Site icon InMarathi

नवीन कपड्यांसोबत जास्तीचे बटन आणि कापड का दिले जाते? जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या उन्हाळा नुकताच सुरु झाला आहे. त्यासोबतच अनेकांची शॉपिंग लिस्ट देखील तयार असेल. कारण थंडीच्या दिवसांचे कपडे आपण उन्हाळ्यात वापरात नाही. तसं तर शॉपिंग करायला केवळ एक कारण हवं असते, आणखी काही नाही. तर मग तुम्ही यावेळी देखील शॉपिंग कराल, आणि शॉपिंग केल्यावर घरी येऊन आधी ते सर्व कपडे घालून घरातल्या घरात एक फॅशन शो देखील होऊन जाईल.

 

Youtube.com

पण तुम्ही कधी लक्ष दिले असेल तर तुमच्या नक्की लक्षात असेल की, नवीन कपड्यांसोबत नेहेमी त्या कपड्याचा एक पीस आणि बटन मिळते. पण ते का मिळते ह्याचा कधी विचार केला आहे का?

कपड्यांसोबत मिळणारा तो एक्स्ट्रा पीस आणि एक्स्ट्रा बटन ह्याचा काही ना काही तरी उपयोग असेल ना !

 

vk.com

जेव्हा केव्हा आपण नवीन शर्ट, पॅण्ट, टॉप किंवा कुठला कुर्ता विकत घेतो तेव्हा त्यासोबत त्याच कपड्याचा एक एक्स्ट्रा छोटासा पीस आणि एक किंवा दोन बटन असतात. जर तुम्ही विचार करत असाल की हे एक्स्ट्रा कपडा कधी वेळ आली तर रफ्फू वगैरे करण्यासाठी वापरले जावे म्हणून दिले जाते, तर असं नाहीये. ह्यामागे काही वेगळंच कारण असतं.

 

oxotv.com

तर नवीन कपड्यांसोबत येणारे हे एक्स्ट्रा कापड ह्यासाठी दिले जाते की, तुम्ही त्याला धुवून हे महिती करू शकाल की, तुम्ही घेतलेले कपडे कुठल्या प्रकारचे आहेत. म्हणजेच धुतल्यावर त्याचा रंग जातो का, कपड्याला ब्लीच ची गरज आहे का? म्हणजेच कपड्यांसोबत मिळणाऱ्या ह्या एक्स्ट्रा कपड्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या कपड्यांना लवकर खराब होण्यापासून वाचवू शकता.

 

ties.com

तसेच कपड्यांसोबत मिळणाऱ्या एक्स्ट्रा बटनचा वापर तर सर्वांनाच माहित आहे. जर शर्ट किंवा कुर्त्याचे बटन तुटले तर त्याजागी आपण हे एक्स्ट्रा बटन वापरू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version