आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिम्मत आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर माणूस यशाचे ते शिखर गाठू शकतो ज्याचा कुणी विचारही केला नसेल. अनेकांना वाटतं की यश हे केवळ नशिबाने मिळते, पण असं नसतं.
यश हे मेहनत करणाऱ्याला मिळते आणि ते मेहनतीनेच मिळवावे लागते.
मेहनत करायची तयारी असेल, तर कुठलंही यश मिळवणं अशक्य नसतं. आज आपल्याला जागोजागी चहाची टपरी दिसते. त्या चहावाल्याची दिवसभराची मेहनत, तो घेत असलेले कष्ट याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे.
डिग्री असूनही अनेकजण बेरोजगार असलेले दिसतात. अशी मंडळी पाहिली, की सध्या शिक्षण घेत असलेले बरेच विद्यार्थी ‘आपण चहाची टपरीच टाकूया.. तो चहावाला आपल्यापेक्षा जास्त कामे करतो’ असं गमतीने म्हणताना दिसतात.
यात तथ्य आहे की नाही, हा निराळा भाग झाला. मात्र, आज अशाच एका चहावाल्याची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत, जो खरोखरंच अनेक पदवीधरांपेक्षा अधिक कामे करतो आहे.
–
हे ही वाचा – वेळेला चहा लागतो हे मान्यच पण ही गोष्ट देखील त्यासोबत करत जा….
–
ही कहाणी आहे मेहनतीच्या जोरावर यश मिळविलेल्या नवनाथ येवले यांची…!!!
बरोबर, ‘येवले अमृततुल्य’ अशी जी पाटी आज शहरोशहरी दिसते, त्यांच येवले यांची ही कहाणी…
महाराष्ट्रातील पुणे येथे राहणारे नवनाथ येवले जे चहाच्या दुकानातून आपली उपजीविका भागवत असत, ते आज महिन्याला १२ लाख कमवत आहेत.
एवढा पगार तर कुठल्या आईटी प्रोफेशनलचा देखील नसतो.
२०११ साली सुरु करण्यात आलेला हा चहाचा स्टॉल आज येवले टी हाउस ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
हा टी स्टॉल पुण्याच्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हिवाळा असो व उन्हाळा, पुण्यातील लोकांची ह्या चहाच्या दुकानावर नेहमीच गर्दी दिसेल. सकाळ ते सायंकाळ होऊन जाते पण लोक चहा प्यायला येतच असतात.
पुण्यात नवनाथ येवले यांची दोन चहाची दुकानं आहेत. प्रत्येक दुकानावर १०-१२ लोकं काम करतात. येवले अमृततुल्य नावानी प्रसिद्ध असलेल्या ह्या टी हाउसचे एकूण ५ मालक आहेत, ज्यापैकी येवले हे देखील एक आहेत.
येवले टी हाउसचे सह-संस्थापक नवनाथ येवले यांनी सांगितलं की,
“आम्ही २०११ साली ह्या कामाला सुरवात केली. ४ वर्ष अभ्यासून आम्ही चहाची एक फायनल क्वालिटी सेट केली. ह्या २ सेंटर मधून आम्ही १०-१२ लाख रुपये कमवतो.”
–
हे ही वाचा – वाघ बकरी चहा: वर्णद्वेषाने वैतागून भारतात आलेल्या गांधीजींच्या शिष्याचं अपत्य!
–
“एका सेंटरवर एका दिवसात ३-४ हजार कप चहा विकला जातो. आम्ही लवकरच १०० च्या जवळपास सेंटर उघडून एक आंतरराष्ट्रीय ब्रान्ड बनण्याच्या तयारीत आहोत.
आम्ही चहा विकून जास्तीत जास्त लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. आणि मी आनंदी आहे आमचं हे काम निरंतर वाढत आहे.”
आज खरोखरंच ‘येवले’ हा ब्रँड मोठा आकार घेत असलेला दिसत आहे. अनेक शहरांमध्ये एकाहून अनेक ठिकाणी ‘येवले अमृततुल्य’ अशी पाटी मिरवत हा चहा त्याचा ठसा उमटवत आहे.
कामाला कधी लाजू नये, कुठलच काम हे लहान नसतं. आणि जर आपण हा विचार करत बसलो की मी हे काम केलं तर लोकं काय म्हणतील तर तुम्ही कधीच जीवनात काही करू शकणार नाही.
आपल्याला ह्यातून बाहेर निघून काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला हवा. तेव्हाच आपण काहीतरी मोठ्ठ करू शकू.
नवनाथ येवले ह्यांची ही कहाणी तर आपल्याला हेच शिकवते. आणि यातून शिकवण घ्यायला काय हरकत आहे. शेवटी एक चहा विकणारा महिन्याला १२ लाख कमावतो आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.