Site icon InMarathi

म्हणून धोनी त्याच्या हेल्मेटवर तिरंग्याचं स्टीकर लावत नाही!

ms dhoni feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रिकेट हा खेळ इतर खेळांच्या मानाने खूप जगप्रसिद्ध आहे आणि त्याचे चाहते आपल्या भारतात

भारतासारख्या क्रिकेटप्रेमी देशात क्रिकेट हा खेळ निव्वळ खेळ नाही तर एकप्रकारचा धर्मच आहे, जो सर्व क्रिकेटप्रेमींना एकत्र आणतो. क्रिकेटबद्दल जेवढे भारतीय वेडे आहेत तेवढे कदाचितच इतर कुठल्या देशातील लोक असतील.

आधी क्रिकेट म्हणजे सचिन तेंडूलकर हे जणू समीकरणच बनले होते. एवढचं काय तर सचिनला क्रिकेटचा देवता देखील म्हटले जाते.

सचिन  बरोबरच राहुल द्रविड, सौरव गांगुली, सेहवाग, गौतम गंभीर,हरभजन सिंग, झहीर खान, युवराज सिंग या लोकांनी सुद्धा क्रिकेटमध्ये एक काळ गाजवला आणि स्वतःच असं स्थान निर्माण केलं!

 

times of india

 

या सगळ्यांबरोबर महेंद्र सिंह धोनी या माणसाने तर देशाला वर्ल्ड कप मिळवून दिला, आणि धोनीच्या कॅप्टन्सी मुळेच २०-२० वर्ल्ड कप सुद्धा आपल्याला जिंकता आला!

त्याच्या पाठोपाठ आपला कर्णधार विराट कोहली ह्याने देखील खूप कमी वेळात आपल्या खेळाने सर्वांची मन जिंकली आणि भारतीय तरुणांचा युथ आयकॉन बनला.

 

ndtv sports

 

पण आपला माही.. ह्याची तर बातच निराळी आहे. महेंद्रसिंह धोनी, हे ते नाव आहे ज्याने भारतासाठी क्रिकेट विश्वचषक जिंकला. ज्यांची अनेक वर्षांपासून प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट बघत होता, ते त्याने भारताला दिले.

त्याची सर्वात विशिष्ट बाब म्हणजे मैदानावर त्याचा संयम. म्हणूनच तर आपल्या माहीला जग कॅप्टन कुल म्हणून ओळखते.

त्याचा मैदानावरील कुलनेस, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला आणि हरत असलेला सामना जिंकून दाखविण्याचे साहस ह्यामुळेच आज त्याचे भारतातच नाही तर संपूर्ण जगात अनेक चाहते आहेत.

 

gulf news

 

जुन्या खेळाच्या सामन्यांत हेल्मेट्स सुद्धा वापरली जात नव्हती, फक्त एक कॅप घालून हे खेळाडू वेगवान गोलंदाजीचा सामना करायचे जे खूप भयानक होतं!

नंतर नंतर फक्त कान झाकला जाईल इतकीच हेल्मेट आली, आणि त्यांनतर पूर्ण चेहेरा झाकता येईल किंवा प्रोटेक्ट करता येईल अशी हेल्मेट्स आली!

ह्या देशात असे खूप कमी म्हणजेच कदाचित बोटावर मोजण्या इतके लोक असतील जे क्रिकेट पाहत नाहीत. मग क्रिकेट बघताना तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की, प्रत्येक भारतीय खेळाडूच्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो लागलेला असतो.

तर काही खेळाडू जसे की, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि युवराज सिंह आपल्या हेल्मेटवर बीसीसीआयच्या लोगोच्या वर तिरंगा देखील लावतात. ही परंपरा सचिन तेंडूलकरने सुरु केली होती.

 

rapidleaksindia

 

तुम्ही कधी धोनीचं हेल्मेट निरखून बघितलं आहे का? जर बघितलं असेल तर तुमच्या हे नक्की लक्षात आले असेल की धोनीच्या हेल्मेट वर तिरंगा लागलेला नसतो. ह्याचा काही लोक असा तर्क लावतात की धोनी तिरंग्याचा सन्मान नाही करत. पण असं काही नाहीये!

आधी धोनी देखील इतरांप्रमाणे आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावायला. पण नंतर त्याने आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावण्यास बंद केले. आता त्याने असं का केले असेलं, ते देखील जाणून घ्या.

 

quora.com

 

धोनी एक विकेटकिपर आहे. फास्ट बॉलींग वेळी विकेटकीपिंग करताना धोनी आपलं हेल्मेट आपल्या मागे खाली जमिनीवर ठेवतो. हेल्मेटवर तिरंगा असल्याने, आपल्या देशाचा मान, आपली ओळख असलेल्या तिरंग्याला असं जमिनीवर ठेवणे त्याला काही पटले नाही.

ह्याचं कारणामुळे त्याने आपल्या हेल्मेटवर तिरंग्याचा लोगो लावण्यास बंद केले.

 

dna india

 

तसेतर धोनी इंडियन टेरिटोरियल आर्मीत ऑफिसर पदावर कार्यरत आहे. त्याने अनेकवेळा हे स्पष्ट केले आहे की, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आर्मी जॉईन करणार.

 

pinterest

 

खरच चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा धोनी हा एक जादुगार आहे, जो नेहमी स्वभावाच्या जादूची छडी फिरवून आपल्याला काहीतरी नवीन शिकवण देऊन जातो.

धोनी नेहमी त्याच्या चाहत्यांना त्याच्यावर प्रेम करण्याचं काही ना काही कारण देत असतो, कधी आपल्या खेळाणे चाहत्यांना खुश करतो, तर कधी आपल्या विनम्र स्वभावाने चाहत्यांच्या मनात घर करून जातो. त्या कारणांत आता आणखी एक भर पडली आहे.

धोनीचं टेस्ट मधलं करीयर जरी इतकं काही खास नसेल पण वनडे क्रिकेट मध्ये त्याने खूप मेहनत घेऊन नाव कमावलं आहे, त्याचा शांत आणि संयमी स्वभाव, त्याची बॅटिंग ची वेगळी स्टाईल, त्याचं विकेट किपींगच रहस्य हे सगळंच त्याने स्वतः अवगत केलेलं आहे!

म्हणूनच तो एक यशस्वी कॅप्टन असूनसुद्धा त्याची खेळाची शैली हि खूप प्रभावी आहे!

“वुई लव्ह यू धोनी…!”

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version