' Avengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा! – InMarathi

Avengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

Avengers : Infinity Warsचं नवीन trailer तुम्ही नीट बघितलं का? आपल्या आवडत्या charactersचा मृत्यू बघण्यास तयार रहा!!!

जवळजवळ चाळीस फ्रेम असलेलं अव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर्सचं नवीन ट्रेलर नुकतंच रिलीज झालं आहे. तुम्ही बघितलं असेलच. पण लक्षपूर्वक बघितलंत का? जर बघितलं नसेल तर बऱ्याच महत्वाच्या गोष्टी तुमच्या नजरेतून सुटल्या असणार.

 

infinity war trailer inmarathi

 

आपण जरा खोलात जाऊन बघूया हे ट्रेलर आपल्याला काय सुचवतंय ते!

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स ( MCU )चा जवळजवळ १० वर्षांचा प्रवास, १८ सिनेमांचा संदर्भ…ज्यांनी आधी mcuतील सिनेमे बघितले नाहीत त्यांना जरा समजायला जड जाईल. पण hardcore fans आणि ज्यांनी हे सिनेमे बघितले आहेत त्यांच्यासाठी हे ट्रेलर मेजवानीच आहे!!

पहिल्या फ्रेममध्ये गमोरा ज्या “स्नॅप”बद्दल बोलतेय तो स्नॅप actually इन्फिनिटी गौंटलेट या कॉमिक्समध्ये दाखवला गेलाय. ज्यात थॅनॉस खरोखर अर्ध युनिव्हर्स “चुटकी सरशी” नष्ट करून टाकतो! (खालील चित्र बघा) गमोरासोबतची थॅनॉसची बॅकस्टोरीदेखील आपल्याला चित्रपटात बघायला मिळेल असं ट्रेलरवरून दिसतंय! कारण, एका फ्रेममध्ये थॅनॉस आणि त्याची आर्मी तिच्या प्लॅनेटवर हल्ला करतांनाचा प्रसंग आपल्याला दिसतो!

 

thanos snap distroying half universe inmarathi

 

एबनी मॉ डॉक्टर स्ट्रेंजच्या मनावर ताबा मिळवून त्याला थॅनॉसचा प्यादा बनवणार असं एका फ्रेममध्ये आपल्याला दिसतंय. मॉ हा एक अत्यंत क्रूर व पॉवरफुल माईंड कंट्रोलर आहे हे कॉमिक बुक फॅन्सना माहित आहेच.

 

doctro strange comics inmarathi

 

थोरचा नवीन हातोडा अर्थातच ” स्टोर्मब्रेकर ” आपल्याला बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. एका awesome फ्रेममध्ये थोर विजांच्या कडकडाटांसकट दिसलाय आणि ग्रूट, रॉकेट त्याच्याकडे अचंबित होऊन बघतायत!!!

स्टॉर्मब्रेकर आपल्याला प्रत्यक्ष जरी दिसत नसला तरी अनेक खेळणी बाजारात दाखल झाली आहेत, त्यात असंच दिसतंय…

thor storm breaker inmarathi

 

पहिल्या ट्रेलरमध्ये आपल्याला व्हिजन च्या कपाळावर असलेला स्टोन थॅनॉसची “माणसं” बळजबरी काढताना दिसली होती. ह्या ट्रेलरमध्ये जर नीट निरीक्षण केलं तर कॅप्टन अमेरिका आणि इतर काही अव्हेंजर्स व्हिजनला व्हकांडा येथे घेऊन येत आहेत. आणि एका अगदी फास्ट फ्रेममध्ये व्हिजन आपल्याला टेबलवर आडवा पडलेलाही दिसत आहे!

हल्क हल्कबस्टर घालून लढणार असं आता निश्चित वाटतंय! पहिल्या ट्रेलरमध्ये फक्त शक्यता वाटली होती!!!! So very excited about that! पण एका फ्रेम मध्ये थॅनॉसची आर्मी त्या सूटचे पार चिथडे करताना दिसत आहे! हल्क त्यातून बाहेर पडून सगळ्यांचा चेंदामेंदा करेल अशी आशा करूया!!!

एका अफलातून फ्रेममध्ये आयर्न मॅनचे फूट थ्रस्टर्स रॉकेट बस्टरमध्ये convert होतात! Totally awesome!

 

iron man suit with rocket thurster inmarathi

 

ट्रेलरमध्ये थॅनॉसच्या ग्रहावरचे अर्थात टायटनवरचेसुद्धा scenes दिसतायेत. तिथेही बॅकस्टोरी बघायला मिळणार आपल्याला. थॅनॉस ह्या characterबद्दल जरा खोलात जाणून घेता येईल त्यामुळे!

स्पायडर मॅन आयर्न सूटमध्ये दिसतोय…ते आपण पहिल्या ट्रेलरमध्येच बघितलं म्हणा! फक्त मास्क आणि बाकी casual कपडे हा त्याचा कॉमिक बुक मधला टिपिकल अवतार सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय!

आता जरा अंगावर काटा आणणारा भाग …..आणि तो म्हणजे कुणाचा मृत्यु होणार!!!?

सिनेमाचे दिग्दर्शक Russo भावांनी अनेक पात्र ह्या सिनेमांमध्ये मरण पावणार हे आपल्याला सुचवलच आहे!

माझा guess – आयर्न मॅन!

कारण ह्या MCU ची सुरुवात त्यानेच केली आणि एका scene मध्ये थॅनॉस म्हणतो, “I hope they remember you”. शिवाय आयर्न मॅन त्याच्या फाटलेल्या सूटसोबत दिसतोय आणि खूप जखमीसुद्धा! पण हि एक ट्रिक देखील असू शकते!

 

iron man torn suit thanos inmarathi

 

इन्फिनिटी गौंटलेट ह्या कॉमिक बुकमध्ये कॅप्टन अमेरिका मरतो हे बऱ्याच लोकांना माहित आहेच!

 

captain america death inmarathi

 

व्हिजन मरण पावण्याची सुद्धा शक्यता आहेच!

मार्क रफएलो अर्थात हल्क ह्याने एका interview दरम्यान सगळेच characters मरणारेत असं चुकून बोलल्यानंतर जीभ चावली होती!

त्यामुळे हा सिनेमा भावनिक असणार हे मात्र नक्कीच!

हुश्श! इतके सगळे पात्र हाताळणं किती कठीण काम आहे हे! Russo भावंडांची कमाल आहे!!!

हे ट्रेलर बघून तर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!!! सिनेमा कधी एकदाचा रिलीज होतोय असं झालंय!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?