' तुमच्या खिशाला कात्री लावणारा कर्जाचा व्याजदर बँक ज्या पद्धतीने ठरवतात त्याबाबत पुर्ण माहिती असायलाच हवी – InMarathi

तुमच्या खिशाला कात्री लावणारा कर्जाचा व्याजदर बँक ज्या पद्धतीने ठरवतात त्याबाबत पुर्ण माहिती असायलाच हवी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजकाल माणसे बहुतेक गोष्टी ह्या लोनवर घेतात, कारण एखादी मोठी वस्तू खरेदी करताना त्यासाठी लागणारी योग्य ती रक्कम लोकांकडे उपलब्ध नसते.

त्यामुळे लोक लोनच्या सुविधेचा लाभ घेतात, जेणेकरून थोडीशी रक्कम देऊन उरलेली रक्कम ही हळूहळू ईएमआयच्या स्वरूपात देता येते.

लोनच्या सुविधेचा ग्राहकांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खूप चांगल्याप्रकारे फायदा उचलता येतो आणि आपल्याला गरज असलेली वस्तू देखील घेता येते.

पण आपल्याला या लोनच्या रकमेवर काही टक्के इंटरेस्ट म्हणजेच व्याज भरावे लागते. हा व्याजदर कधीही सारखाच नसतो, काही बँकांचा कमी तर काहींचा जास्त असतो.

मग बँक लोनवरील व्याजदर कसा ठरवतात? हे आपण आज जाणून घेऊया..

 

Bank customer rights1.marathipizza
im.rediff.com

 

लोन मिळवणे देखील वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. काहींना लगेच लोन मिळते, तर काहींना लवकर लोन मिळत नाही. त्यांचे अप्लिकेशन खूप वेळा रिजेक्ट केले जाते. तसेच काहीसे व्याजाच्या दराविषयी देखील आहे.

काहींना कमी व्याजदरावर लोण मिळते, तर काहींच्या लोनचे व्याज एवढे असते की, हे लोन घेणे त्याच्यासाठी खूप तोट्याचे ठरते.

बँक व्याजदर कशी ठरवते ?

बँक आपला व्याजदर बीपीएस (BPS ) च्या हिशोबाने कमी करते. हे तेव्हा होते, जेव्हा आरबीआय म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात येते.

बीपीएस इंटरेस्ट रेट आणि बाकी फायनान्स पर्संटेजची गणना करणारे एक युनिट असते. ज्याला खासकरून इंटरेस्ट रेट बदलण्याच्या वेळी वापरण्यात येते.

१०० बीपीएसचा अर्थ एक टक्का आणि जर जनरल इंटरेस्ट रेट १५ बीपीएसपेक्षा कमी झाला आहे, तर याचा अर्थ हा आहे की, ०.१५ टक्के कमी झाला.

 

Bank customer rights.marathipizza
pbs.twimg.com

 

मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट फॉर्म्यूला (एमसीएलआर) च्या आधारावर व्याज दर ठरवण्यात येतो. हा बँकांचा कमीत कमी व्याज दर असतो, या व्याजदरापेक्षा कमी व्याजदराने कोणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्ज दिले जाऊ शकत नाही.

याला इंटरनल बेंचमार्क किंवा बँकेचे रेफ्रेंस रेट असे म्हटले जाते.

कसे ग्राहकांना वेगवेगळ्या व्याजदरावर लोन मिळते ?

भलेही बँक एक विशिष्ट व्याजदर ठरवते. पण असे काहीही नसते की, त्या बँकेतून कर्ज घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा व्याजदरावर कर्ज दिले जाईल.

बँक तुमचा सिबिल स्कोर पाहू शकते आणि त्या हिशोबाने जो व्याजदर तुमच्या सिबिल स्कोरला मॅच करतो, तो बँकेद्वारे ठरवला जाऊ शकतो.

जर कोणाचा सिबिल स्कोर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर त्याला बँकेने ठरवलेलय व्याज दरावर कर्ज मिळू शकते.

जर ८५० पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल, तर व्याजदरावर बार्गेनिंग करणे सोपे होईल आणि व्याजदरावर काही बीपीएस (BPS) ची सूट मिळू शकते.

जर तुमचा क्रेडिट स्कोर ७५० पेक्षा कमी आहे, तर तुम्हाला कर्ज देणे की न देणे हे बँकेच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही येथे तुमच्याकडे कोणतीही बार्गेनिंग पॉवर उरलेलीच नाही आहे.

क्रेडिट स्कोर जर कमी असेल, तर बँक ठरवते की, तुम्हाला कोणत्या व्याजदरावर कर्ज दिले गेले पाहिजे. असे मानले जाते की, कर्ज त्याच व्याजदरावर दिले गेले पाहिजे. जो बँकेने ठरवला आहे.

पण प्रत्येकवेळी असे घडत नाही. जर तुमचा सिबिल स्कोर खूपच खराब असेल, तर बँक तुमचे लोन रीजेक्ट देखील करू शकते.

 

How banks decide interest rate.Inmarathi
financebuddha.com

 

क्रेडिट रेटिंग बरोबर असल्याचे फायदे :

चांगले इन्व्हेस्टमेंट डिसीजन :

क्रेडिट स्कोरच्या आधारावर कर्ज घेणे खूप सोपे होते. बँक असो किंवा एखादी कंपनी असो कधीही रिस्की कस्टमरला कर्ज देऊ इच्छित नसते. त्यांना व्याजाच्या आधारावर पैसे कमवायचे असतात आणि त्यामुळे ते योग्य या ग्राहकावर पैसे लावू इच्छित असतात.

सुरक्षा :

पैसे देणाऱ्या बँकेला किंवा कंपनीला हा विश्वास असतो की, त्यांचे पैसे कुठेही जाणार नाहीत आणि कर्ज घेणारा मनुष्य वेळेवर आपले पैसे परत करू शकले.

 

How banks decide interest rate.Inmarathi1
indiacsr.in

 

कर्ज घेणारांसाठी फायदे

सहज कर्ज उपलब्ध होणे :

क्रेडिट रेटिंग जर चांगली असेल, तर तुम्हाला सहजतेने कर्ज उपलब्ध करून मिळेल आणि ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा रिस्क घ्यावी लागणार नाही. बँक तुमचे लोन अप्लिकेशन सहज मंजूर करेल.

कमी व्याजदर :

जर तुमचा  सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला व्याजदरावर बार्गेनिंग करण्याची देखील सुविधा मिळते.

क्रेडिट स्कोर चांगला कसा होतो ?

 

How banks decide interest rate.Inmarathi2
badcreditlifeline.com

 

बहुतेक लोकांचे असे मानणे असते की, क्रेडिट स्कोर तेव्हा सर्वात चांगला असेल जेव्हा तुम्हीं कोणतेही कर्ज घेतलेले नसेल, क्रेडिट कार्डचा वापर केला नसेल आणि कोणत्याही प्रकारचा ईएमआय चालू नसेल. पण सर्व एकदम चुकीचे आहे.

क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये पैश्यांचा व्यवहार करणे गरजेचे आहे. पण हा व्यवहार कॅशमध्ये नसावा,

कारण जोपर्यंत बँकांना हे माहीत नसेल की, तुम्ही कशाप्रकारे कर्जाची भरपाई करू शकाल, तोपर्यंत तुमचा क्रेडिट स्कोर चांगला होणार नाही.

अशाप्रकारे बँक एक विशिष्ट पद्धतीने प्रत्येक कर्जदाराचा व्याजदर ठरवते आणि त्यानुसार त्याला कर्ज देते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?