' जगातील सर्वात धोकादायक विमानतळे : येथे छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकते – InMarathi

जगातील सर्वात धोकादायक विमानतळे : येथे छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विमानाने फिरायला तर आपल्या सर्वांनाच आवडत असेल, कारण विमानातून फिरण्याची मज्जा इतर मार्गाने फिरण्याच्या तुलनेत काही वेगळीच असते. विमानात बसल्यावर जणू काही आपण उडतच आहे, असा भास होतो.

पण या विमानाच्या प्रवासामध्ये धोका देखील कधी – कधी तेवढाच मोठा असतो, कारण विमानाच्या अपघातामधून वाचणे सहसा शक्य नसते. विमानाचे जास्तकरून अपघात हे टेक – ऑफ करताना किंवा लँडिंग करताना होतात.

आज आपण जगातील अशा काही विमानतळांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना जगातील काही धोकादायक विमानतळांमध्ये गणले जाते.

१. कौरशेवेल विमानतळ

 

Most dangerous airport runway.Inmarathi
youtube.com

कौरशेवेल विमानतळ हे फ्रान्समध्ये आहे. या विमानतळाची उंची समुद्रतळापासून ६५५८ फूट एवढी आहे आणि धावपट्टीची लांबी १७६२ फूट एवढी आहे.

ऊंच आणि बर्फाने झाकलेल्या पर्वतांवर बनलेल्या या विमानतळावर विमानाची लँडिंग करणे खूप धोकादायक असते.

या ठिकाणी छोटी विमानेच उतरतात आणि उड्डाण करतात. कितीतरी वेळा येथे धुके आणि ढगांच्यामधून लँडिंग करणे खूप धोकादायक असते.

२. जिब्राल्टर विमानतळ

 

Most dangerous airport runway.Inmarathi1
spanish-airport-guide.com

हे विमानतळ जिब्राल्टर बेटावर आहे. या विमानतळाची उंची समुद्रतळापासून १५ फूट एवढी आहे आणि धावपट्टीची लांबी ५५११ फूट एवढी आहे. हे जगातील एकच असे विमानतळ आहे, ज्याच्या धावपट्टीच्यामधून रस्ता जातो.

समतोल जागेच्या कमीमुळे येथे विमानतळ आणि रस्ता एकत्र आहेत. जेव्हा विमान रस्त्यावरून टेक – ऑफ किंवा लँडिंग करते, तेव्हा रस्त्यावरील ट्रॉफिक रोखले जाते.

३. तेनजिंग – हिलेरी विमानतळ

 

Most dangerous airport runway.Inmarathi2
youtube.com

हे विमानतळ पूर्व नेपाळमध्ये सागरमाथा जोनमध्ये आहे. या विमानतळाची उंची समुद्रतळापासून ९३३४ फूट एवढी आहे आणि धावपट्टीची लांबी १७२९ फूट एवढी आहे.

या विमानतळाला हिस्ट्री चॅनलने मोस्ट एक्स्ट्रीम विमानतळामध्ये समविष्ट केले आहे. २००८ मध्ये याचे नाव एडमंड हिलेरी आणि शेरपा तेनजिंगच्या नावावरून तेनजिंग – हिलेरी विमानतळ ठेवण्यात आले.

येथे नेहमी जोरात हवा वाहत असते आणि ही धावपट्टी जिथे संपते, तिथून खोल दरी सुरु होते. या धावपट्टीवर फक्त छोटे हेलिकॉप्टर्स आणि विमाने उड्डाण भरतात आणि उतरतात.

४. मादेईरा विमानतळ

 

Most dangerous airport runway.Inmarathi3
aviationcv.com

हे विमानतळ मादेईरा बेटावर आहे. या विमानतळाची उंची समुद्रसपाटीपासून १९० फूट एवढी आहे आणि धावपट्टीची लांबी ९१२४ फूट एवढी आहे. हे विमानतळ छोट्या धावपट्टीच्या बरोबर समुद्र आणि पर्वतांनी घेरलेले आहे.

