Site icon InMarathi

हॉटेलमधील बेडवर नेहमी पांढरंच बेडसीट असण्यामागचं हे आहे चलाख कारण!

hotel room InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जरा वेळ काढून फिरायला जाणे सर्वांनाच आवडते. पण फिरायला जायचं म्हटल तर सर्वात आधी कुठली गोष्ट डोक्यात येत असेलं तर ती म्हणजे तिथे गेल्यावर कुठल्या हॉटेल मध्ये राहायचं.

ते हॉटेल व्यवस्थित सुविधा देईल की नाही हेही आपल्या डोक्यात असते. हॉटेलमधील सर्व सुविधांची आपण पडताळणी करतो.

 

हॉटेल्सच्या बाबतीत तुमच्या हे नक्की लक्षात आले असेल की हॉटेलमधील चादर ही नेहेमी पांढऱ्या रंगाची असते. पण कधी तुम्ही विचार केला आहे की ही चादर पांढऱ्या रंगाचीच का असते, कुठल्या इतर रंगाची का नाही?

तर ह्यामागे देखील काही महत्वाची कारणे असतात.

हॉटेलमधील चादरी ह्या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या असण्यामागे पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पांढरा रंग हा स्वच्छ दिसतो.

त्यामुळे ह्या रंगाच्या वस्तू बघताना मनाला समाधान मिळते.

 

तसेच पांढऱ्या रंगावर कुठलाही डाग लवकर दिसतो त्यामुळे हॉटेल स्टाफला रूम स्वच्छ करताना ते लवकर नजरेस पडते.

मनोवैज्ञानिकांच्या मते –

हॉटेलची खोली आणि बेड जेवढे स्वच्छ आणि आरामदायक असतील, तेवढंच हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांना तिथे चांगलं वाटेल. प्रसन्न वाटेल.

 

ह्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना तसेच चादरींना धुणे सोप्पे असते. जेव्हा मोठ्या प्रमाणात कपडे धुवायचे असतील तेव्हा पांढरे कपडे सोबत धुणे सोपे असते.

घरी पांढऱ्या कपड्यांसोबत रंगीत कपडे देखील असतात. त्यामुळे त्यांना नेहेमी वेगवेगळे धुवावे लागते. कारण त्या रंगीत कपड्यांचा रंग पांढऱ्या कपड्यांना लागण्याची भीती असते. पण जर तेच पांढरे कपडे असतील तर तर त्यांना एकत्र धुतल्या जाऊ शकते.

 

बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचा आपला उद्देश हा असतो की आपल्याला ह्या रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळ मिळावं, शांतता मिळावी, आनंद मिळावा. पांढरा रंग हा शांतीचा प्रतिक आहे. पांढरा रंग हा आपल्या मनाला शांतता देतो, म्हणूनही हा रंग आपल्याला ह्या हॉटेल रूम्समध्ये बघायला मिळतो.

 

वैज्ञानिकांच्या मते इतर रंगाच्या किंवा प्रिंट असलेल्या चादरीच्या तुलनेत पांढऱ्या चादरीवर झोपल्याने अधिक चांगली झोप येते. आणि झोप उघडत पण नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर अगदी ताजेतवाने असता.

 

हॉटेल मॅनेजमेंटचा नेहेमी हाच प्रयत्न असतो की, खोलीतील सर्व गोष्टी ह्या मिळत्या जुळत्या रंगाच्या असायला हव्या. त्यातच प्रत्येक गोष्ट ही एकाच रंगाची मिळणे जरा अवघड असते पण, पांढऱ्या रंगाच्या वस्तू सहज उपलब्ध असतात.

बघितलंत?! ह्या हॉटेलच्या पांढऱ्या चादरी मागे किती अभ्यास, मॅनेजमेंट आणि वैज्ञानिक करणे आहेत…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version