Site icon InMarathi

अगदी हिवाळ्यातही थंड पाण्याने “अंघोळ” केल्याने खरंच फायदा होतो का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सर्वच जण रोज अंघोळ करतो, कारण प्रत्येकालाच स्वच्छ राहायला आवडते. काहीजण अंघोळ करायला खूप वेळ लावतात, तर काहीजण खूप कमी वेळामध्ये झटपट अंघोळ करतात. काहींना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडते, तर काहींना गरम पाण्याने अंघोळ केल्याशिवाय अंघोळ केल्यासारखे वाटत नाही.

पण बहुतेक जण गरम पाण्याने अंघोळ करणे पसंत करतात. थंड पाण्याने खूप कमी लोक अंघोळ करतात. पण थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्याने आपल्याला काही चांगले फायदे देखील मिळतात. आज आपण त्याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

 

 

थंड पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या कितीतरी सवयींमध्ये सुधार होऊ शकतो. यामध्ये काही मुख्य फायदे देखील आहेत जसे – रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होणे, तणाव कमी होणे, उत्साह आणि जागरूकतेमध्ये वाढ होणे इत्यादी.

थंड पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयींमुळे तणाव आणि चिंता कमी होतात त्याचबरोबर व्यायाम केल्यानंतर मांसपेशींचे दुरुस्तीकरण असो किंवा इम्यून सिस्टम म्हणजेच रोग रोगप्रतिकारक प्रणालीला चांगले बनवायचे असो यामध्ये सगळीकडेच फायदा मिळतो.

आपली त्वचा थंड पाण्याच्या संपर्कात येताच आपल्या शरीरामध्ये वेगळ्याच झिनझिन्या येतात आणि आपले शरीर तणावामध्ये यावर खूप पटकन प्रतिक्रिया देते जे हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरणाला वाढवते.

थंड पाण्याने अंघोळ केळ्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही.

 

तणाव आणि चिंता 

तणाव आणि चिंता थंड पाण्याने अंघोळ केल्यास कमी होतात, हे सिद्ध करणारे अजूनही कोणतेही क्लिनिकल ट्रायल झालेले नाही. पण विशेषज्ञांचे असे म्हणणे आहे की, थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील नुकसानदायक रसायन आणि हार्मोन्स शरीरातून बाहेर पडतात ज्यामुळे माणसाला तणावमुक्त वाटते.

२०१३ मधील टेड टॉकमध्ये ट्राय एथलीट जोएल रनयोनने आपल्या अनुभवांच्या आधारावर सांगितले होते की, कोल्ड शॉवर घेतल्याने तुम्हाला त्या परिस्थितींशी लढण्यासाठी प्रेरणा मिळते आणि तुम्ही घाबरत असलेल्या परिस्थितींशी लढण्यासाठी वेगळे मार्ग शोधण्यास मदत होते.

याचा अजून एक तर्क असा लावण्यात येतो की, थंड पाण्याने अंघोळ करणाऱ्या लोकांच्या मेंदूवर अचानकपणे झटका लागल्यासारखे होते आणि हा एक एंटीडिप्रेसेंटसारखा प्रभाव आपल्यावर करतो.

 

इम्यून सिस्टम 

२०१६ मध्ये प्लॉस वन (PLOS  One) मध्ये एक डच रिसर्चबद्दल माहिती छापलेली होती, ज्यामध्ये कोल्ड शॉवरचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या प्रभावाबद्दल सांगण्यात आले होते.

या रिसर्चमध्ये हे दिसून आले की, ९० दिवसांच्या दरम्यान रोज धंदा पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे या रिसर्चमध्ये समाविष्ट असलेल्या २९ टक्के लोकांचे आजार कमी झालेलं दिसून आले होते.

रिसर्चच्या दरम्यान या लोकांना गरम पाण्याच्या सामान्य शॉवरनंतर शेवटी ३०, ६० किंवा ९० सेकंदाच्या वेळेसाठी थंड पाण्याने अंघोळ करण्यात सांगण्यात आले.या शोधकर्त्यांनी यातून असे पाहिले की, कोल्ड शॉवर घेतल्याने कोणत्याही प्रकारचा फ्लू होत नाही आणि तसेच याचा कोणत्याही प्रकारचा चुकीचा परिणाम होत नाही. तसेच, तुम्ही किती वेळ थंड पाण्याने अंघोळ करता याच देखील काही परिणाम होत नाही.

 

 

या रिसर्चमध्ये भाग घेणाऱ्या लोकांना सर्वात जास्त फायदा हा झाला की, यामुळे त्याच्या ऊर्जेमध्ये वाढ झाली, जी कॅफेनच्या प्रभावाच्या तुलनेमध्ये कितीतरी अधिक होती. तर दुसरीकडे याच्या प्रभावामुळे शरीर आणि हातापायांमध्ये त्यांना थंडी जाणवत होती. यानंतर देखील कितीतरी एथलीट्स व्यायामानंतर थंड पाण्याने अंघोळ करण्याचे समर्थन करत होते.

थंड पाण्याने अंघोळ केल्याने व्यायामानंतर होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळत असे. पण हे खरचं काम करते की नाही याबद्दल शास्त्रज्ञांकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा अजूनपर्यंत उपलब्ध नाही. काही रिसर्च म्हणतात की, यामुळे आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होते. पण काही लोक म्हणतात की, हे मांसपेशींना अनुकूल बनवण्याच्या क्षमतेला कमी करते.

यावरून हे समजते की, रिसर्चनुसार थंड पाण्याने अंघोळ केल्यास आपण तणावमुक्त राहण्यास मदत होते आणि आपण निरोगी देखील राहू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version