे देखील एक मोठा इतिहास आहे.

 

dark chocolate inmarathi

 

चॉकलेट अनेक वर्षांपासून आपल्या आवडीचा खाद्यपदार्थ म्हणून चालत आला आहे. त्याच्यामागे एक खुप मोठा इतिहास आहे. आणि हा इतिहास जवळपास १९०० ईस पूर्वीचा आहे. ह्याचे काही अंश मेक्सिकोच्या जवळपास असलेल्या परिसरात राहणाऱ्या प्री-ओल्मेक सभ्यतेशी निगडीत असल्याचे सांगितले जाते.

सर्वात आधी हे फळ कोको च्या झाडावर बघितलं गेलं आणि तेव्हापासूनच चॉकलेट बनविण्याची सुरवात झाली. सुरवातीला चॉकलेट खाल्ले नाही तर पिले जायचे. आणि त्याची चव अतिशय कडू आणि तिखट असायची.

 

coco plant-inmarathi
offthegridnews.com

१४ व्या शतकातील लोक ह्याचा वापर मुद्रा म्हणून करायचे. ह्याची देवाण घेवाण करून वस्तूंची खरेदी विक्री व्हायची. म्हणजेच त्यावेळी चॉकलेट खूप महत्वाचे होते.

 

chocolate-history-inmarathi02
ancient-origins.net

प्राचीन लोक कोको ह्याला देवाचं एक वरदान समजलं जायचं. लोक ह्याची पूजा करायचे आणि त्याला देवाचे जेवण म्हणून त्याचा सन्मान करायचे.

आधीच्या काळात चॉकलेट असं कोणीही खाऊ शकत नव्हतं. प्राचीन माया सभ्यतेनुसार चॉकलेट हे केवळ शासक, योद्धा, पुजारी, आणि उच्चस्तरावरील लोक यांच्या उपभोगाची वस्तू समजले जायचे. त्यामुळे केवळ ह्या लोकांनाच चॉकलेटचा वापर करण्याचा अधिकार होता.

जर कुठल्याही इतर व्यक्तीने त्याचे सेवन केले तर त्याला माया समाज कठोर दंड द्यायचा.

 

chocolate-history-inmarathi04
neatorama.com

सुरवातीच्या काळात चॉकलेटची चव अतिशय कडू होती. त्यानंतर त्याची चव बदलण्याकरिता त्याला भाजून, किसून त्यात पाणी, वॅनिला, मध, तिखट आणि इतर काही मसाले मिसळण्यात आले. पूर्वी काही भागात ह्याला शाही पेय समजलं जायचं, याचा उपयोग केवळ काही विशिष्ट कार्यक्रमांत केला जायचा.

 

chocolate-history-inmarathi
facts-about-chocolate.com

तसेच प्राचीन सभ्यतेनुसार चॉकलेटचा वापर हा गंभीर आजारांचे निदान करण्यासाठी देखील केला जायचा. ह्याचा वापर करून युद्धात घायाळ झालेल्या शिपायांच्या जखमा भरायच्या, असे देखील सांगितले जाते.

 

chocolate-history-inmarathi01
raredelights.com

हा होता चॉकलेटचा इतिहास आणि त्याच्या उत्पत्तीची कहाणी. ह्यावरून हेच कळून येते की आज आपण जे चॉकलेट खातो ते काही तसच्या तसं बनवलं गेलं नव्हतं, तर त्याचे प्रारंभिक स्वरूप हे अतिशय वेगळे होते.

म्हणजे त्याला बनविण्याच्या पद्धतीपासून ते खाण्याच्या पद्धतीपर्यंत सर्वच काही वेगळं असं होतं.

 

chocolate-history-inmarathi06
thefactsite.com

ज्या लोकांना चॉकलेट आवडत नाही त्यांच्याजवळ ह्याला वाईट ठरविण्याची अनेक कारणे असतात. त्यातूनच चॉकलेट विषयी काही मिथके देखील प्रसिद्ध आहेत. पण ती केवळ मिथकेच आहेत.

काही लोकांच्या मते चॉकलेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅफीन असते त्यामुळे चॉकलेटचे सेवन करू नये. पण जर तुम्ही चॉकलेटचा एक बार खाल्ला तर त्यात जेवढं कॅफीन असतं त्याहून कितीतरी जास्त कॅफीन हे एक कप कॉफीत असते.

 

chocolate-history-inmarathi05
irishtimes.com

अनेकांना असे देखील वाटते की चॉकलेटमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते आणि त्याने कॉलेस्ट्रोल वाढते. तर असं काही नसतं. ह्याबाबत अनेक रिसर्च करण्यात आल्या आहेत आणि त्यात हे सर्व खोटं असून चॉकलेट खाल्ल्याने असं काहीही होतं नसल्याचं सांगितलं गेलं. एवढचं काय तर वैज्ञानिकांनुसार १.४ ऑन्स चॉकलेट रोज खाणे चागंले असते त्याने कॉलेस्ट्रोल स्थिर राहते.

 

chocolate-history-inmarathi07
eleconomista.es

चॉकलेटमध्ये कुठलही पोषक तत्व नसतं म्हणू चॉकलेट खाण्यात काहीही फायदा नाही असेही अनेकांना वाटते. तर चॉकलेट हे मॅग्नेशियम, कॉपर, आयरन आणि झिंक यांचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 

girl eating dark chocolate

 

चॉकलेट खाल्ल्याने वजन वाढते. कुठल्याही गोष्टीचा अतिवापर किंवा अतिसेवन हे नुकसानदायकच असतं. पण जर चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याने आपले वजन वाढत नाही.

आज जी चॉकलेट आपण खातो त्यात आपल्याला निरनिराळे फ्लेवर्स मिळतात, वेगवेगळ्या स्वरुपात ही चॉकलेट आपण खातो. भविष्यात त्यावर आणखी प्रयोग होऊन त्यात आणखीन बदल होत राहतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?