' अंतराळवीर बनायचे असेल तर ‘ह्या’ खडतर परिश्रमांची तयारी ठेवलीच पाहिजे! – InMarathi

अंतराळवीर बनायचे असेल तर ‘ह्या’ खडतर परिश्रमांची तयारी ठेवलीच पाहिजे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या अंतराळात राहून नवनवीन शोध लावणाऱ्या अंतराळवीरांबद्दल आणि, त्यांच्या अंतराळातील वास्तव्याबद्दल, आणि तिथल्या प्रतिकूल परिस्थिती राहण्यासाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणा बद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल असते. पृथ्वीवरील वातावरण माणसाला राहण्यासाठी सर्वात अनुकूल मानले जाते. पण अंतराळात नेमकी याच्या विपरीत परिस्थिती असते.

इथल्या आणि तिथल्या वातावरणात कमालीचा फरक असतो. या बदलामुळे न्ताराल वीरांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

या परिस्थितीत सहजपणे वास्तव्य करता यावे आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण मोठे खडतर असते. या लेखात आपण अंतराळ वीरांना दिल्या जाणाऱ्या या विशेष प्रशिक्षणा बाबत जाणून घेणार आहोत.

 

fm.cnbc.com

अंतराळवीर होण्यासाठी असलेल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती बाबतच्या अटी:

अंतराळ वीर बनण्यासाठी प्रत्येक देशाच्या प्रशिक्षण संस्थांनी शारीरिक क्षमतेबाबतच्या अटी नक्की केल्या आहेत. यानात बसल्यानंतर सरळ वरच्या दिशेने टेक ऑफ घेताना बसणारा जर्क सहन व्हायला व्यक्तीची शारीरिक क्षमता तंदुरुस्त असावी लागते. त्याचबरोबर अंतराळात गेल्यानंतर कायम राहणाऱ्या वजनविरहित अवस्थेशी जुळवून घेणे हेही शारीरिक दृष्ट्या जिकीरीचे असते.

त्यामुळे त्या मिशनमध्ये भाग घेणाऱ्या पायलट, शास्त्रज्ञ, कमानडर या सर्वांची उंची कमीत कमी १४७ सेंटीमीटर उंच असायलाच हवी अशी अट घालण्यात येते. सामान्य रक्तदाब आणि चांगली दृष्टी असणे या दोन गोष्टीही तितक्याच महत्वाच्या.

 

physical-training-inmarathi
asc-csa.gc.ca

पण अंतराळात जाण्यासाठी ठराविक अशी वयाची अट निश्चित कार्यात आलेली नाही. सर्वसाधारणपणे अंतराळवीरांचे वय 25 ते ४६ वर्षांच्या दरम्यानचे असते. पण यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनीही संशोधनासाठी अंतराळात गेल्याची अनेक उद्गाराने आहेत.

अंतराळवीरांना दिले जाणारे प्रशिक्षण :

अंतराळ प्रशिक्षण संस्थेने घालून दिलेल्या शिक्षणाच्या अट पूर्ण करणे प्रशिक्षण घेण्यासाठी बंधनकारक असते. त्याचबरोबर त्या क्षेत्रात काम करण्याचा काही वर्षांचा अनुभव आणि मुलभूत ज्ञान असणे आवश्यक असते. पायलट आणि कमांडर या दोन पदांसाठी विमान उड्डाण क्षेत्रातला अनुभव असण्याची अट घातली जाते.

हा अनुभव नागरी हवाई क्षेत्रातला कींव संरक्षण क्षेत्रातला असावा लागतो.

पण अंतराळवीराची शैक्षणिक पार्श्वभूमी उच्चशिक्षित शास्त्रज्ञ म्हणून असते. त्यांना हवाई उड्डाण क्षेत्रातला अनुभव अगदी क्वचितच असतो. अंतराळवीर म्हणून निवड झाल्यानंतर प्रत्येकाला अंतराळ प्रशिक्षण केंद्रातून अंतराळात राहण्या आणि काम करण्यासाठीचे खडतर प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते. प्रत्येक अंतराळ वीराला या प्रशिक्षणा दरम्यान विमान उडवण्यास शिकवले जाते.

 

youtube.com

या कामात पारंगत असणाऱ्या व्यक्तींच्या सोबत काम करण्यासाठी त्यांची नेमणूक केली जाते. विशेषतः अंतराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काम करण्यासाठी जाणार असलेल्या प्रशिक्षणार्थींना हे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते.

या दरम्यान सर्व अंतराळवीरांना जखम किंवा शारीरिक इजा झाल्यानंतर करण्याच्या प्रथमोपचार शिकवले जातात.  यातील महत्वाचा भाग म्हणजे, ज्या प्रणालीच्या आधारे ते अंतराळात काम करणार आहेत टी त्यांना वर्गात बसून शिकवली जाते. संशोधनाचे विविध पैलू उलगडून संगितले जातात.

शारीरिक प्रशिक्षण :

अवकाशातील वातावरण दैनंदिन मानवी व्यवहारासाठी प्रतिकूल असते हे आपण जाणतोच. आपण पृथ्वीवर राहताना 1g इतक्या गुरुत्वीय बलाला प्रतिकार करत असतो. म्हणजे आपल्या शरीराची रचना तितक्या गुरुत्वीय बल असताना काम करण्यासाठी झालेली असते. पण अंतराळात गुरुत्वीय बळ जवळजवळ नसल्यात जमा असते.

गुरुत्वीय बलातील हा फरक आणि त्याच्याशी जुळवून घेणे हे अवघड काम! या परिस्थितीत शारीरिक हालचाली कशा कराव्यात, अवयव कोणत्या स्थितीत ठेवावेत यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे महत्वाचे असते.

त्याच यानात पृथ्वीवर जवळजवळ सारखी अवस्था निर्माण करून त्या अवस्थेत राहण्यासाठी तालीम करून घेतली जाते.

नासा सारख्या प्रगत प्रशिक्षण संस्थात व्हर्च्युअल रिअलिटीचे तंत्रज्ञान वापरून तिकडच्या परिस्थितीला अनुकरणीय वातावरण तयार करून त्या वातावरणात राहण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

म्हणजे ग्रह सोडण्याच्या आधी शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूल परिस्थितीत राहण्यासाठी त्यांचा कसून सराव घेतला जातो.

 

training-astronauts-neutral-inmarathi
static.gbtimes.com

या प्रशिक्षणाचा शेवटचा भाग सर्वात महत्वाचा असतो. पहिल्या दिन भागात त्यांना शारीरिक आणि मानसिकरित्या अंतराळात स्थिर राहण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. शेवटच्या भागात, ज्या मोहिमेसाठी ते अंतराळात जाणार आहेत, त्या मोहिमेच्या प्रत्येक पैलूशी त्यांची ओळख करून दिली जाते.

मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला अंतराळात गेल्यानंतर त्याने करायच्या कामाची काटेकोरपणे माहिती करून दिली जाते.

या संपूर्ण प्रशिक्षणाचा कालावधी थोडाथोडका नाही तर सुमारे चार साडेचार वर्षांचा असतो. एक अंतराळ मोहीम यशस्वी करण्यासाठी कमालीचे खडतर प्रशिक्षण आणि अभ्यासाची गरज असते.

त्यामागे अनेक कामगारांचे, प्राध्यापकांचे, प्रशिक्षण देणाऱ्या तज्ञांचे तेवढेच योगदान असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?