काय आहे हा आईन्स्टाईन व्हिजा आणि तो मेलेनिया ट्रम्पला का दिला गेला? जाणून घ्या
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा विद्वान आजही जगाच्या पाठीवर नाही. म्हणूनच त्यांच्यासारख्या असाधारण योग्यता असलेल्या व्यक्तींचा आपण नेहमीच आदर करत असतो. पण अमेरिकेत अश्या असाधारण व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचा केवळ सन्मानच केला जात नाही तर त्यांना ईबी-१ व्हिजा देखील दिला होता.
आता तुम्ही म्हणालं की, हा ईबी-१ व्हिजा काय असतो? तर ईबी-१ व्हिजा ह्याला आईनस्टाईन विजा म्हणून देखील ओळखतात. अमेरिकी सरकार हा व्हिजा पुल्तीजर पुरस्कार, ऑस्कर अवॉर्ड आणि ऑलिम्पिक मेडल विजेत्यांना तसेच शोधकर्ता आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना देते.
ह्या व्हिजाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला केवळ तुमची असाधारण योग्यता सिद्ध करावी लागेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांची पत्नी मेलानिया यांना देखील हा व्हिजा देण्यात आला आहे. मेलेनिया ह्या स्लोवेनिया येथील मॉडल आहेत. त्याचं नाव मेलानिया कानास आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीनुसार २००० साली त्यांना अमेरिकी व्हिजा करिता अप्लाय केलं होतं. तेव्हा त्या न्यूयॉर्क येथे मॉडेलिंग करत होत्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांना डेटही करत होत्या. २००१ साली त्यांना व्हिजाची परवानगी मिळाली. त्या साली स्लोवेनिया येथील केवळ पाच लोकांना हा प्रतिष्ठित ईबी-१ व्हिजा दिला गेल होता ज्यापैकी एक मेलानिया होत्या.
२०१६ साली त्या अमेरिकेच्या नागरिक झाल्या आणि ह्याच्या सोबतच त्यांना त्यांचे आई-वडील विक्टर आणि अमालिजा ह्यांना स्पॉन्सर करण्याचा अधिकारही मिळाला. अमेरिकेत राहत असलेल्या त्यांच्या आई-वडिलांनी तिथल्या नागरिकता मिळावी यासाठी प्रक्रिया सुरु आहे.
ट्रम्प सध्या अमेरिकेतील नवीन नागरिकांच्या त्या अधिकाराला रद्द करण्याच्या विचारात आहेत ज्यानुसार कुटुंबातील सदस्यांना अमेरिकेत वास्तव्यासाठी आणण्याची परवानगी दिली गेली आहे. मग मेलेनिया ह्यांना मिळालेल्या ईबी-१ व्हिजावर प्रश्न उपस्थित होणारच. सोबतच “विशेष योग्यता” असलेल्या कॅटेगरीमध्ये त्यांना हा व्हिजा कसा दिला गेला ह्यावर देखील प्रश्न उठवण्यात येत आहेत.
तर इकडे मेलेनिया यांच्या वकिलाच्या मते, त्या १९९६ साली अमेरिकेला आल्या. आधी टूरिस्ट व्हिजावर आणि मग कुशल कामगाराच्या वर्किंग व्हिजावर. न्यूयॉर्कयेथे एक मॉडेल म्हणून काम करत असताना त्यांची भेट १९९८ साली डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्याशी झाली.
अमेरिकेत स्थायी आवासची परवानगी देणाऱ्या ग्रीन कार्ड साठी अप्लाय करण्याआधी त्या युरोप येथे एक रॅम्प मॉडेल म्हणून काम करायच्या. ईबी-१ व्हिजा मिळविण्यासाठी कुठल्याही अप्रवासीला त्यांच्या काही प्रमुख पुरस्कारांचे प्रमाणपत्र द्यावे लागते. किंवा त्याच्या क्षेत्रातील १० पैकी तीन गोष्टींना पूर्ण करायचं असते. ज्या अंतर्गत प्रमुख प्रकाशनांमध्ये आवेदकाची कवरेज, आपल्या क्षेत्रात मूळ आणि महत्वाचं योगदान असणे. आणि आपल्या कलेच्या प्रदर्शनाच्या रुपात आपले काम दाखवावे लागते.
लंडन मधील गुडीयोन आणि मॅक्फेडेन लॉ फर्ममध्ये अमेरिकी व्हिजाच्या विशेषज्ञ वकील सुसिअन मॅक्फेडेन सांगतात की, “सरकारी निर्देशामध्ये ह्या व्हिजासाठी आवेदन देणाऱ्याला नोबेल पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त असायला हवे. पण खरेतर असं नाहीये. तुम्हाला ईबी-१ व्हिजा मिळविण्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते असण्याची काहीही गरज नाही.”
मॅक्फेडेन यांनी हे देखील सांगितले की, ईबी-१ व्हिजा मिळविण्यासाठी आवेदनकर्त्याच्या त्या क्षेत्राला विस्तारित स्वरुपात सांगावे लागते ज्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची ओळख करवून द्यावी लागते. हा व्हिजा वेगवेगळ्या कलागुणांसाठी दिल्या जातो. जसे की, एखाद्या खास फुटबॉल पोझिशनची कोचिंग ते हॉट एयर बलून विशेषज्ञपर्यंत. त्याची खास कामे सांगून अधिकाऱ्यांना हे पटवून द्यावे लागते की ते ह्या व्हिजा करिता इलिजिबल आहेत.
पण ह्या सर्वांत मेलीनिया ट्रम्प ह्या कुठेच येत नाहीत. कारण जेव्हा त्यांना हा व्हिजा देण्यात आला तेव्हा नाही त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात काही मोठी कामगिरी केली होती, नाही त्यांना कुठला पुरस्कार मिळाला होता. एवढचं काय तर कुठल्याही महत्वाच्या प्रकाशनाने त्यांच्याबद्दल छापलं नव्हत… मग तरी त्यांना हा व्हिजा कसा का मिळाला? हा प्रश्न प्रकर्षाने विचारण्यात येत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.