Site icon InMarathi

JNU मधील विद्यार्थ्याची कमाल : ९५% अपंगत्वावर मात करून मिळवली PhD!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” ही म्हण तशी अतिशयोक्तीच. काहीही केलं तरी वाळूतून तेल निघूच शकत नाही. पण – हे म्हणताना, आपण आपल्या जीवनात कसे assumptions तयार करतो हे ही कळतं. असंच एक आपलंच आपल्यावर लादलेलं मत असतं – शारीरिक अपंगत्वासारख्या मोठ्या अडचणीवर मात करणं जवळपास अशक्यच – हे. JNU (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) च्या अक्षांश गुप्ताने हे गृहीतक धुळीस मिळवलंय.

९५% अपंगत्व असलेल्या ३२ वर्षीय अक्षांशला, सेरेब्रल पाल्सी हा आजार झालाय. ह्या आजारात, अनेक अवयवांची हालचाल कायमची बंद होते. हा आजार मेंदूला दुखापत झाल्यास किंवा मेंदूची पुरेशी वाढ नं झाल्यास होतो. अक्षांशची कमरेखालची हालचाल होत नाही. त्यांचे हात सुद्धा नियंत्रित हालचाल करू शकत नाहीत. त्यांचं बोलणं अस्पष्ट आहे.

Image source: amarujala

अश्या परिस्थितील अक्षांशने, जिद्दीने डॉक्टरेट मिळवलीये. त्यांच्या PhD थेसिसचा विषय होता – Brain Computer Interface – मेंदू आणि कम्प्युटरच्या मधला दुवा. एवढंच नाही, कोलेज कॅम्पसमध्ये “बंटी दादा” नावाने ओळखल्या जाणाऱ्या अक्षांशने, आपल्या विषयावर भाषण देण्यासाठी मलेशियापर्यंत धडक मारली आहे. सुदृढ शरीर असणाऱ्या अनेकांसाठी जे कठीण आहे, ते अक्षांशने करून दाखवलंय.

Image source: Indiatoday

JNUच्या कावेरी हॉस्टेलमधल्या अक्षांशच्या रूममध्ये आपल्याला त्यांची व्हीलचेअर, रेडीओ, कंप्युटर, खूपसारी पुस्तकं आणि — लक्ष्मी, सरस्वती, गणपती ह्यांच्यासोबत त्यांच्या आईचा फोटो दिसतो. २०११ साली त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांच्या शिक्षणात त्यांच्या आईचा हात आहे – कारण आईच्या आग्रहामुळेच अक्षांश शिकू शकले.

Image source: The Logical Indian

उत्तरप्रदेशमधील जौनपुर ह्या गावच्या अक्षांशने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या देशातील अपंगांकडे बघण्याची वृत्ती सांगितली. भावंडाना शाळेत जाताना बघून त्यांचीसुद्धा शिकण्याची इच्छा व्हायची – पण त्यांना शाळेत प्रवेश मिळत नव्हता. “शिकून काय करणार?” असा प्रश्न विचारला जायचा. परंतु आईच्या निग्रहमुळे त्यांचं शिक्षण झालं.

पियुष मौर्या, जे JNU मध्ये M Phil शिकत आहेत, ते म्हणतात की अक्षांश अत्यंत तल्लख बुद्धीचे आहेत. अक्षांशला हे सिद्ध करायचं आहे की — अपंगत्व ही गोष्टच मित्थ्या आहे!

वा अक्षांश! तुमच्या जिद्दीला नमन!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version