' अजिंठा लेण्यांचा हा वैभव शाली, रहस्यपूर्ण इतिहास वाचून थक्क व्हाल… – InMarathi

अजिंठा लेण्यांचा हा वैभव शाली, रहस्यपूर्ण इतिहास वाचून थक्क व्हाल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रातल्या लेण्या हे आपले वैशिष्ठ्य.

अजिंठा आणि वेरूळ लेण्यांबद्दल आपल्या सर्वांना माहिती असेलच.

महाराष्ट्रातील या लेण्या केवळ भारतात नव्हे तर संपुर्ण जगामध्ये त्यांच्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत.

अजिंठा आणि वेरूळ लेण्या पाहण्यासाठी खूप दूरवरून पर्यटक येथे येतात आणि येथील स्थापत्यकलेचा मनसोक्त आनंद घेतात.

एलोरा गुहांना स्थानिक लोक वेरूळ लेणी म्हणून देखील ओळखतात.

औरंगाबाद – चाळीसगावच्या रस्त्यावर या लेण्या आहेत. औरंगाबाद शहरापासून ३० किमी अंतरावर असलेली ही वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहे.

 

History of Ellora and Ajanta caves.Inmarathi
webmarathi.in

 

तसेच, अजिंठा लेणी ही औरंगाबाद जिल्यापासून सुमारे १०० ते ११० किमी अंतरावर वाघूर नदीच्या परिसराच्या शेजारी आहेत. अजिंठा लेणी समूहामध्ये एकूण २९ लेणी आहेत.

ह्या लेण्या नदी पात्रापासून १५ ते ३० मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगांमध्ये कोरलेल्या आहेत.

बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी आज आंतरराष्ट्रीय पर्यटनाची एक ठळक ओळख बनलेली आहे.

आज आपण याच अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत.

सहाव्या शतकापासून चालुक्य आणि राष्ट्रकूट राज्यांनी बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत दख्खनवर राज्य केले.

पूर्वी सर्व धर्म सहिष्णू होते आणि त्यांच्या उदारमतवादी आश्रयाखाली दगडाच्या कोरीव कामाचे तंत्र वापरून मंदिरे बांधण्याची पद्धत उच्च पातळीवर सुरु झाली.

दख्खनमध्ये राष्ट्रकूट आणि इतर शक्तीं हळूहळू उदयास येऊ लागले, त्यांनी येथील बौद्ध धर्माचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला, पण येथील कलाकारांनी याला न जुमानता आपली कला चालूच ठेवली.

 

History of Ellora and Ajanta caves.Inmarathi1
ancient.eu

 

पश्चिम घाटामध्ये उत्खनन करण्यासाठी आणि कोरीव कामांसाठी चांगल्या जागा असल्यामुळे दगडात कोरीव काम करणारे कारागीर पश्चिम भारतामध्ये पोहोचले.

अशी कोणतेही गुहा नाही जी त्यांनी त्यांच्या कामासाठी वापरली नाही.

असे आर्किटेक्चर मोठया प्रमाणात शिल्प कलेला प्रोत्साहन देणारे होते. हे दगड मजबूत असल्याने त्यांच्यावर केलेले कोरीव काम खूप वेळ टिकण्यासारखे आहे.

तसेच, त्यांना लवकर दुरुस्त करण्याची देखील गरज भासत नाही. याप्रकारची अनेक मंदिरे आज चांगल्या स्थितीमध्ये आहेत.

अजिंठा लेणी गुहा या शूटिंग पार्टीद्वारे अचानकपणे १८२९ मध्ये शोधल्या गेल्या होत्या.

एका खोल खाद्यामध्ये चंद्र कोरीसारख्या या लेणी होत्या. सुमारे इसवीसन पूर्व ३ ऱ्या शतकापासून ते इसवीसन ७ व्या शतकापर्यंतच्या बौद्ध धर्माविषयाची माहिती देणारी ती शिल्प आहेत.

 

History of Ellora and Ajanta caves.Inmarathi2
Youtube.com

 

२९  उत्खननांपैकी चार चैत्य हॉल आहेत आणि हे चैत्य हॉल सर्व डिझाईनमध्ये वेगवेगळे आहेत आणि बाकीचे उरलेले सर्व विहार आहेत. उत्खननामध्ये असे दिसून आले की, प्रत्येक शिल्पचा कालखंड हा वेगवेगळा आहे.

हिनायान आणि महायान हे चरण देखील सुस्पष्ट आहेत. तसेच, यामध्ये बुद्धांच्या प्रतिमेची वेगवेगळी  वैशिष्ट्ये दाखवण्यात आलेली आहेत. या लेणी ह्या कला – आर्किटेक्चर, शिल्पकला आणि चित्रकला या तिघांना एकत्रित करतात.

वेरूळच्या लेण्यांमध्ये अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर शैव संपद्रायाचा प्रभाव आहे.

या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय. आधी कळस, मग पाया’ ही रचना या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे.

 

History of Ellora and Ajanta caves.Inmarathi3
incredibilia.it

 

अजिंठाच्या ९, १०, १२, १३ व १५ ह्या लेण्या हीनयान कालखंडामध्ये कोरली गेली आहेत. त्या काळामध्ये दगडात कोरीव काम करणाऱ्या कारागिरांनी खूप सुबक अश्या शिल्पकला तयार केल्या होत्या.

महाराष्ट्रामधील या लेण्या अजूनही तश्याच्या तशा आहेत. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी ही कला  येतात. यातील काही शिल्प तर आपल्याला आश्चर्यात टाकणारे आहेत.

अजिंठा आणि वेरूळच्या या लेण्या त्या काळातही एवढया सुबक बनवल्या गेलेल्या आहेत, ज्यांची  कोणत्याही शिल्पकलेशी तुलना करणे शक्य नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?