' “अजून खूप काही करायचं आहे” : निवृत्त जोडप्याने घालून दिलाय समाजसेवेचा असामान्य आदर्श – InMarathi

“अजून खूप काही करायचं आहे” : निवृत्त जोडप्याने घालून दिलाय समाजसेवेचा असामान्य आदर्श

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ज्या वयात लोक आराम आणि शांतीपूर्ण जीवन जगण्याचा विचार करतात त्या वयात वेंकट आणि विजया हे गरिबांची मदत करत आहेत. १० वर्षाआधी हे दाम्पत्य मस्कटचे आपले सुखवस्तू जीवन सोडून भारतात परतले.

त्यांनी येथे येऊन निश्चय केला की ते आपले संपूर्ण जीवन गरीब लोकांच्या कल्याणासाठी त्यांची सेवा करण्यासाठी समर्पित करतील. पण ह्या दोघांनाही हे काम कसे करायचे ह्याचा काहीही अनुभव नव्हता.

म्हणून त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम Volunteering म्हणून काम करण्यास सुरवात केली. एका वर्षातच यांनी गरीब स्त्रिया आणि त्यांच्या मुलांकरिता काम करण्यास सुरु केले.

 

Swabhimaan11 InMarathi

 

अय्यर दाम्पत्याने बघितले की, बंगळूरू येथील महिला आणि लहान मुले ह्यांसातही तर अनेक अनाथालय आणि आश्रम आहेत. पण त्या एकट्या मातांसाठी आणि त्यांच्या बाळांसाठी कुठेही अशी सुविधा नाही, ज्यांना त्यांच्या घरातून बाहेर करण्यात आले. तर अनाथालय देखील अश्या मुलांना घेत नाहीत ज्यांचे आई-वडील जिवंत असतील.

Volunteering दरम्यान अय्यर दाम्पत्याने कमी वयाच्या अश्या अनेक महिला बघितल्या ज्यांना त्यांच्या पतींनी लहान मुलांसह घरातून काढून टाकलं. अश्यात त्यांच्याजवळ रस्त्यावर राहण्याशिवाय आणखी कुठलाही पर्याय उरत नाही.

पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या स्त्रियांना अशी काही काम करावी लागत होती, ज्यासाठी त्यांना त्यांच्या मुलांच्या आजूबाजूच्या लोकांकडे ठेवावं लागायचं. अश्या परिस्थितीत त्यांची मुले सुरक्षित नव्हती.

 

ayyar couple-inmarathi0

 

ह्या सर्व समस्यांना ध्यानात घेऊन २००७ साली वेंकट आणि विजया यांनी स्वाभिमान स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. जिथे या स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना मदत मिळेल. या दरम्यान सर्वात आधी वेंकट आणि विजया यांनी झोपडपट्टीत आपल्या आईसोबत राहणाऱ्या ३-५ वर्षांच्या १५ लहान मुलींना आपल्या एनजीओत आणले.

एनजीओमध्ये आल्यानंतर ह्या सर्व मुली चांगल्या शाळेत शिकायला लागल्या, त्यांना चांगलं खायला आणि चांगले कपडे घालायला मिळाले. जे त्यांना मिळायला हवं होतं. ह्या मुलींच्या मातांना त्यांना भेटू दिले जात होते, तर सुट्ट्यांमध्ये काही लोक आपल्या मुलींना घरी देखील घेऊन जात असत.

 

ayyar couple-inmarathi02

 

वेंकट आणि विजया यांनी ह्या १५ मुलींचीच नाही तर झोपडपट्टीत राहणाऱ्या पण शिकण्याची इच्छा असलेल्या इतर गरजू मुलांची देखील मदत केली. जे मुलं अभ्यासात चांगले होते त्यांना ह्या दाम्पत्याने स्कॉलरशिप देखील दिली.

वेंकट आणि विजया यांचे पहिले ध्येय हे बंगळूरूच्या राजेंद्र नगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणणे हा होता.

वेंकट आणि विजया त्या स्त्रियांना वित्तीय मदत देखील देतात ज्यांना छोटे-मोठे व्यवसाय सुरु करायचे असेल. ह्यांनी कपड्यांच्या पिशव्या बनविणारी एक युनिट देखील उघडली आहे. जिथे ३० हून अधिक स्त्रिया काम करतात. सोबतच येथे एक पॅकेजिंग युनिट देखील आहे. ज्यामुळे अनेक स्त्रियांना रोजगार मिळाला आहे.

 

ayyar couple-inmarathi01

 

येथे काही असे लोक देखील आहेत, जे एकेकाळी रोजगार मिळविण्यात असमर्थ होते. पण आज ते देखील येथे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. स्वाभिमान संस्थेत काम करणारे सर्व Volunteer हे झोपडपट्टीत राहणारे आहेत.

इथे रोज सायंकाळी सर्वांना मोफत जेवण दिले जाते. एवढचं नाही तर महिन्यातून एकदा मोफत किराणा देखील दिला जातो. आज स्वास्थ्य, शिक्षा, खाणेपिणे ते रोजगार पर्यंत सर्वकाही सुविधा त्यांना दिल्या जात आहेत.

 

ayyar couple-inmarathi03

 

झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याचं अस्वच्छ राहणीमान. त्यामुळे होणारे आजार. मग अश्यात जर घरातील एकुलती एक कमावती व्यक्ती आजारी पडली तर घर चालविणे अतिशय कठीण होऊन जाते.

जर कधी कुठल्या व्यक्तीला एखादा गंभीर आजार झाला तर त्यांच्याजवळ एवढा पैसाही नसतो की, त्यावर उपचार करू शकेल. अश्यात ह्या दाम्पत्याने एक क्लिनिक देखील उघडले आहे. येथे रोज जवळपास १०० झोपडपट्टीतील लोक मोफत उपचार घेतात.

बंगळूरू येथील ३ सॉफ्टवेअर कंपनी आपल्या कर्मचार्यांच्या जेवणातून उरलेले अन्न स्वाभिमान संस्थेला देते. ज्याच्या मदतीने जवळपास ५०० गरीब लोकांना ते रोज सायंकाळचे जेवण दिले जाते.

वेंकट सांगतात की,

“अजून खूप काही करायचं आहे. कधी कधी मी अतिशय निराश होऊन जातो, पण तरी रोज सकाळी एक नवी उर्जा घेत उठतो की, अजून खूप काही करायचं आहे.”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?