Site icon InMarathi

घोड्यांची सर्वात सुंदर आणि जुनी प्रजाती ‘अखल टेके’ : विलुप्त होत आहे…

teke inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

असे अनेक प्राणी आहेत जे अतिशय सुंदर असतात. ते एवढे सुंदर असतात की असं वाटतं निव्वळ त्यांना न्याहाळत राहावे.

ह्याच सुंदर प्राण्यांपैकी एक म्हणजे घोडा… घोडे खूप आकर्षक असतात. त्यांचे डोळे खूप सुंदर असतात. त्यांचे केस अतिशय मुलायम आणि चमकदार असतात. त्यांची चाल अगदी राजेशाही असते.

तुम्ही आजवर घोड्यांच्या अनेक जाती बघितल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला घोड्यांच्या सर्वात सुंदर जातीची ओळख करवून देणार आहोत.

 

fthmb.tqn.com

 

हा आहे घोड्यांच्या दुनियेतील सुपरस्टार, ज्याचे नाव आहे ‘अखल टेके’. ही प्रजाती मुख्य करून तुर्कमेनिस्तान येथे आढळते. हे घोडे येथील राष्ट्रीय प्रतिक देखील आहेत.

 

featuredcreature.com

 

‘अखल टेके’ घोड्यांच्या सर्वात जुन्या जातींपैकी एक असल्याचं मानले जाते. ‘अखल टेके’ ही जाती जवळपास ३ हजार वर्ष जुनी असल्याचे सांगितले  जाते. एकेकाळी ह्यांना तुर्कमेनिस्तान येथील लोक पाळायचे.

आकड्यांनुसार आज जगभरात ही जाती लोप पावत आहे. जगात ह्या जातीचे केवळ ६,६०० घोडे उरले आहेत. ह्या जातीचे घोडे तुर्कमेनिस्तान सोबतच रशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत देखील आढळतात.

 

petguide.com

 

ह्या घोड्यांचा तपकिरी रंग हा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांना ‘गोल्डन हॉर्स’ देखील म्हटले जाते. तपकिरी रंगाशिवाय ह्यांच्यात रेडीश-ब्राऊन, काळ, करडा आणि चेस्टनट हे रंग देखील बघायला मिळतात.

 

baomoi.com

 

‘अखल टेके’ जातीच्या घोड्यांचे केस अतिशय फाईन असतात. त्यांची कातडी अशी असते की त्यावर प्रकाश पडल्यावर तो रिफ्लेक्ट होतो आणि ती चमकायला लागते. त्यामुळे यांचे शरीर नेहमी चमकत असते. त्यातही तपकिरी रंगाचे घोडे अधिक चमकतात.

हे घोडे खेळातही उत्कृष्ट कामगिरी बजावतात. ‘एब्सेंट’ नावाच्या एका ‘अखल-टेके’ जातीच्या घोड्याने १९६० साली झालेल्या समर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.

 

featuredcreature.com

 

आपण नेहमी म्हणत असतो की, कुत्रा हा सर्वात जास्त प्रामाणिक प्राणी आहे. पण ‘अखल-टेके’ घोडे देखील अतिशय प्रामाणिक असतात. त्यासोबतच ते समजूतदार आणि संवेदनशील देखील असतात.

 

creativemarket.com

 

‘अखल-टेके’ हे घोडे तुर्कमेनिस्तान च्या राष्ट्रीय चिन्हासोबतच येथील बँक नोट्सवर देखील दिसतात. तसेच ते इतर काही देशांच्या स्टॅम्प्सवर देखील आढळतात. चीनमध्ये तर ह्या घोड्यांना स्वर्गाचा घोडा म्हटले जाते.

असे हे ‘अखल-टेके’ घोडे आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version