Site icon InMarathi

“त्रिपुरा टेरर” अर्थात, माणिक सरकार कालखंडातील हिंदूंचा छ्ळ

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

१९८० मधे केंद्रात इंदिरा गांधी यांची आणि त्रिपुरा मधे डाव्यांची सत्ता असताना त्रिपुरा मधे मांडवी येथे एक भयंकर हत्याकांड झाले होते. त्रिपुरा उपजाती युवा समितीच्या समर्थकांनी २५०-४५० बंगाली हिंदूंचे हत्याकांड केले होते. बळींच्या डोक्याचा चेंदामेंदा केलेला होता. अनेकांचे हात पाय तोडलेले होते. गर्भवती महिलांची पोटे फाडलेली होती आणि लहान मुलांना सुळावर चढवण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशी तिथे सैन्याची तुकडी पोचली. त्याचे कमांडर राजमणी यांनी मांडवी मधेले ते हिंदूंचे हत्याकांड निर्घृण नी भयंकर असल्याचे सांगितले होते. अभ्यासुंनी खालची लिंक पहावी. अनेक दशकांपासून त्रिपुरा मधे हिंदूंचे जगणे कठिण होते, त्यांच्यावर अत्याचार होत होते याचा हा पुरावा : https://en.wikipedia.org/wiki/Mandai_massacre.

१९८८ मधे मांडवी मधे हिंदूंची हत्या करणाऱ्या त्रिपुरा उपजाती युवा समिती सह कॉंग्रेसची युती होती आणि त्यांचेच सरकार त्रिपुरा मधे होते.

१२ ऑक्टोबर १९८८ मधे डाव्यांनी बिरचंद्र मानू खेड्यात आपले कार्यालय नव्याने उघडायचे ठरविले. त्याच्या उद्घाटनासाठी जमलेल्या डाव्यांच्या सभेवर कॉंग्रेसने हल्ला केला आणि ११ डाव्यांची हत्या केली. १९८८-१९९३ दरम्यान कॉंग्रेस कडे सत्ता असतना ज्या हत्या झाल्या त्यांसाठी कॉंग्रेसच्याच सुबल भौमिक यांनी २०११ मधे क्षमा मागितली होती.

एप्रिल १९९३ पासून त्रिपुरा मधे डाव्यांचे सरकार आहे. आणि मार्च १९९८ पासून विस वर्षे माणिक सरकार मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात काय काय घडले ते पाहू.

मे २००० मधे नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुराच्या अतिरेक्यांनी बागबेर येथे २५ हिंदूंची हत्या केली. ही नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा म्हणजे बॅप्टिस्ट चर्च ऑफ त्रिपुरा च्या पाठिंब्याने उभी रहिलेली अतिरेकी संघटना. या संघटनेच्या जाहिरनाम्यात प्रभू येशूची सत्ता त्रिपुरा मधे स्थापन करण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.

 

causticnews.com

आणि प्रभू येशूची सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना निरपराध हिंदूंचे बळी देणे भाग होते. बॅप्टिस्ट चर्च ऑफ त्रिपुरा च्या अथक प्रयत्नांना अपयश आले आणि त्यांना केवळ काही हजार हिंदूंचेच धर्मांतर करण्यात यश आले. लालूच दाखवून काम चालत नाही हे पाहून त्यांनी धर्मविस्तारासाठी दहशत पसरवायचा मार्ग अनुसरला. त्याच साठी चर्चने आपला पाठिंबा NLFT ला दिला किंबहुना चर्चच्या पुढाकारानेच ही अतिरेकी संघटना उभी राहिली.

