Site icon InMarathi

“श्रीमंत होण्याआधी तत्वज्ञानी होऊ नका” किंग खानच्या जगण्याचा मंत्र ११ वाक्यांमध्ये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शाहरुख खान हे एक असं नाव आहे जे आज जगभरातील चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करत आहे.

तुम्ही किंग खानवर प्रेम करू शकता किंवा त्यांचा द्वेषही करू शकता. पण तुम्ही कधीही त्याला दुर्लक्षित करू शकत नाही. कारण तो कधी ते होऊच देत नाही. कुठल्या परिस्थितीला कसं हाताळायचं हे त्याला माहित आहे. नक्कीच तो हे सर्व त्याच्या अनुभवातून शिकला आहे.

 

 

कुठल्याच प्रकारची चित्रपटाची पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने ह्या चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणे, बॉलीवूडचा किंग होणे हे काही सोप्प नाहीच. ह्याच प्रवासाने त्याचं व्यक्तिमत्व आणखी उजळू लागलं.

आज तो ज्या ठिकाणी आहे तिथे असणे तो डिझर्व करतो. जो जिथे जातो तिथे आपली एक वेगळीच छाप सोडतो.

तो सामान्य मुळीच नाही, कारण त्याने जे शिखर गाठले ते कुठलाही सामान्य माणूस करूच शकत नाही. पण केवळ हेच नाही तर त्यात आणखी अशा गोष्टी आहेत ज्या त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ज्या हे सिध्द करतात की तो केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही असामान्य आहे…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : शाहरुखच्या ‘मन्नत’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या असामान्य गोष्टी

==

आज आम्ही आपल्याला शाहरुख खानची अशी ११ वाक्ये सांगणार आहोत जे त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात…

१. जगात फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे – परिश्रम

 

२. मी माझ्या उपस्थितीने लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवू शकतो, हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे.

 

३. श्रीमंत होण्याआधी तत्वज्ञानी होऊ नका.

 

४. जीवनात कदाचित आधी अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्ही एकटे पडाल. तेव्हा तुमच्यातली सर्जनशीलता तुमची खरी मैत्री असेल.

 

५. सामान्य असं काही नसतं. सामान्य म्हणजेच निर्जीव.

 

६. पैश्यामागे धावणे चांगले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे खूप गरजेचे असते, पण तुम्हाला काय चूक आणि काय बरोबर हेही ध्यानात ठेवायला हवं.

==

हे ही वाचा : बच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते!

==

पैसा कमवायला लाजू नका पण त्यासाठी स्वतःचा आत्मा विकू नका.

 

७. यश हे एक चांगले शिक्षक नाही तर, अपयश आहे ते जे तुम्हाला नम्र बनवते.

 

८. जर तुम्हाला कुठले काम करताना त्यात रस निर्माण होत नाहीये, तुमच्यात तो उत्साह निर्माण होत नाहीये तर ते काम करू नका.

 

९. जीवनात अशीही एक वेळ येईल जेव्हा सर्वकाही चुकीचं होत असेल. त्यावेळी घाबरू नका, तुमचा थोडा गोंधळ उडेल. पण तुम्ही टिकून राहाल. तुम्हाला फक्त पुढे जायचं आहे आणखी थोडं पुढे.

 

१०. प्रत्येक सकाळी मी उठतो आणि एकच विचार करतो की, हा माझ्या आयुष्याचा पहिला शॉट आहे आणि मला तो उत्कृष्ट बनवायचा आहे.

 

११. मला हे कळाले आहे की, आपल्या परिश्रमाच्या क्षमतेपेक्षा अधिक मूल्य कशाचेही नाही.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : रणबीर कपूर खाजगी जीवनात कसा आहे? उत्तर त्याच्या आणखी प्रेमात पाडणारं आहे

==

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version