Site icon InMarathi

उत्खननात सापडलेल्या अवशेषांचे वय निश्चित्त करण्याचे अफलातून तंत्रज्ञान : रेडिओकार्बन डेटिंग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फार वर्षांपूर्वीची म्हणजेच पुरातत्वीय काळातील लाकडी कलाकृती, प्राचीन मानवी अवशेष इत्यादी हे किती जुने असू शकतात, ते कुठल्या सालचे असतील ह्याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ जी टेक्निक वापरतात त्याला कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती (Radiocarbon Dating) असे म्हणतात. हे सुमारे ६२,००० वर्षांपूर्वीच्या वस्तूंवर वापरले जाऊ शकते. याचा पद्धतीचा शोध विल्लर्ड लिब्बी यांनी शिकागो विद्यापीठात लावला होता.

 

thefamouspeople.com

ह्यासाठी आपल्याला आयसोटोप काय असते हे समजून घ्यायला हवे.

आयसोटोप म्हणजे एकाच एलिमेंट चे दोन किंवा त्याहून जास्त अणू असणे. म्हणजे जर तुम्ही दोन आयसोटोप्सला वेगवेगळे केलं तर त्यात तुम्हाला समान प्रमाणात प्रोटॉन्स मिळतील पण त्यातील न्युट्रॉन्सचे प्रमाण मात्र वेगवेगळे असेल.

त्यामुळे दोन आयसोटोप्सच्या रिलेटिव्ह अॅटोमिक मासेस ह्यांतही फरक असेल. पण तरी त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या समान असतील.
प्रत्येक सजीव गोष्ट जसे की, वनस्पती, प्राणी, मनुष्य जिवंत असताना हवेतील कार्बन डायऑक्साईड घेत असतो. या कार्बन डायऑक्साईडच्या घटकांमध्ये कार्बन-१४ नावाचा घटक असतो.

 

earthsky.org

रेडियोकार्बन डेटिंग हे ह्याच कार्बन आइसोटोप कार्बन -१४ आणि कार्बन -१२ ह्यांवर अवलंबून असते.

हा कार्बन १४ किरणोत्सर्गी म्हणजेच radioactive आहे. प्राणी जिवंत असताना या कार्बन-१४ ची किरणोत्सर्जनाची क्रिया सतत चालू असते.
सर्व प्राण्यांमध्ये कार्बन-१४ चे प्रमाण एकसारखेच असते. तर म्रृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून कार्बन-१४ एकाच प्रमाणात बाहेर पडतो. जिवंतपणी असलेल्या कार्बन-१४ चा अर्धा भाग म्रृत्यू झाल्याच्या ५५६८ वर्षांनंतर नाहिसा होतो. या कालावधीला कार्बन-१४ चे अर्धे आयुष्य म्हणतात.

 

sheffield.ac.uk

अशाचप्रकारे नंतरच्या ११,१३६ वर्षांनी त्याच्याही निम्मा कार्बन-१४ शिल्लक राहतो आणि ७०,००० वर्षांनी या कार्बन-१४ ची किरणोत्सर्जनाची क्रिया पूर्णपणे थांबते.

जेव्हा पुरातत्वीय विभागाच्या लोकांना कुठलीही अशी पुरातत्वीय वस्तू किंवा मानवी अवशेष सापडतात. तेव्हा ते कुठल्या सालचे असेल? किती वर्ष जुने असेल? हे माहित करून घेण्यासाठी ह्या किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा वापर केला जातो. ज्याच्या माध्यमातून ते अवशेष किती जुने आहेत हे माहित होते आणि त्यावरून त्या काळचा इतिहास, संस्कृती, जीवनपद्धती इत्यादी सर्वांची माहिती गोळा करण्यास सोप्पे होते.

 

archaeologymuseum.ca

आता ह्या पद्धतीचा वापर कश्या प्रकारे केला जात असेल, ते जाणून घेऊ. जेव्हा एखादे पुरातन अवशेष सापडतात, तेव्हा त्यांच्यातील उर्वरित कार्बन-१४ कुठल्या प्रमाणात आहे ह्याची तपासणी केली जाते. ह्यासाठी आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी त्या अवशेषाच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली जाते. ज्यानंतर तो अवशेष ज्याचा कोणाचा असेल त्याची मृत्यू कधी झाली असेल हे ठरविता येते.

उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर, अलीकडच्या काळातील उत्खननातून निघालेल्या वस्तूंचे काळ या पद्धतीने ठरविण्यात आले आहेत. सौराष्ट्रातील लोथल या सिंधू संस्कृतीच्या प्रसिद्ध शहराचा काळ ४०३० म्हणजे इ.स.पूर्व २१८० हा याच पद्धतीने ठरविण्यात आला होता.

जगात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीबद्दल अज्ञात माहितीच्या शोधात उत्खनन केले जाते. या उत्खननात सापडलेले अवशेष किती जुने आहेत हे ठरवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version