एप्रिल २००० मधे बॅप्टिस्ट चर्चच्या सचिवाला स्फोटकांसह अटक झाली आणि त्याच वेळेस माणिक सरकार यांनी त्रिपुरातल्या हिंसाचाराला चर्च जबाबदार असल्याचा जाहिर आरोप केला. NLFT ची दहशत थांबलीच नाही. त्यांनी हिंदू सणांवर बंदी जाहिर केली. चर्च कडून पैसे मिळत होतेच पण जास्तिचा निधी गोळा करण्यासाठी अत्यंत NFLT ने घृणास्पद मार्ग अवलंबला.

त्यांनी अदिवासी मुलींचा लैंगिक छळ केला. त्यांच्या कडून जबरदस्तीने पॉर्न फिल्म्स मधे काम करून घेतले. या फिल्म्सच्या वितरणातुन आलेला पैसा त्यांनी अदिवासींच्या दमनासाठी वापरला. आणि तरिही चर्च गप्प राहिले.

त्रिपुरा मधे कायद्याचे राज्य आणणे डाव्यांना जमले नाही. आणि त्यांना केंद्राचा हस्तक्षेप नको होता. आपल्या हस्तकांकडून विरोधकांना धडा शिकविण्यासाठी डाव्यांनी SPO विशेष पोलिस दलाची स्थापना केली. या दलाच्या अत्याचारांनी विरोधक कॉंग्रेसींची झोप उडाली.

 

thenortheasttoday.com

कॉंग्रेस किंवा डावे या पैकी कुणाच्याच सरकारात त्रिपुरा मधल्या हिंदूंना सुरक्षितता मिळाली नाही. त्यांनी कायम हिंदूंवर अत्याचार केले. दुर्दैवाने देशातल्या मिडियाने त्रिपुरातल्या हिंदूंचा आक्रोश कधी ऐकलाच नाही. एक अखलाख मारल्या गेला, ए्का वेमुल्लाने आत्महत्या केली तरिही देशतल्या ’पू’रोगाम्यांना असहिष्णुता जाणवली. अनेकांनी देश सोडण्याच्या वल्गना केल्या. देशात केवढी अस्थिरता आहे असा अभास निर्माण केला.

पण त्रिपुरा जळत असताना, त्रिपुरातल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असताना हे सगळॆ बु्धीवादी, ’पू’रोगामी गप्प का होते?

लक्षात घ्या, त्रिपुरात ८६% लोकसंख्या हिंदू आहे. हे कुठले टिनपाट बाप्टिस्ट चर्च नी ही कुठली भेकड NLFT त्यांचे धर्मांतर करू पहात होते. पण त्यांना यश आलेच नाही. आणि येणारही नाही. डाव्यांनीही हिंदूंचा अनन्वित छळ केला. पण दुर्दैवाने डाव्यांचे मिडिया मधे अनेक छुपे समर्थक आहेत त्यामुळॆ डाव्यांच्या अत्याचाराच्या कथा बाहेर आल्याच नाहित.

दिनेश कानजी यांनी त्रिपुरातल्या डाव्यांच्या अत्याचाराला तोंड फोडणारे पुस्तक लिहले आहे. त्यात डाव्यांच्या अत्याचारांच्या रक्तरंजित कथा वाचायला मिळतील.

 

 

२०१८ मधल्या निवडणुकांत त्रिपुरातल्या हिंदू बहुल मतदारांनी जे कॉंग्रेस आणि डाव्यांच्या अत्याचारांना कंटाळले होते भाजपला निवडून दिले यात आश्चर्य काही नाही. कारण अनेक वर्षे हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या डाव्या आणि कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजप पुढे आला होता.

संघाच्या अनेक संस्थांनी त्रिपुराच्या जंगलांत, खेड्यांत, अगदी दुर्गम भागात जिव धोक्यात घालून सेवा कार्य केले होते. देवधरांनी हे सेवा कार्य लोकांपुढे आणले आणि मतदाराला जागृत केले. त्याला निर्भयपणे पर्याय निवडण्याची प्रेरणा दिली. आणि अर्थातच हिंदू मतदारांनी सर्वात विश्वासार्ह पर्याय निवडला.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version