Site icon InMarathi

हॉटेलमध्ये राहताना नकळत होणारी फसवणूक टाळण्यासाठी या ७ गोष्टी फायद्याच्या

hotel booking inmarathi

silverline networks

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रवासाला गेल्यावर राहण्यासाठी हॉटेल हे सर्वात महत्त्वाचे ठिकाण असते. निवासासाठी हॉटेलच एक असे ठिकाण असते, जिथे आपण कोणतीही काळजी न करता राहू शकतो.

आपल्या फिरण्याच्या प्लॅनमधील हॉटेल एक महत्वाचा भाग असतो. कधी – कधी आपण फिरायला जाण्याच्या अगोदरच हॉटेल बुक करून ठेवतो.

तर कधी आपण तिथे पोहोचल्यावर हॉटेल शोधतो आणि जिथे आपल्याला आपल्या बजेटमधील रूम मिळेल त्या हॉटेलमध्ये राहतो.

आधीच होटल्स बुक केल्यास आपल्याला जास्त किंमत भरावी लागते. हॉटेल्सच्या रूमच्या सुविधांवर त्या हॉटेल्सच्या रूमच्या किंमती ठरवल्या जातात.

पण हॉटेल व्यवस्थापक बुकिंगच्या वेळी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगत नाहीत. आज आपण अशाच काही गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्याविषयी होटल्सचे कर्मचारी कधीही तुम्हाला सांगत नाहीत.

 

१. कोणतीही व्यक्ती अर्ध्या किंमतीमध्ये रूम बुक करू शकते.

 

lonelyplanet.com

 

हॉटेल बऱ्याचदा रिकाम्या राहिलेल्या खोल्या स्वस्त दरात देऊन टाकतात.

तसेच, ते कधीही रूमचे भाडे सार्वजनिकरित्या सांगत नाहीत, कारण कितीतरी वेळा त्यांना असे ग्राहक मिळतात जे रूमसाठी पूर्ण पैसे देण्यासाठी देखील तयार असतात.

जर तुम्ही बारकाईने लक्ष दिले तर लक्षात येईल की, कितीतरी वेबसाईट्सवर आपल्याला हॉटेल्सच्या रूमच्या जाहिरातींवर हॉटेलचे नाव लिहिलेले नसते.

तुम्ही जेव्हा रूमच्या बुकिंगसाठी पेमेंट करता, त्यानंतर लगेचच हॉटेलचे नाव समोर येते. तसेच ग्राहकाला हॉटेल किती स्टार्सचे आहे, हे दाखवले जाते.

अशावेळी आपण फक्त जिथे आपल्याला थांबायचे आहे, त्याच जागेला निवडू शकता. या व्यतिरिक्त बुक केलेल्या रूमचे बुकिंग रद्द देखील करता येत नाही.

 

२. हॉटेलमधील मोफत सेवा

 

stuffedition.com

हॉटेलमध्ये चेक इन करताना मोफत सेवांची माहिती घेण्यास विसरू नये, कारण कोणत्याही हॉटेलमध्ये सीलबंद पाणी, प्रेस, हेअर स्टायलिंग, फोन चार्जर आणि बोर्ड गेम यांसारख्या सेवा मोफत दिल्या जातात.

एवढंच नाहीतर काही हॉटेल्स मध्ये तर टॅक्सी सेवा देखील फ्रीमध्ये दिली जाते. काही हॉटेल्समध्ये सकाळचा नाश्ता देखील देण्यात येतो.

 

३. बुकींगच्या वेळी बार्गेनिंग करू शकता

 

wagrainerhof.com

 

हॉटेलसाठी तुम्ही देत असलेले जवळपास ३० टक्के भाडे हे कमिशनमध्ये जाते. त्यामुळे कोणतीही व्यक्ती जेव्हा थेट हॉटेलला कॉल करते किंवा तिथे जाऊन त्यांच्याशी बोलून रूम बुक करत असेल,

तर त्या व्यक्तीला हॉटेलच्या रूमच्या भाड्यामध्ये योग्य ती सूट मिळु शकते. खासकरून तेव्हा जेव्हा त्या भागामध्ये हॉटेलची संख्या कमी असेल.

 

४. तक्रारीची गरज असल्यास अवश्य तक्रार करा.

 

marinabaysands.com

 

जर तुम्हाला तुमच्या रूममध्ये कोणत्याही प्रकारची अडचण होत असेल, तर त्या अडचणीला दुर्लक्षित करू नका, त्याऐवजी लगेचच त्याची तक्रार करा,

कारण हॉटेल सर्व्हिसवाले कधीही आपल्या ग्राहकाला नाराज करू इच्छित नसतात. त्यामुळे ते पहिल्यांदा तुमचा कम्फर्ट पाहतील आणि त्याचबरोबर चांगल्यात चांगली सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतील.

 

५. तुमच्या परवानगीशिवाय ते तुम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये पाठवू शकतात.

 

acuantcorp.com

हॉटेलवाले बहुतेकदा ग्राहकांना जास्तीत जास्त बुकिंग करण्यासाठी आवाहन करतात. त्यामुळे कधी – कधी ते त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त बुकिंग करतात.

जेणेकरून जर एखाद्या व्यक्तीने बुकिंग कॅन्सल केली, तरीदेखील रूम भरलेल्या असतील. या दरम्यान जर ते तुम्हाला एखाद्या दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट होण्यास सांगत असतील,

तर तुम्ही त्यांच्याकडे त्यापेक्षा महागड्या रूमची किंवा मोफत फिरण्याची डिमांड करू शकता.

 

६. रूम प्रत्येकवेळी साफ नसतात.

 

kenh14.vn

 

असे कितीतरी वेळा होऊ शकते की, तुम्ही राहणार असणाऱ्या रूममध्ये तुमच्याआधी कोणताही गेस्ट थांबलेला नाही!

त्यामुळे  चेक इन करतेवेळी त्या रूमची चांगल्याप्रकारे पडताळणी करून खात्री करून घ्या की, तो रूम खरचं स्वच्छ आहे.

 

७.  रूममधील मिनी सेफवर विश्वास ठेवू नका.

 

gudstory.com

 

कधी तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये थांबलेला असाल, तर त्या हॉटेलच्या रूममध्ये असलेल्या मिनी सेफवर कधीही विश्वास ठेवू नका आणि तुमच्या मौल्यवान वस्तू तर त्यात ठेवण्याचा विचार देखील करू नका.

जर तुम्हाला हॉटेलमध्ये काही ठेवायचंच असेल, तर रिसेप्शनची मदत घ्या. ते तुमची वस्तू हॉटेलच्या सुरक्षित ठिकाणी ठेवतील आणि त्याची पावती तुम्हाला देतील.

अशा ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी हॉटेलवाले तुम्हाला कधीही सांगत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात.

यापुढे काळजी घ्या – या ७ गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमची होणारी फसवणूक व संभाव्य नुकसान टाळा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version