येथे पॅसिफिक महासागरावरून जोरात वाहणाऱ्या हवेच्या मधून विमान उडवणे खूप कठीण आहे. येथे फक्त अनुभवी पायलटच विमानाची लँडिंग करू शकतो.

५. गुस्ताफ -३ विमानतळ

 

Most dangerous airport runway.Inmarathi4
mapio.net

हे विमानतळ कॅरेबियन बेटावर आहे. या विमानतळाची उंची समुद्रसपाटीपासून ४८ फूट एवढी आहे आणि धावपट्टीची लांबी २१३३ फूट एवढी आहे. येथे स्मॉल रिजनल कमर्शियल एअरक्राफ्ट आणि चार्टर विमानेच उतरतात.

येथे थोडीशी अरुंद आणि घसरण असणारी एअरस्ट्रीप आहे, जी सरळ समुद्राच्या किनारपट्टीवर लागून आहे. कितीतरी वेळा सनबाथ घेणाऱ्या लोकांच्या थोड्या वरूनच विमान उड्डाण करते.

६. जुआनको ई. यराउस्किन विमानतळ

 

Most dangerous airport runway.Inmarathi5
youtube.com

हे विमानतळ साबाच्या डच कॅरिबियन बेटावर आहे. या विमानतळाची उंची समुद्रसपाटीपासून ६० फूट एवढी आहे आणि धावपट्टीची लांबी १३०० फूट एवढी आहे.

हे जगातील सर्वात छोटी कमर्शियल धावपट्टी आहे, खरेतर ही धावपट्टी फक्त ३९६ मीटर (१३०० फूट) लांब आहे आणि याच्या एकीकडे ऊंच पर्वत तर दुसरीकडे खोल समुद्र आहे.

त्यामुळे या विमानतळावर जेट एअरक्राफ्टसारखी मोठी विमाने उतरू शकत नाहीत, कारण याची धावपट्टी खूप लहान आहे आणि एक लहानशी चूक देखील येथे महागात पडू शकते.

७. बार्रा विमानतळ

 

Most dangerous airport runway.Inmarathi6
hial.co.uk

बार्रा विमानतळ हे स्कॉटलंडमध्ये आहे. या विमानतळाची उंची समुद्रतसपाटीपासून ५ फूट एवढी आहे आणि धावपट्टीची लांबी २७७६ फूट एवढी आहे. हे जगातील एकमात्र असे विमानतळ आहे, जिथे विमानांच्या उड्डाणासाठी धावपट्टीच्याऐवजी बीचचा वापर केला जातो.

या विमानतळाला हायलँड अँड आइसलँड एयरपोर्ट्स लिमिटेड ऑपरेट करते. याची सुरुवात १९३६ मध्ये झाली.

येथे ट्रँगल म्हणजेच त्रिकोणी आकारामध्ये तीन धावपट्टी आहेत, ज्यांच्यावर वुडन पोलने मार्क केले आहे. कितीतरी वेळा समुद्राच्या हायटाइडच्या दरम्यान येथील धावपट्टी पाण्यामध्ये पूर्णपणे डुबून जाते.

८. आइस रनवे

 

Most dangerous airport runway.Inmarathi7
wired.com

आइस रनवे हे अमेरिकेमध्ये आहे. या विमानतळाची उंची समुद्रतळापासून १ फूट एवढी आहे आणि धावपट्टीची लांबी १०००० (बर्फामुळे) फूट एवढी आहे. अमेरिकेच्या अंटार्क्टिक प्रोग्रामसाठी मॅकमर्डा स्टेशनवर बनले आहे.

या भागामध्ये दोन अजून धावपट्टी आहेत. एक्स्ट्रीम वेदर कंडीशनमुळे विमान उतरवणे येथे खूप धोकादायक असते.

येथे फक्त रिसर्च स्टेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना आणण्यासाठी आणि नेण्यासाठी, तसेच गरजेच्या वस्तू पोहोचवण्यासाठीच फक्त येथे विमाने उतरतात.

अशी ही विमानतळे खूप धोकादायक मानली जातात, जिथे एका लहानश्या चुकीमुळेही मोठा अपघात होऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?